मुंबई -'शासकीय काम, सहा महिने थांब' अशी म्हण आहे. मात्र, गतिमान कारभार करून जनतेला दिलासा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामकाजावर भर द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी कर्मचाऱ्यांना केली. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील विविध खात्याला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस ( CM Uddhav Thackeray In Ministry ) केली. तसेच, त्यांना भेडसावत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात आले आहेत.
मुख्यमंत्री मंत्रालयात येताना मंत्रालयात पुराभिलेख संचालनालय यांच्यामार्फत मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या तयारीची पाहणी केली. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारक स्थळी हे प्रदर्शन भरवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी देताना बाबासाहेबांचा दस्तऐवज, पत्रे, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साविप्र डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याचे मंत्रालयात स्वागत त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच, त्या ठिकाणच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे कौतुक केले. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कामाविषयी माहिती घेतली. मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन, गृह आणि न्याय विभागातील कामकाजाची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
मुख्ममंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात ६ एप्रिल पासून फाईल्स, कागदपत्रांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी याची माहिती घेत, सर्व कामकाज पेपरलेस करावा. तंत्रज्ञानाचा ही जास्तीत जास्त उपयोग करावा, अशा सूचना केल्या. तसेच, कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कर्मचाऱ्यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. निमंत्रण दाखवलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सूचनांनुसार उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया विभागातील कर्मचारी अश्विनी धावणे यांनी दिली.
मंत्रालयात ६ एप्रिल पासून फाईल्स, कागदपत्रांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट त्याची मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी याची माहिती देत, सर्व कामकाज पेपरलेस करावा. तंत्रज्ञानाचा ही जास्तीत जास्त उपयोग करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तसेच कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कर्मचाऱ्यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. निमंत्रण दाखवलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सूचनांनुसार उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया विभागातील कर्मचारी अश्विनी धावणे यांनी दिली. तर आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे आजवरचे पहिले मुख्यमंत्री असावेत. अगदी साधेपणाने त्यांनी विचारपूस करुन कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आम्हालाही काम करण्याचा उत्साह वाढला आहे. पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी आम्हाला आपुलकीने पत्र आणि फुले देऊन आश्चर्यचकित केले होते. त्यांची आजची भेट ही आश्चर्यचकित करणारी आहे, असे मत विधी व न्याय विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी प्रियांका गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडले.
हेही वाचा -Sharad Pawar : पुरंदरेंच्या माहितीवरून जेम्स लेनने आक्षेपार्ह लिखाण केले : शरद पवारांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर