महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रिमंडळाचा विस्तार : विखे, क्षीरसागरांसह शेलारांनी घेतली शपथ - जयदत्त क्षिरसागर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली.

शपथविधी घेणारे मान्यवर

By

Published : Jun 16, 2019, 8:24 AM IST

Updated : Jun 16, 2019, 1:50 PM IST

मुंबई -राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नवीन मंत्र्यांचा शपथविधीला सुरूवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्या सर्वानी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच मुंबई महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळवून देणारे आशिष शेलार आणि बीडमधील नुकतेच राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वात आधी शपथ घेतली.

मंत्रिमंडळातील नवीन चेहरे

अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके आणि परिणय फुके

'हे' आहेत १३ नवीन मंत्री

१) राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री)

२) जयदत्त क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री)

३) आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री)

४) सुरेश खाडे (कॅबिनेट मंत्री)

५) डॉ. संजय कुटे (कॅबिनेट मंत्री)

६) डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री)

७) डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री)

८) तानाजी सावंत (कॅबिनेट मंत्री)

९) योगेश सागर (राज्यमंत्री)

१०) परिणय फुके (राज्यमंत्री)

११) संजय भेगडे (राज्यमंत्री)

१२) अविनाश महातेकर (राज्यमंत्री)

१३) अतुल सावे (राज्यमंत्री)

Last Updated : Jun 16, 2019, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details