मुंबई- राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास 38 दिवस उलटून गेल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांपैकी नऊ आणि भाजपचे नऊ अशा १८ आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जवळपास दोन तास बैठक पार पडली.
दादा भुसे-महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने दादा भुसे यांना राज्याचे कृषिमंत्री ( Former Agriculture Minister Dada Bhuse ) पद बहाल केले होते. अशात शिवसेनेच्या इतर आमदारांबरोबर आनंद दिघे समर्थक भुसे यांनी शिंदे गटात सामील होत एकनाथ शिंदे यांच्या सोबतची त्यांनी मैत्री निभावली. आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( Maharashtra cabinet expansion ) दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद ( Dada Bhuse become cabinet minister ) मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यासोबतच भुसे हे नाशिकचे पालकमंत्री ( Nashik Guardian Minister race ) पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते.
उदय सामंत- महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला होता. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना ( MLA Uday Samanat ) पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम सांभाळलेले उदय सामंत यांची कॅबिनेटमंत्री ( Uday Samant May be in Cabinate minister ) पदी वर्णी लागू शकते. जाणून घेऊया उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द.
शंभूराज देसाई-महाराष्ट्रात अनेक मातब्बरांचे पक्ष प्रवेश दिमाखात झाल्याचे आपण पाहिले असतील. परंतु, सातार्यातील पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू तथा विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा सर्वार्थाने आगळा होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शंभूराजेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी शंभूराज देसाईंना दिले होते.
संदीपान भुमरे- महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना लोटला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही झाला नाही. वारंवार या विषयाला घेऊन विरोधी पक्षासह अनेक राजकीय लोक टीका करत आहेत. तसेच, या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला आहे अशी चर्चा आहे. कोण होणार मंत्री? एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांपैकी शिंदे गटातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आमदारांना संधी मिळणार आहे. त्यातील एक नाव म्हणजे संदीपान भुमरे