मुंबई - महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री अजित पवार हे या सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असून, या दरम्यान त्यांनी राज्यातील जलसंधारणासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना' सुरू करणार असल्याची घोषणा केली.
हेही वाचा...अर्थसंकल्पाचा महा'अर्थ'- केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या करात घट
भुजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार...
राज्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजना या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी तब्बल 2 हजार 810 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभागासाठी 10 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली