महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

By

Published : Oct 19, 2022, 6:37 AM IST

Updated : Oct 19, 2022, 7:51 PM IST

19:46 October 19

निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

मुंबई - निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. सौरभ त्रिपाठी यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. व्यवसायिकांना आयकर विभागाची भीती दाखवून खंडणीचा त्यांच्यावर आरोप आहे. खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठी अजूनही फरार आहे.

18:34 October 19

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार सरसकट ५ हजार रूपये

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे.

18:16 October 19

मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी

मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी. परवाना नसलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई होणार असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

18:03 October 19

दिवाळी दोन दिवसांवर आली मात्र विशेष किट अनेकांना मिळालेच नाही

रायगड - रेशन कार्ड धारकांना दिवाळी निमित्त धान्याऐवजी वस्तूंचे किट देण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. मात्र बहुतांश ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन धान्य दुकानामधे पोचलेले नाही. शासनाने जाहीर केलेले किटही उपलब्ध झालेले नाही. यातून शासन उगाचच गोरगरीबांना आस दाखवून फसवणूक करत असल्याचे दिसुन येत आहे, असा आरोप अन्न अधिकार कार्यकर्ते मुक्ता श्रीवास्तव, उल्का महाजन, चंद्रकांत यादव, दिलीप डाके, शब्बीर देशमुख यांनी केला आहे.

16:45 October 19

मुंबई शहरात तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी

मुंबई - शहरात तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून फोन. धमकीचा फोन करणाऱ्याचा शोध सुरू. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती.

16:42 October 19

राष्ट्रगीताचा अवमानप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर 2 नोव्हेंबरला निकाल

मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर 2 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय निर्णय देणार आहे.

16:28 October 19

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ, 2 नोव्हेंबरपर्यंत कारागृहात

मुंबई -माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आज 14 दिवसाची वाढ करण्यात आली. त्यांचा 2 नोव्हेंबरपर्यंत कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांची दिवाळी कारागृहात साजरी होणार आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

15:48 October 19

दांडिया कार्यक्रमात गोळीबार करुन पळून गेलेल्या तिघांना बेड्या

सातारा - सेंट पॉल हायस्कूलमध्ये दांडिया कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीवरुन पिस्तुलांमधून एकावर गोळीबार करत दहशत माजवून पळून गेलेल्या तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. एका संशयिताच्या घरी ते लपून बसले होते. पोलिसांनी छापा मारून त्यांना अटक केली. अमिर सलिम शेख, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे आणि साहिल विजय सावंत, अशी संशयितांची नावे आहेत.

15:31 October 19

परळी शहर पोलिसांनी अवैध देशी दारु विकताना तिघांना पकडले

बीड - परळी शहर पोलिसांनी अवैध देशी दारु विकताना तिघांना पकडले आहे. देशी दारूसह विदेशी दारूचा 7274 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. परळी शहर पोलिसांनी आज सकाळी बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात अचानक छापे टाकले. देशी दारुची अवैधपणे विक्री करणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 7274 रुपयांची देशी दारु जप्त केली.

14:59 October 19

क्रूझ ड्रग्ज केस तपास अहवाल सादर

मुंबई -क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एसआयटीने सक्षम अधिकाऱ्याकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात संबंधित लोकांच्या संपूर्ण चौकशीचे सर्व तपशील आहेत. मात्र त्याचा तपशील उघड करू शकत नाही, असे NCB चे डेप्युटी डायरेक्टर जनरल ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. एनसीबी तपासात 'अनियमितता' झाल्यासंदर्भात काही नोंद आहे का, याबाबत विचारल्यावर त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.

14:38 October 19

समीर वानखेडे यांची ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात तक्रार

मुंबई - समीर वानखेडे यांची ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात तक्रार. छळ केल्याचा आहे आरोप. ज्ञानेश्वर सिंग हे आहेत एनसीबीचे संचालक

14:25 October 19

ठाण्यात २१ तारखेला दूध विक्रेत्यांचा लक्षणिक संप

ठाणे -ठाण्यात २१ तारखेला दूध विक्रेत्यांचा लक्षणिक संप. ऐन सणासुदी ठाण्यात २१ तारखेला दूध नाही. चार रुपये दुधाच्या भावात वाढ झाली आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ संप. तर गेल्या अनेक वर्षांपासून एक पैसाही दूध विक्रत्यांचे कमिशन वाढले नाही. १० टक्के कमिशन हवे यासाठी हा लक्षणिक संप असणार आहे. २१ तारखेला जवळपास १० लाख लिटर दूध घेतले जाणार नाही.

14:07 October 19

मशाल चिन्हासंदर्भातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

14:05 October 19

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली - मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झालेत. त्यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना 1000 हून अधिक मते मिळाली आहेत.

13:08 October 19

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

नवी मुंबई - शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या मातोश्रीच्या निष्ठावंत शिलेदारांची पोलीस बळाचा गैरवापर करून छळवणूक सुरू करण्यात आली आहे. या गुंडगिरीचा कडाकडून विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

13:02 October 19

वरठी पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन

भंडारा - वरठी पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन. कामात कसूर केल्याच्या कारणावरून केले निलंबित.

12:54 October 19

बांद्रा ते भावनगर दिवाळी सणासाठी परवापासून खास ट्रेन

मुंबई -दिवाळीचा सण कोरोना महामारीच्या साथीनंतर दोन वर्षानी अत्यंत उत्साहाने देशभर साजरा होण्याची तयारी सुरू झालेली आहे. बाजारपेठ गजबजलेल्या दिसत आहेत. नातेवाईकांकडे जाण्यासाठी प्रवाशांनी आरक्षण केलेले आहे. मात्र मेल एक्सप्रेस गाड्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे पश्चिम रेल्वेने बांद्रा ते भावनगर अतिरिक्त क्षणासाठी ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय.

12:40 October 19

बिबट्याच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार

सांगली - बिबट्याच्या हल्ल्यात वाळवा तालुक्यातल्या काळमवाडी या ठिकाणी आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दहा मेंढ्या बेपत्ता झाला आहेत. यामुळे संदीप वीरकर या मेंढपाळाचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

12:25 October 19

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेची गरज - रुचिरा कंबोज

मुंबई - भारताने गेल्या 2 वर्षांपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेची गरज असल्याची भूमिका लावून धरली आहे. सध्याची रचना ही 1945 मधली आहे. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, असे मत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी आज मुंबईत मांडले.

12:06 October 19

भाऊबीजेआधी बोनस वेतवाढीची ओवाळणी टाका अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन - आशा वर्करनी दिला इशारा

मुंबई -भाऊबीजेआधी बोनसची, वेतवाढीची ओवाळणी टाका नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरीच बहिणी धडकणार. राज्यातील आशा वर्कर महिलांचा इशारा. राज्यातील 70,000 आशा वर्करनी दिला इशारा. दिवाळीपूर्वी बोनस वेतनवाढ नाही मिळाली तर आशा आरोग्य कर्मचारी महिला मुख्यमंत्र्यांच्या घरी ओवळणीला जाणार आहेत.

11:58 October 19

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शिरसाट यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन केली चौकशी

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीची लीलावती रुग्णालयात जाऊन केली चौकशी. प्रकृतीची अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. शिरसाट यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. त्यांच्याकडून सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. आमदार शिरसाट यांच्यावर काल मुंबईत आल्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय व्हावे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी आमदार शिरसाट याना दिला.

11:50 October 19

दहावी परीक्षेचा अर्ज भरण्याचे वेळापत्रक दिवाळीनंतरच करा - शिक्षकांची मागणी

मुंबई - राज्यातील हजारो शाळा दिवाळी सुट्टीनंतर जर 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार असतील तर दहावीच्या परीक्षेची अर्ज भरण्याचे वेळापत्रक दिवाळीनंतरच करा. मुख्याध्यापक संघटनेची मागणी

11:45 October 19

अँटोनियो गुटेरेस यांनी आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई - यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले आहेत. या वर्षी जानेवारीत त्यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे.

11:15 October 19

बारावी परीक्षांच्या ऑनलाईन अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार, 22 ऑक्टोबरपासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ पुणे यांच्याकडून बारावीच्या 2023 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च परीक्षे करिता भरावयाचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ केलेली आहे. आता विद्यार्थ्यांना पाच नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदन पत्र भरता येणार आहे .तसेच चलन डाऊनलोड करून बँकेत ते शुल्क देखील भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे। ही मुदतवाढ नियमित विद्यार्थ्यांच्या साठी आहे.

09:58 October 19

बिहारमधील इयत्ता 7 वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचे उल्लेख

बिहारमधील इयत्ता 7 वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचे म्हटले आहे. ही मानवी चूक होती, असे शाळेचे मुख्याध्यापक एस.के.दास यांनी म्हटले आहे.

09:34 October 19

डोंबिवली स्थानकादरम्यान आत्महत्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकलला उशिरा

डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. डोंबिवली स्थानकादरम्यान आत्महत्याचा प्रयत्न केल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत.

09:10 October 19

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 62 उमेदवारांची यादी

आगामी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 62 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सीएम जयराम ठाकूर सेराजमधून, अनिल शर्मा मंडीतून आणि सतपाल सिंग सत्ती उनामधून निवडणूक लढवणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

09:09 October 19

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात उच्च न्यायालयात याचिका आज सुनावणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व कुटुंबियांचे मालमत्तेची चौकशी करण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही.

08:06 October 19

साखर निर्यातीसाठी खुले धोरण करा, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबईदेशात सध्या साखर निर्यातीसाठी खुले धोरण असावं असं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सध्या साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत आहे. त्यामुळे साखर निर्यातीवर बंधन आहेत. याचा फटका साखर कारखान्यांना बसत असल्याने ही पद्धत बदलून पंतप्रधानांनी साखर निर्यात खोली करावी, अशी विनंती या पत्रातून मुख्यमंत्री एकदाच शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. साखर निर्यातीत कोटा पद्धत असल्यामुळे या पद्धतीला साखर कारखानदार विरोध करत आहेत.

07:37 October 19

नांदेड जिल्ह्यात वीज पडून चार ठार

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात सोयाबीन, ज्वारीसह इतर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवितहानीही प्रचंड झाली आहे. मंगळवारी (१८ ऑक्टाेबर) नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर भागात जाेरदार हजेरी लावली. वीज पडून हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा-मंगरूळ येथे शेतमजूर व लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथील तीन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला

07:22 October 19

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसआयच्या टार्गेटवर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणाकडून अलर्ट जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसआयच्या टार्गेटवर आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

06:48 October 19

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले आहेत. या वर्षी जानेवारीत त्यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करतील. ते आयआयटी मुंबई येथे देखील संबोधित करतील.

06:40 October 19

नाशिकमधील 55 खाजगी बसवर कारवाई, दोन लाखांचा दंड वसूल

नाशिकच्या औरंगाबाद रोडवर खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या भीषण अपघात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर 43 प्रवाशी जखमी झाले होते. या बस अवैधरित्या जादा प्रवाशी बसवण्यात आल्याच समोर आल्यानंतर आता नाशिक मध्ये आरटीओ आणि पोलिसांमार्फत खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 142 बसची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 55 बसवर कारवाई करण्यात येऊन 1 लाख 98 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

06:21 October 19

Breaking News बारावी परीक्षांच्या ऑनलाईन अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार, 22 ऑक्टोबरपासून सुरुवात

मुंबईकाँग्रेसला 24 वर्षात पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्याचे राज्यासह देशातील राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Last Updated : Oct 19, 2022, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details