यवतमाळजिल्ह्यात रविवार पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने महागाव दारव्हा बाबुळगाव तालुक्यात अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये महागाव तालुक्यातील काळी दौलत वाकण, वागदा शिवारात अतिवृष्टी दृश्य पाऊस झाला तर दारवा तालुक्यातील लाखं खिंड येथे ढग सदृश्य पावसामुळे नागरिकांची नागरिकांची दाणादाण उडाली. तर शेत पिकांना देखील नवसंजीवनी मिळण्याऐवजी मोठा फटका बसला आहे.
Breaking News Live : अतिवृष्टी आणि ढगफुटीने शेतकऱ्यांची दाणादाणकुठे दिलासा तर कुठे पिकांना फटका - महाराष्ट्र ताज्या बातम्या
22:24 September 05
अतिवृष्टी आणि ढगफुटीने शेतकऱ्यांची दाणादाणकुठे दिलासा तर कुठे पिकांना फटका
22:11 September 05
वादग्रस्त पुरीचा गणपती खुला होण्यापूर्वीचं पोलिसांनी केली कारवाई
नागपूर विविध वादग्रस्त विषयांवर आधारित देखावे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरीचा गणपतीची स्थापना करू न देताच पाचपावली पोलिसांनी गणपतीच्या खोलीला कुलूप लावले आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी सुरू झालेली पुरीच्या वादग्रस्त देखाव्याची परंपरा याही वर्षी कायम आहे. मात्र, पोलिसांनी पुरीचा गणपती खुला होण्याआधीच झाला कारवाई केली आहे.Body:गणेशस्थापनेच्या निमित्ताने वादग्रस्त विषयांची
हाताळणी करण्यासाठी नागपुरातील पुरी यांचा गणपती प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा पाचव्या किव्हा सहाव्या दिवशी पुरीच्या गणपतीची स्थापन केला जातो. परंपरे-प्रमाणे यावर्षीही वादग्रस्त देखाव्यासह गणपती तयार करण्यात आला होता. मात्र,तो देखावा नागरिकांना बघायला मिळालाचं नाही.
19:43 September 05
केंद्र सरकार बदलणार राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं नाव; 'हे' असणार नवं नाव
केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची घेल्याची माहिती पुढे आली आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' ठेवणार असल्याची माहिती पुढे आली. यामुळे या स्थळांना नवं नाव मिळणार आहे.
18:29 September 05
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राहुल गांधींच्या भेटीला
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या सर्वत्र विविध राजकीय नेत्यांची भेटी घेत आहेत. अशात आज मंगळवारी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले आहे.
17:17 September 05
लिज ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान
आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान पदी लिज ट्रस यांची निवड झाली. या निवडीनंतर लिज ट्रस यांनी जनतेचे आभार मानले आहे. बोरिस जॉन्सन यांच्यानंतर त्यांची निवड झाली आहे.
16:56 September 05
काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट, २० ठार
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात सुमारे 20 जण जागीच ठार झाली आहेत. Kabul is the capital of Afghanistan त्यामध्ये दोघे रशियन राजनैतिक अधिकारी होते. रशियन मीडिया संस्था रशियन टाइम्सने अफगाण मीडियाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
16:05 September 05
दिल्ली, पंजाबप्रमाणे भाजपा मुंबईतही भूईसपाट होणार; अरविंद सावंतांची भाजपावर टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकाही केली. याच टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्ली, पंबाजप्रमाणे भाजपा मुंबईतही भूईसपाट होणार, अशी टीका खासदार अरविंद सावंतांनी केली आहे.
14:58 September 05
गृहमंत्री अमित शाह वर्षा बंगल्यावर दाखल; मुंबई महापालिकेसाठी 150 चा नारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईतील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
13:27 September 05
सायरस मिस्त्रींवर मंगळवारी वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
मुंबई -टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात असल्याने ते आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. सायरस यांच्यावर उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
12:40 September 05
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांशी संवाद
5 सप्टेबंर शिक्षक दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील शिक्षकांशी संवाद साधत आहे.
12:02 September 05
संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ
खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्रा घोटाळा प्रकरणी अटक केली होती. यात आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर सुनावणी पार पडली. राऊतांच्या कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
11:09 September 05
लखनौमधील लेवाना हॉटेलला भीषण आग, दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती
लखनौमधील लेवाना हॉटेलला भीषण आग, दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती
10:51 September 05
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अमित शहा यांची घेतली भेट
मुंबई -प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊस मध्ये भेट घेतली. या भेटी मागचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांच्याबरोबर ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत नक्की काय झालं याबाबत अजून स्पष्टीकरण समोर आलेलं नाही आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने अनेक भाजप खासदार, नेते अमित शहा यांची भेट घेत आहेत.
10:18 September 05
महाविकास आघाडीची 12 MLC नावांची यादी रद्द करण्यास राज्यपालांची परवानगी
मुंबई- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 2020 मध्ये मागील MVA सरकारने पाठवलेल्या 12 MLC नामांकनांची यादी मागे घेण्याची परवानगी राज्य सरकारला दिली आहे.
09:48 September 05
अभिनेता कमाल राशीद खानला अटक
मुंबईतील वर्सेवा पोलिसांनी अभिनेता कमाल राशीद खानला अटक केली आहे. 2019 मध्ये एका महिला फिटनेससोबत त्याने छेडछाड केली होती.
09:48 September 05
भारत-पाक क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा घेणारा बुकी पुणे पोलिसांच्या ताब्यात
पुणे :भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या ( De Mora Pub in Bundagarden Police Station ) गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी मोरा पबमध्ये हा सट्टा लावण्यात आला होता. तेथून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यात ( India Pakistan Cricket Match on Betting ) आले ( Cash Worth Lakhs of Rupees has been Seized ) आहे.
09:06 September 05
डोक्याला मार लागल्याने सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू; डॉक्टरांची माहिती
मुंबई -उद्योजक सायरस मिस्त्री Entrepreneur Cyrus Mistry (५४ वर्षे) यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघरजवळ झालेल्या अपघातात निधन Cyrus Mistri Accidental Death झाले. अपघातानंतर लगेचच सायरस यांना प्रथम कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा सायरस यांना येथे आणण्यात आले तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. शरीरातून अंतर्गत रक्तस्त्रावही होत होता. या रक्तस्रावामुळे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
08:46 September 05
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 12 MLC नामांकनासाठी राज्यपालांना पत्र
मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून 2020 मध्ये मागील MVA सरकारने पाठवलेल्या 12 MLC नामांकनांची यादी मागे घेण्याची विनंती केली. तसेच शिंदे सरकार हे नवीन 12 MLC नावे राज्यपालांना पाठवणार आहेत.
08:29 September 05
मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत २९,२९९ गणेशमूर्तींचे विसर्जन
मुंबई -मुंबईत काल पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात (five day Ganesha immersion in Mumbai) आहे. रात्री १२ वाजेपर्यंत २९,२९९ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १२,१९७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्तामुळे (Due to good police presence) कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने (BMC Emergency Management) दिली.
07:56 September 05
पंतप्रधान मोदी आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांसोबत साधणार संवाद
नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2022 विजेत्यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
07:34 September 05
सोनाली फोगटच्या अनेक वस्तू गोवा पोलिसांकडून जप्त
गोवा पोलिसांनी काल सोनाली फोगटचा पासपोर्ट, दागिने, घड्याळे, 16,000 रुपयांची रोकड आणि सोनालीच्या गुरुग्राम येथील फ्लॅटमधून मोबाईल जप्त केला आहे.
07:03 September 05
पाकिस्तानचा भारतावर थरारक विजय
IND vs PAK, Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील ४ सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, हा सामना अखेर पाकिस्तानने पाच गडी राखून जिकंला (Pakistan beats India by 6 wickets). भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ या जोडीने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचता आले.
06:23 September 05
Maharashtra Breaking News
मुंबई -गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रविवारी मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.