मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु आज विस्तार तर बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे.
22 मंत्र्यांचा शपथविधी आज होणार :मंत्रीमंडळ विस्ताराबाबत झालेल्याबैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्यांना संधी द्यायची याबाबत चर्चा झाली. आज होणाऱ्या शपथविधीसाठी मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास वीस ते बावीस मंत्र्यांचा शपथविधी आज होणार ( Ministers sworn in tomorrow ) असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या राजभवनात हा शपथविधी पार पाडला जाईल. आधी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथ विधी पार पाडला जाईल, अशा प्रकारचे देखील शक्यता वर्तनात होती. मात्र आता हा शपथविधी राजभवनात पार पाडला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळात कोणाला स्थान? :शिवसेनेतील शिंदे गटातून उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाब राव पाटिल, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार आहे. तर भाजपचे सुरेश खाडे, गिरीश महाजन, चंद्रकात पाटिल, राधा कृष्ण विखे पाटिल, रविंद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, सुधीर मुनगुंटीवार, विजय कुमार गावित व अतुल सावे यांचा समावेश असणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्ली हायकमांडने मंजुरी! :मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यात सोमवारी बैठक झाली. दिल्ली हायकमांडकडूनही सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. एकंदरीत नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्व काही निश्चित झाले आहे. भाजपच्या छावणीतून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. दुसरीकडे शिंदे कॅम्पमधून गुलाबराव पाटील, सदा सावरकर, दीपक केसरकर यांना संधी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले जाऊ शकते.
हेही वाचा-Ambadas Danve : विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून अर्ज; अंबादास दानवेना संधी