महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cabinet decisions : शामराव पेजे महामंडळास १०० कोटींचे भागभांडवल, नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला जमीन - कॅबिनेट निर्णय २० एप्रिल २०२२

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत १०० कोटींच्या भाग भांडवलास मान्यता देण्यात आली. तसेच काजू बोंड, मोहाफुलापासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्यात आला आहे. एकूण सात महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

शामराव पेजे महामंडळास  १०० कोटींचे भागभांडवल
शामराव पेजे महामंडळास १०० कोटींचे भागभांडवल

By

Published : Apr 20, 2022, 10:59 PM IST

मुंबई - शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलाची मर्यादा वाढविण्यात आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत १०० कोटींच्या भाग भांडवलास मान्यता देण्यात आली. तसेच काजू बोंड, मोहाफुलापासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील बोरीवली मौजे मनोरी येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय.
तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय
पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता
महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता
काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण आखले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details