मुंबई -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे. उद्योगपती, व्यावसायिक व राजकीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्याचबरोबर वीकएंडला शनिवार - रविवार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
गेल्या काही काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने अक्षरक्षः थैमान घातल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी होत होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. जेणेकरून लोकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे कुठलाही कठोर निर्णय घेण्याआधी नागरिकांचा विचार करण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे.
रविवारी सकाळीच उद्योजक, मॉलचे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वर्तमानपत्राचे मालक आणि संपादक यांची टाळेबंदी बाबत मुख्यमंत्र्यानी मते जाणून घेतली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे, असे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले. राज्य मंत्रीमंडळाची या संदर्भात आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आले.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. काल दिवसभरात राज्यात ४९ हजार रुग्ण सापडले. पैकी मुंबईत ९ हजार रुग्ण आढळून आले. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय राज्य सरकारने विचारात घेतला. मात्र सर्वच स्तरातून विरोध होऊ लागल्याने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. दरम्यान, लॉकडाऊन म्हटल्यास जनतेत भीती पसरते. त्याऐवजी कोरोनाची साखळी तोडण्याची भूमिका आता सरकारने घेतली आहे. रात्रीच्या वेळी वर्दळीला बंदी घालण्यात असे धोरण राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, बागा, उद्यानात जाण्यास रात्री आठनंतर पूर्णपणे मनाई राहील. दिवसासुद्धा गरज पडल्यास ही ठिकाणी बंद राहतील. माॅल, दुकाने ही सुद्धा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहील. मात्र त्यावर ५० टक्के बंधने असतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहतुकीत २ प्रवाशांना प्रवास करता येईल. सिनेमा मोठ्या शूटिंगला बंदी असेल. छोटे शुटिंग करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील.
राज्यात काय सुरु, काय बंद
उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, 'टेक अवे' सर्व्हिस सुरु राहणार
सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार
राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
सर्व बांधकामे सुरु राहतील
सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार
भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार
सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक
50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार