महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News : महत्वाच्या बातम्या तात्काळ वाचा फक्त एका क्लिकवर - 2021

Breaking News
maharashtra-breaking-news

By

Published : Nov 12, 2021, 6:37 AM IST

Updated : Nov 12, 2021, 4:42 PM IST

16:40 November 12

अभिनेत्री कंगना रणौतच्या घराबाहेर निदर्शने

अभिनेत्री कंगना रणौतच्या घराबाहेर निदर्शने, कंगनाच्या वक्तव्यानंतर निषेध.

मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या मुंबई खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत.  

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हे आंदोलन पुकारले आहे.

14:03 November 12

अनिल देशमुख यांना तीन दिवसाची ईडी कस्टडी न्यायालयाचा निर्णय

 शंभर कोटी कथित वसुली प्रकरणे नवी मुंबई येथील एका व्यक्तीला समन्स

अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील एका व्यक्तीस ईडीचे समन्स

त्या व्यक्तीचे नवी मुंबई सध्या वास्तव्य

अनिल देशमुख यांना तीन दिवसाची ईडी कस्टडी न्यायालयाचा निर्णय

12:52 November 12

काँग्रेसची विचारधारा ही बंधुभावाची तर भाजप-आरएसएसची विचारधारा ही समाजात दुही निर्माण करणारी - राहुल गांधी

काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबीरात काँग्रेस नेते राहुल गांधींचे संबोधन  

  • काँग्रेसची विचारधारा ही बंधुभावाची तर भाजप-आरएसएसची विचारधारा ही समाजात दुही निर्माण करणारी आहे. त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा आहे आमच्याकडे प्रचार यंत्रणा नाही.
  • आजच्या भारतात विचारधारेची लढाई ही सर्वात महत्त्वाची आहे.
  • भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करतात. मात्र आमचे म्हणणे आहे की हिंदू धर्म आणि हिंदुत्वात फरक आहे.
  • तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला हिंदूत्वाची गरज काय आहे?
  • त्यांचे आयकॉन सावरकर तर आमचे आयकॉन महात्मा गांधी आहेत.
  • कबीर, गुरु नानक, महात्मा गांधी या सारख्या विचारवंतांनी बंधुत्वाचा विचार पसरवला. हिच या देशाची विचारधारा आहे. आम्हाला ही विचारधारा आता आत्मसात करायची आहे आणि देशभर पसरवायची आहे. देशातील नागरिकांना ही विचारधारा समजून सांगितली पाहिजे. कार्यकर्त्यांनी हा विचार देशात सगळीकडे पसरवला पाहिजे.
  • काँग्रेसचा कितीही जुना कार्यकर्ता असला तरी त्याला प्रशिक्षण शिबीरामध्ये येणे सक्तीचे केले पाहिजे.
  • सध्या काही लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये जात आहेत.
  • भाजपमधून परत काँग्रेसमध्ये आलेल्या उत्तराखंडच्या नेत्यांनी सांगितले की तिथे (भाजपमध्ये) श्वास गुदमरतो. तिथे मोकळा श्वास घेता येत नाही.
  • काँग्रेसची विचारधारा ही एक दिवस भाजप आणि आरएसएसच्या द्वेषपूर्ण विचारधारेला संपवून टाकेल.

12:01 November 12

नागपुरात भाजपच्या वतीने आज पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट विरोधात आंदोलन

नागपूर - नागपुरात भाजपच्या वतीने आज पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला VAT कमी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  

  • शहरातील व्हेरायटी चौकात भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
  • भाजपचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके यासह भाजप आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
  • यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
  • भाजपा युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध म्हणून पुतळाही जाळला.
  • काही काळ पोलिस आणि भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

10:51 November 12

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपणार

मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत आहे. आज त्यांना न्यायालयात नेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांना १ नोव्हेंबर रोजी अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांची कोठडी आज संपत आहे.

10:38 November 12

सेन्सेक्सने ३२० अंकावर

मुंबई- सेन्सेक्सने ३२० अंकावर उडी घेतली आहे. सध्या ६०,२३५ अंकांवर ट्रेडिंग करत आहे. तर निफ्टी १७,९७६ अंकांवर आहे.  

09:58 November 12

'मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेकडे सोपवल्याचे वृत्त खोडसाळपणाचे'

मुंबई - मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याच्या, व्हायरल होत असलेल्या वृत्तात कुठलेही तथ्य नाही. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने केले आहे. असे ट्विट  राज्याच्या माहिती संचालनालयाने केले आहे. 

09:46 November 12

एसटी महामंडळाचे संप मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सेवेत रुजु होण्याचे आवाहन केले आहे. महामंडळाने एक निवेदन ट्विट करुन 'आधीच तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका', असे आवाहन केले आहे.  

09:29 November 12

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मानेच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. साधारण एक तास भर शस्त्रक्रिया चालली असल्याची माहिती आहे. 

09:18 November 12

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सकाळी शस्त्रक्रिया

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सकाळी शस्त्रक्रिया होणार  

पाठ आणि मणक्याच्या दुखण्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे

मुंबईतील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु

08:48 November 12

प्लास्टिकच्या गोदामाला आग, १२ हून अधिक गोदामे पूर्णपणे जळून खाक

  • मुंबई - मानखुर्द मंडाले परिसरातील संकुलात असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली आहे
  • या घटनेत १२ हून अधिक गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली
  • २० हून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

07:50 November 12

मुंबईतील मानखुर्द भागातील मंडाले भंगार बाजाराच्या गोदामाला आग

मुंबई- मुंबईतील मानखुर्द भागातील मंडाला भंगार बाजाराच्या गोदामाला आग लागली आहे.

06:31 November 12

Breaking News : एसटी कर्मचारी संपाचा १६ वा दिवस, संपावर तोडगा निघतो का याकडे महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई -एसटी कर्मचारी संपाचा आज १६वा दिवस आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे की कर्मचाऱ्यांनी विरोधकांच्या हातचे बाहूले बनू नये. मात्र एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर अडून आहे. एसटी संपामुळे राज्यातील ग्रामीण भागावर मोठा परिणाम झाला आहे. आज या संपात काही तोडगा निघतो का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. 

Last Updated : Nov 12, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details