मुंबई- आर्थिक मंदीचा राज्यातील उद्योगांवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत राज्यातील उद्योगांना सवलत देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मुंबई, नागपूर या ठिकाणी उद्योगांना मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत देणार आहे. त्यामुळे राज्याला अडीच हजार रुपये कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. तर वीज वापरातही उद्योगांना सवलत देणार आहे.
उद्योगांना सवलत; उपकर वाढविल्याने पेट्रोल डिझेल महागणार - maharashtra state budget 2020
पेट्रोल व डिझेलवरील १ रुपयाने उपकर वाढविण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. या करामुळे राज्याला सुमारे १८०० कोटी रुपये मिळणार आहेत.
पेट्रोल डिझेल महागणार
पेट्रोल व डिझेलवरील १ रुपयाने उपकर वाढविण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी जाहिर केले. या करामुळे राज्याला सुमारे १८०० कोटी रुपये मिळणार आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासावर हा महसूल वापरण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
Last Updated : Mar 6, 2020, 1:18 PM IST