महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Expansion : चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात, शेलारंवर राज्याचा भार ? - maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्याच वेळात होतो आहे या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्थान मिळणार असल्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Ashish Shelar
Ashish Shelar

By

Published : Aug 9, 2022, 11:26 AM IST

मुंबई -गेल्या सव्वा महिन्यापासून लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडतोय. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल खाते सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रथेनुसार एक व्यक्ती एक पद असा दंडक असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद त्यांना सोडावे लागणार आहे.

आशिष शेलार यांच्याकडे पदभाराची शक्यता ? -भारतीय जनता पक्षातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष हे पद आता मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना यांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याने त्यांच्याकडे या पदाचा भाग सोपवला जाण्याची शक्यता आहे.

आशिष शेलारंकडे का पदभार ? -माजी मंत्री आणि माझी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला नोकरी यश प्राप्त करून दिले होते. मुंबई तसंच राज्यात अशी शेलार यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनी अन्य राज्यांच्या निवडणुकीत प्रचारक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आशिष शेलार यांचे वरिष्ठ पातळीवर असलेले संबंध पक्षातील त्यांचे स्थान आणि मुंबई महानगरपालिकाच्या आगामी निवडणुका पाहता आशिष शेलार यांची पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटातील आमदार संपर्कात -यावेळी राऊत म्हणाले की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच शिंदे गटामध्ये नाराजी आहे. कारण 40 लोकांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेलेत 40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल. बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले अशीही टीका राऊत यांनी यावेळी केली. दरम्यान काही नाराज हे सुरुवातीपासून शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पण ज्यांना शिवसेनेप्रति विश्वास आहे, अशांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असंही राऊत यावेळी म्हणाले.

टीईटी घोटाळ्यात एका वजनदार मंत्र्याचा हात -दरम्यान जेवढं औट घटकेचं मंत्रिपद मिळेल, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावं असा टोला विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांना लगावला आहे. टीईटी घोटाळा हा केवळ सचिवांनी केलेला नसून, त्यामध्ये एका वजनदार मंत्र्याचा जो हात होता, तो कोणाचा असेल. हे आता अब्दुल सत्तारांच्या मुलीने दाखवून दिलं आहे, असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा आज ११ वाजता होणार शपथविधी

हेही वाचा -MH Cabinet Ministers Profile : मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांचे प्रोफाईल, पहा एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details