मुंबई - मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत आणि मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतोय. मी कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Deepak Kesarkar : मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतो. कधीही काँग्रेससोबत जाणार नाही - दीपक केसरकर - दीपक केसरकर प्रतिक्रिया
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत आणि मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतोय. मी कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.
यशवंत सिन्हा यांनी माघार घ्यावी -अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य हे एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान करण्यासाठी सामील होत आहेत. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावर देखील केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वजण द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिशी - प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाचे मी स्वागत करतो आणि त्यांचेही आभार मानतो. द्रौपदी मुर्मू या उत्तम उमेदवार असून सर्वजण त्यांच्या पाठिशी आहेत, असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.