विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले -
राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद चर्चेवर ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत, ते सगळीकडे फिरले पण ते महाराष्ट्राबद्दल काहीच बोलले नाहीत.. मुख्यमंत्र्यांना पदावर येवून आता खूप दिवस झाले आहेत. मात्र, त्यांना अजून चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण यातील काहीच फरक कळत नाही.
विमा, वीज तोडणीसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते काहीच बोलले नाहीत, हा भ्रमनिरास आहे. चीन समोर आला की पळे, असे म्हणत त्यांनी सौनिकांचा अपमान केला आहे. शूर सैनिकांना पळपुटे बोलले त्यांचा निषेध आहे. कोणताही शब्द मुख्यमंत्र्यांना अमित शाह यांनी दिला नव्हता, महाराष्ट्रातील एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही.
शरजील उस्मानीबद्दल मुख्यमंत्री काही बोलले नाहीत आणि ते हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. सावरकरांना समलैंगिक आणि देशद्रोही बोलणाऱ्या काँग्रेसबरोबर तुम्ही बसला आहेत. त्यांच्यामध्ये धमक असल्यास त्यांनी औरंगाबादचे नामकरण करून दाखवावे.
केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र सेनानी होते, मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकातील आणि निवडणुकीचे भाषण वाटत होते. एवढे सुमार मुख्यमंत्र्यांचे भाषण होते आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल काहीच बोलले नाही, नुसते विरोधकांवर टीका करण्याचे काम त्यांनी केले. राज्य सरकारचा भ्रष्टाचार काढला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, असे या सरकारला वाटत आहे.
अध्यक्षांवर दबाव टाकून आम्हाला बोलण्याची संधी दिली गेली नाही. बाबरी पाडण्यासाठी आम्ही होतो आणि राम मंदिरासाठी लोकांनी मदत केली तर त्यात यांचे पोट दुखत आहे. सत्तेकरिता त्यांनी सगळी सेटिंग केली आहे. लोकशाहीमध्ये आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही.