मुंबई - दिवाळी हा तेजोमय असा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो, अशी शुभकामना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आरोग्यदायी गोष्टींसाठी पुढाकार घेऊ या
दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचे संकट उभे राहिले. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. प्रकाशपर्वात प्रत्येक पणती तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते. त्याचप्रमाणे आपण सर्व कटीबद्ध होऊया. आरोग्यदायी गोष्टींसाठी पुढाकार घेऊया, ज्यातून आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. त्यासाठी या तेजोमय, मंगलमय, प्रकाशपर्वांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'तेजोमय प्रकाशपर्व आरोग्य, सुख,समृद्धी घेऊन येवो' - दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा
दिवाळी हा तेजोमय असा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो, अशी शुभकामना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे