मुंबई- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बैठक बोलावली आहे. ठाकरे सरकार वाचविण्याच्या हालचाली सुरू आहेत. नाराज एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्याकरिता जोरदार हालचाली सुरू आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलाविली बैठक, ठाकरे सरकार वाचविण्याच्या हालचाली सुरू - आजच्या ठळक बातम्या
09:48 June 21
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलाविली बैठक, ठाकरे सरकार वाचविण्याच्या हालचाली सुरू
09:37 June 21
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, नारायण राणे म्हणतात...
मुंबई- नाराज असलेले शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे डझनभर आमदारांसह सुरतमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याबाबतची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे ( BJP leader Narayan Rane ) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. नॉट रिचेबल असताना त्यावर प्रतिक्रिया देणे टाळायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.
08:48 June 21
शिवसेनेचे एकनाथ शिंदे ११ आमदारांसह सुरतमध्ये...भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत आमदार
मुंबई - शिवसेनेत मोठे नाट्य घडत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे ११ आमदारांसह सुरतमध्ये पोहोचले आहे. हे आमदार गुजरातचे भाजप अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
07:51 June 21
शाळेचे लोखंडी गेट तुटून अंगावर पडून ५ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी
अमळनेर ( औरंगाबाद ) - येथील जिल्हा परिषद शाळेत नुकत्याच तीन महिन्यापूर्वी काम केलेल्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थी जखमी झाला आहे. गौरव दीपक बिरुटे ( वय ५ वर्ष ) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला शिक्षकांनी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
07:39 June 21
शिवसेना परत एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल
मुंबई- शिवसेना परत एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
07:17 June 21
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा
डेहराडून- ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री पुष्करराज सिंह धामी हे उपस्थितीत राहिले आहेत.
07:14 June 21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत म्हैसूरमधील राजवाड्यासमोर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसूरमधील राजवाड्यासमोर योग कार्यक्रमात ( PM Modi participate in International Yoga Day ) सहभागी झाले आहेत. आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन ( International Yoga Day celebration ) साजरा होत आहे.
06:58 June 21
कडाक्याच्या थंडीत सिक्कीम येथे हिमवीर जवानांचा १७ हजार फूट उंचीवर योगा
आयबीटीपीच्या हिमवीर जवानांनी सिक्कीम येथे बर्फाळ भागात १७ हजार फूट उंचीवर योगा केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत योगा करणाऱ्या जवानांमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
06:54 June 21
जवानांचा १६ हजार फूट उंचीवर उत्तराखंड येथे योगा
डेहराडून- इंडो तिबेटियन पोलिसांनी १६ हजार फूट उंचीवर उत्तराखंड येथे योगा केला. आज जगभरात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
06:12 June 21
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलाविली बैठक, ठाकरे सरकार वाचविण्याच्या हालचाली सुरू
नवी दिल्ली- आज जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. इंडो तिबेटियन पोलिसांनी १६,५०० फूट उंचीवर योगा साजरा केला आहे. ( हे ब्रेकिंग पेज दिवसभरात सतत अपडेट होत आहे. )