महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महालक्ष्मी एक्सप्रेस' बचाव कार्यात वैयक्तिक लक्ष द्या; मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश - HEAVY RAIN

एनडीआरएफच्या 4 टिम 8 लाईफ बोट घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्य वेगाने सुरु आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 27, 2019, 3:45 PM IST

मुंबई - सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका रेल्वेलाही बसला आहे. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकली होती. या रेल्वेमध्ये २ हजार प्रवासी अडकले होते. गेल्या १२ तासांपासून प्रवासी अडकून पडल्यामुळे त्यांना ना प्यायला पाणी, ना खायला अन्न मिळत होते. प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचत नसल्याने प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रशासनाने प्रवाशांच्या बचावासाठी एनडीआरएफची मदत घेतली होती. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

वांगणी येथील महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या लोकांच्या बचाव कार्यात मुख्य सचिवांनी वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एनडीआरएफची 4 पथके 8 लाईफ बोटींसह घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य वेगाने सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details