महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : घाटकोपर येथून एमडी ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

breaking file photo
फाईल फोटो

By

Published : Sep 13, 2022, 6:29 AM IST

Updated : Sep 13, 2022, 11:04 PM IST

22:56 September 13

घाटकोपर येथून एमडी ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली विरोधी कक्षाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत तीन ड्रग्ज माफियांना पकडले. त्या तिघांकडून ४८ लाखाहून अधिक किंमतीचा एमडीचा साठा जप्त करण्यात आला.


आझाद मैदान युनीट पुर्व उपनगरात पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 30 ग्राम वजनाचा एमडी ड्रग्ज सापडला. त्यानंतर या तस्कराला एमडीचा पुरवठा करणारा सप्लायर मुंब्रा येथील असल्याचे समजताच पथकाने मुंब्रा, शिळफाटा येथे सापळा रचून दुसऱ्या ड्रग्ज माफियाला पकडले.
त्याच्याजवळ १०० हून अधिक ग्रँम वजनाचा एमडी सापडला. एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीतील.हे दोघे सक्रीय तस्कर असल्याचे समजते.

दरम्यान, घाटकोपर युनीटने सांताक्रुझ येथेएका नायजेरियन ड्रग्ज माफियाला पकडले. त्याकडून ९० हून अधिक ग्रँम वजनाचा एमडी हस्तगत करण्यात आला. अशाप्रकारे तिघा ड्रग्ज माफियांना पकडून पोलिसांनी ४८ लाखाचा एमडी जप्त केला.

22:55 September 13

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला पेन्शनकरिता लाच मागणाऱ्या झेडपीच्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ अठक

चंद्रपूर : सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला पेंशन मिळण्याच्या कागदोपत्री पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदच्या लिपिकाने लाच मागितली. या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गोपाळ पेंटेवार असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.


निवृत्ती पेन्शन चे केस पेपर महालेखापाल नागपूर यांचेकडे पाठविण्याकरिता जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गोपाळ उमाजी पेंटेवार यांनी फिर्यादीला 5 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसल्याने याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता आज 13 सप्टेंबरला वरिष्ठ लिपिक पेंटेवार यांना जिल्हा परिषद गेटवर रंगेहात अटक करण्यात आली. फिर्यादी हे तळोधी, तालुका चिमूर येथील रहिवासी आहेत. ते कनिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा निवृत्ती पेन्शनचा अर्ज माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिला होता. मात्र, वरिष्ठ लिपिक गोपाळ पेंटेवार यांनी सदर कागदपत्रे पुढे पाठविण्यासाठी फिर्यादीला 5 हजार रुपयांची लाच मागितली. फिर्यादी यांना स्वतःच्या कामाकरिता लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचत लाचेची तडजोडीअंती रक्कम स्वीकारताना पेंटेवार यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या गेट समोर रंगेहात अटक करण्यात आली. सदर कारवाई लाचलुचपत चंद्रपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, नरेश ननावरे, पुष्पा कोचाळे, वैभव गाडगे, मेघा मोहूलें, अमोल सिडाम, रवी ढेंगळे यांनी केली.

22:55 September 13

मुंबई उच्च न्यायालयातील रिक्त न्यायाधीशांची जागेवर निवृत्त वरील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्तीची नाकार

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 94 इतकी मंजूर असताना देखील अद्यापही रिक्त न्यायाधीशांची जागा भरण्यात आली नसल्याने या जागेवर निवृत्त न्यायाधीशांना नवीन न्यायाधीशांची नियुक्ती होईपर्यंत कार्यरत करण्यात यावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यापासून मुख्य न्यायमूर्ती दीपक दत्ता यांच्या खंडपीठाने नाकार दिला आहे.

22:25 September 13

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री अपघाताच्या चौकशीसाठी हॉंगकॉंग पथक ठाण्यात दोन दिवस होणार चौकशी चाचणी

ठाणे मागच्या आठवड्यात अहमदाबाद येथून पालघर मध्ये चारोटी येथे रोडच्या दुभाजकाला धडकून मर्सिडीज बेंज कारला झालेल्या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. मर्सिडीज कारमध्ये मागच्या सीटवर असलेल्या मिस्त्रींचा मृत्यू कसा झाला याच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची टीम हॉंकॉंगमधून ठाण्याच्या घोडबंदर येथे मंगळवारी दाखल झालेली आहे.

४ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या मर्सिडीज बेंज कारच्या अपघातात उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी मर्सिडीजमध्ये मिस्त्रीसह तीन जण होते. मात्र सायरस मिस्त्री यांचा मर्सडिज कारमध्ये कुठल्या कारणाने झाला. नेमके काय घडले? कारचा वेग किती होता. याची चाचपणी करण्यासाठी हॉंगकॉंग मधून त्रिसदस्यीय कमेटी सोमवारी मुंबईत दाखल झाली. तर मंगळवारी ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील ब्रम्हांड येथील मर्सडिज शो रूममध्ये दाखल झाले. दरम्यान पालघर येथे अपघात झालेली मर्सडिज कार ही घोडबंदर रोडवरील मर्सडिज शो रूममध्ये आणण्यात आलेली आहे. सदर अपघाताची चौकशी ही दोन दिवस चालणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.

21:05 September 13

एकनाथ शिंदे यांनी बीएमसी अधिकार्‍यांची घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या आढावा बैठकीत पथदिवे, रस्ते दुभाजक, उद्याने, काँक्रीट रस्ते, 7 प्रमुख समुद्रकिनारे, किल्ले, गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबईतील इतर हेरिटेज साइट्सचे सुशोभीकरण जलद करण्याच्या सूचना दिल्या.

20:47 September 13

सदा सरवणकर प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी विश्वास नांगरे पाटील यांची घेतली भेट

मुंबई : माजी महापौर श्रद्धा जाधव आणि शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर या महिला आघाडीसोबत पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत माजी आरोग्य समिती अध्यक्षा राजुर पटेल यादेखील आहेत. सदा सरवणकर प्रकरण तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सहपोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे शिवसेनेच्या या शिष्टमंडळाने सदा सरवणकर आणि नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल केली आहेत

20:45 September 13

बलात्काराचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या आमदाराची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी .

मध्य प्रदेशातत बलात्काराचा आरोप असलेला आमदाराचा मुलगा करण मोरवाल याची काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.

19:24 September 13

उदयनराजे भोसले यांचे काका शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यात निधन

पुणे- साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात आज संध्याकाळी वृध्दापकाळाने निधन झालं आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. ते 75 वर्षाचे होते. शिवाजीराजे भोसले हे कै. अभय सिंहराजे भोसले यांचे भाऊ होते.

18:55 September 13

पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

18:33 September 13

तूर डाळ नासाडीप्रकरणी आठ जणांविरुद्ध दक्षता चौकशीचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

तूर डाळ नासाडीप्रकरणी आठ जणांविरुद्ध दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कडक कारवाई केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांना निलंबित केले जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

17:43 September 13

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 27 सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली (Anil Deshmukh Rs 100 Crore Recovery Case) प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने CBI Court Anil Deshmukh अनिल देशमुख यांची 27 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ (Anil Deshmukh Judicial Police Custody Increase) करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची Mumbai Sessions Court Anil Deshmukh आज न्यायालय कोठडी संपल्याने त्यांची पुन्हा न्यायालयाने कोठडीत वाढ केले आहे.

17:28 September 13

गुजरातमध्ये काँग्रेस संपली; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे विधान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस बाबत एक विधान केलं आहे. गुजरातमध्ये आता काँग्रेस संपली असे विधान अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

16:29 September 13

स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके हेच सध्या सुरुयं; आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर टीका केली आहे. कंपनी गुजरातमध्येच कशी गेली? इतर राज्यात का नाही गेली? आपलं सरकार खोके सरकार, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके हेच सध्या सुरु आहे, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

15:19 September 13

अमृता फडणवीसांबद्दल फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या महिलेला अटक

ठाणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने ठाण्यातील एका महिलेला अटक केली. आयपीसी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर केला होता. तिला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

15:02 September 13

कोल्हापुरात पब्जीच्या नादात तरुणाची आत्महत्या

कोल्हापुरात पब्जीच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन या तरुणाने स्वत:चे जीवन संपवले आहे.

14:18 September 13

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला सत्र न्यायालयाचा दिलासा नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला सत्र न्यायालयाचा दिलासा नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला आजही सत्र न्यायालयाचा दिलासा नाही

ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज झाला युक्तिवाद

ऋषिकेश देशमुख यांनी तपासात कुठलेही सहकार्य केले नाही ईडीचा युक्तिवाद

ऋषिकेश देशमुख यांना 4 वेळा समन्स पाठवून देखील चौकशीला आले नाही

शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात ऋषिकेश देशमुख यांची ईडीला करायची आहे चौकशी

ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी

13:43 September 13

लातूर जिल्ह्यात पुन्हा भुकंपाचे धक्के? भयभीत ग्रामस्त रस्त्यावर

लातूर : लातूर जिल्ह्यातील मौजे हासोरी या गावात मंगळवारी रात्री 10:12 मिनिटाला भूकंपासारखा आवाज येऊ लागला. त्यामुळे भूकंपाच्या भितीने गावातील नागरिक रात्री घराबाहेर येऊन थांबले. अचानक जमीन हादरण्याचा आवाज आल्याने भूकंपाच्या भीतीने अनेकांनी घरं सोडली. गावात सगळीकडे धावपळ सुरू होती. एकाबाजूला बाहेर पाऊस तर दुसरीकडे जमीन हादरवणारा आवाज येत होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होती. ( Earthquake shocks in nilanga taluka )

12:36 September 13

आमदार रवी राणांचे पोलीस आयुक्त आरती सिंगवर गंभीर आरोप

आमदार रवी राणा यांचा अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंग आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग अमरावतीतून दर महिन्याला सात कोटींची अवैध वसुली करून त्यातील पैसा ठाकरेंपर्यंत पोहोचवत होते असा आरोप रवी राणा यांनी केला आहे, ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.

12:00 September 13

एमसीए निवडणुकीसाठी आशिष शेलार पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई -मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. त्याआधी आज एमसीएची सर्वसाधारण सभा आज सायंकाळी पार पडेल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांच्या राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी ( Ashish Shelar meeting Sharad Pawar ) पोहोचले. एमसीएच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत ( Bjp Leader Ashish Shelar meeting for MCA elections ) आहे.

11:10 September 13

पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक केली जप्त; पिता-पुत्रांना बजावले समन्स

मुंबई :दादरमध्ये अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर रविवारी मारहाणीत झाले होते. शिंदे आणि ठाकरे गटात ही मारामारी झाल्यानंतर हा वाद दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. ठाकरे गट यांच्यातील वाद आता दादर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पहिला गुन्हा ठाकरे गटातील शिवसैनिकांवर दाखल झाला आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती मात्र कलम 395 हटवल्याने कोर्टाने त्यांना जामीनावर मुक्त केले. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आक्रमक झाल्यानंतर दादर पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली आहे.

10:58 September 13

शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ बरखास्त; हायकोर्टाचे आदेश

मुंबई - शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ बरखास्त हायकोर्टाचे आदेश. दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्य समिती सल्लागार कामकाज करणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला निर्णय.

10:45 September 13

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौर्‍यावर

मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ( Lokshahir Annabhau Sathe ) यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण ( Unveiling of statue of Lokshahir Annabhau Sathe ) अशा दोन कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ), महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर ( Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narvekar ) हे रशिया दौर्‍यावर रवाना झाले. विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा या दौर्‍यात त्यांच्यासोबत असतील.

09:48 September 13

श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह वाद वर आज मथुरा जिल्हा न्यायालयात सुनावणी

मथुरा - श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादावर आज मथुरा जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनेकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

09:12 September 13

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

09:01 September 13

मुंबईत आज ढगाळ वातावरण, हलका ते मध्यम पाऊस

मुंबई - मुंबईमध्ये ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीचा पाऊस पडत असून आज मंगळवारी ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.

08:24 September 13

रस्त्यात कारला लागलेली आग पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा अन् केली मदत

मुंबई - मुंबई एअरपोर्टजवळ एका फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता. रस्त्यात कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, असे म्हणत कारचालकाला धीर दिला. गाडी आपण नवीन घेऊ, पण जीव जास्त महत्त्वाचा आहे, असे त्यांनी कारमध्ये असलेल्यांना म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री पुढे रवाना झाले. यावेळी कारचालकानेही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्या युवकाला मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला दिल्या.

07:48 September 13

फुटाळा फाउंटनचे 16 ते 21 सप्‍टेंबर दरम्‍यान ‘ट्रायल शो’ होणार, नागपूरकरांना घेता येईल आनंद

नागपूर - अप्रतिम सौन्दर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावात जागतिक दर्जाचे पाण्यावर तरंगणारे म्युझिकल फाऊंटन तयार करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात या फाउंटनचा पहिला ट्रायल शो झाल्यानंतर आता 16 ते 21 सप्‍टेंबर दरम्‍यान ‘ट्रायल शो’ होणार, असून नागपूरकरांना याचा येईल आनंद घेता येणार आहे.

07:25 September 13

आरोपींला कारागृहात सोडण्यात जनहिताचे काय? मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळली

मुंबई - उच्च न्यायालयात एका आरोपीने जामीन मिळून सुद्धा जामिनाची अनामत रक्कम भरणे होत नसल्याने त्यामुळे कारागृहामध्ये शिक्षक बघत असलेल्या आरोपीने तुरुंगातून सोडण्याकरिता जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश देण्याकरिता दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच आरोपीला तुरुंगातून सोडण्यात जनहित काय असा प्रश्न देखील विचारला आहे.

06:57 September 13

दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी! आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका

मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ साली दंगल झाली तेव्हा शिवसेनेने मुंबई वाचवली. बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी देखील सेनेने उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचे आणि ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केले, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना खडसावले. तसेच पैठण येथील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

06:44 September 13

सिकंदराबाद येथील एका लॉजला लागलेल्या आगीत दाट धुरामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू

हैदराबाद -सिकंदराबाद येथील एका लॉजला लागलेल्या आगीत दाट धुरामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. सिकंदराबादमध्ये सोमवारी रात्री भीषण आग लागली. येथील रुबी लॉजमध्ये थांबलेल्या सात पर्यटकांचा दाट धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

06:17 September 13

घाटकोपर येथून एमडी ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विस यांनी वकिलाच्या मार्फत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले की तळोजा कारागृहामध्ये तब्येत खराब असताना देखील त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत नाहीत. यावर तळोजा कारागृहाचे अधीक्षक यांनी विशेष एनआयए न्यायालयात हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अहवालात म्हटले आहे की आरोपी व्हर्नन गोन्साल्विस यांनी कारागृहातील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यास नकार दिला होता.

Last Updated : Sep 13, 2022, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details