मुंबई - मुंबई मध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असताना गेल्या आठ ते दहा दिवसात मुंबईमधील रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. येत्या दिवाळी सणादरम्यान कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याचा इशारा राज्य सरकराने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Breaking News Live : मराठी पाट्या न लावणाऱ्या २६७२ दुकानदारांना पालिकेची नोटिस
20:56 October 18
दिवाळी दरम्यान मुंबईत कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन
20:55 October 18
मराठी पाट्या न लावणाऱ्या २६७२ दुकानदारांना पालिकेची नोटिस
मुंबई -मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावणे सरकार आणि पालिकेने बंधनकारक केले आहे. त्या नंतरही बहुसंख्य दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याने सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने तपासणी सुरु केली आहे. आतापर्यंत १२००१ ठिकाणी केलेल्या तपासणीत २६७२ दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले असून संबंधितांना नोटिस देण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
19:41 October 18
दिवाळीत मुंबईमध्ये कोरोना पुन्हा पसरण्याची शक्यता
दिवाळी दरम्यान मुंबईत कोरोना पुन्हा पसरण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
19:28 October 18
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET चा प्राथमिक निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने पहिल्या फेरीचा तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. हा निकाल cetcell.mahacet.org या वेबसाईटवर पाहता येईल. विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड द्यावा लागेल.
19:21 October 18
दाऊदच्या हस्तकांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात 20 वर्षानंतर उद्या सुनावणी
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या करणारे डॉन अरुण गवळीच्या व्यक्तींना जे जे रुग्णालयात दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी गोळी मारल्यानंतर मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देश हा धरून गेला होता. या प्रकरणातील दाऊद इब्राहिमचे हस्तक यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात 20 वर्षानंतर उद्या 19 ऑक्टोंबरला खटला सुरू होणार आहे.
18:46 October 18
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, रेल्वेची जमीन हस्तांतरणाच्या करारावर दिल्लीत शिक्कामोर्तब
नवी दिल्ली - धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन हस्तांतरित करण्याच्या निश्चित करारावर आज दुपारी नवी दिल्ली येथे सही करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात ही स्वाक्षरी करण्यात आल्याचा मला आनंद होत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
18:40 October 18
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, 20 तारखेला पुढील सुनावणी
100 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलाने देशमुख यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण केला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग 20 ऑक्टोबर रोजी सीबीआयच्या वतीने युक्तिवादांना उत्तर देतील. तोपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
18:34 October 18
सहा रबी पिकांचा किमान हमी भाव वाढवला, कॅबिनेट बैठकीत निर्णय
नवी दिल्ली - केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे.
17:20 October 18
शिवप्रेमींना दुःख झाले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो - रोहित पवार
समता, बंधुता, एकता व धर्मनिरपेक्षतेचे स्वराज्य स्थापन करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उंचीची जगात कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. मुळात महाराजांच्या उंचीची तुलना करणे हेच आक्षेपार्ह आहे. तरीही कुणा शिवप्रेमींना दुःख झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते वादग्रस्त फोटो डिझाईनसंदर्भात बोलत होते. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्यावरील भागात शरद पवारांची प्रतिमा होती.
16:30 October 18
जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हणून घोषित करणार
जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करणार असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे ते म्हणाले आहेत.
15:31 October 18
केदारनाथला जाणाऱ्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा चालक महाराष्ट्रातील
केदारनाथला जाणाऱ्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा चालक महाराष्ट्रातील आहे. त्यांचे नाव श्री अनिल सिंह आहे. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
14:48 October 18
मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
मुंबई -मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदा मुंबईत पावसाळा लांबला आहे. यामुळे पावसाळी आजाराचे रुग्ण ऑक्टोबर महिन्यातही नोंद होत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान मलेरिया, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
14:38 October 18
उमर खालिदची जामीन याचिका फेटाळली
दिल्ली उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीशी संबंधित मोठ्या कट प्रकरणातील आरोपी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदची जामीन याचिका फेटाळली.
14:23 October 18
खेळपट्ट्या आणि खेळाडूंच्या दुखापतीवर लक्ष केंद्रित करणार - रॉजर बिन्नी
बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने प्रामुख्याने दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. एक म्हणजे खेळाडूंच्या दुखापतींना प्रतिबंध करणे. कारण विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. त्यामुळे संपूर्ण योजनेवर परिणाम झाला. दुसरे, मला देशातील खेळपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे रॉजर बिन्नी यांनी स्पष्ट केले.
14:05 October 18
खड्ड्यांमुळे बाईकस्वाराचा गंभीर अपघात, अपघातग्रस्त युवकाचे रोडवर झोपून आंदोलन
नवी मुंबई - ठाणे बेलापूर रोडवरील घणसोली स्थानकाच्या बाहेर असलेल्या मुख्य मार्गांवरील खड्ड्यात दुचाकी गेल्यामुळे एक बाईकस्वार गंभीर जखमी झाला. या रोडवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. असे अपघात नेहमी घडत असतात. रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जावेत तसेच या खड्ड्यांसाठी जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई व्हावी याकरिता अपघातग्रस्त युवकांने गंभीर जखमी अवस्थेत अपघातस्थळी झोपून आंदोलन केले. वाहतूक पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. तसेच या युवकाला मनपा रुग्णालयात दाखल केले.
13:48 October 18
संजय राऊत म्हणाले, सबकुछ OK चिंता करू नका, लवकर बाहेर येणार
संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कोर्टात भेट. मुंबई सत्र न्यायालयात झाली भेट. दोघांमध्ये 5 मिनिटे चर्चा. खडसेंनी केली राऊत यांची आस्थेने विचारपूस. राऊतांनीही दिले हसून उत्तर. सबकुछ OK चिंता करू नका असे म्हणाले राऊत. राऊत पुढे म्हणाले, मी लवकरच येणार बाहेर.
13:42 October 18
संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला
मुंबई -संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोंबर रोजी पुढील सुनावणी होईल. संजय राऊत यांना भेटायला येणाऱ्यांवर पोलिसांची साध्या वेशात पाळत सुरू आहे. राऊतांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची पोलिस नोंद ठेवत आहेत. कोर्टात होणाऱ्या सुनावनीचा पोलिसही घेत आहेत आढावा.
12:55 October 18
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद?
मुंबई - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मतभेद झाल्याचे समजत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीतील माघार व कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाराजी हासुद्धा विषय आहे.
12:30 October 18
पोलीस कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी ठाण्यात आंदोलन
ठाणे - पोलीस कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी ठाण्यात आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समाजसेविका अश्विनी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलिसांना एक महिन्याचा पगार बोनस स्वरूपात अन्यथा वर्षातील शनिवारी सुट्टीचा दिवस भरून देण्यात यावा. सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या सरकारने पोलिसांचा देखील विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बोनस न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
12:25 October 18
आम्ही श्रीरामाची तुलना राहुल गांधींशी करत नाही - नाना पटोले
मुंबई - आम्ही श्रीरामाची तुलना राहुल गांधींशी करत नाही. हे काम फक्त भाजपचे लोक करतात. राहुल गांधी हे माणूस असून मानवतेसाठी ते देशासाठी काम करत आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केल आहे. राजस्थानचे मंत्री परसादी लाल मीना यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
12:21 October 18
केदारनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले
केदारनाथ -फाटा येथून केदारनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
11:53 October 18
गुलटेकडी बाजार समितीवर स्वाभिमानीची धडक, आले सौदे बंद पाडले, दोन टन आले जप्त
पुणे - आले उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सातारा, सांगली व पुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुलटेकडी मार्केटमध्ये धडक मारण्यात आली. राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवा प्रदेश अध्यक्ष अमर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मंगळवारी पहाटे मारण्यात आली. पहाटे तीन वाजता सर्व कार्यकर्ते व शेतकरी बाजार समितीमध्ये घुसले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, एकच गट्टी राजू शेट्टी, आले उत्पादकांची लूट थांबलीच पाहिजे, आलेची खरेदी विक्री सरसकट झाली पाहिजे. वर्गवारी न करता सौदे झाले पाहिजेत. जुने नवे आले एकत्रच खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी वर्गवारी करून आले खरेदी केले होते ते दोन टन आले जप्त करून बाजार समितीच्या हवाली करण्यात आले.
11:47 October 18
अवकाळी पावसाची मदत कधी मिळणार - अजित पवारांचा सवाल
दिवाळीच्या तोंडावर चक्रीवादळाचा धोका असल्याने संबंधित ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश राज्य सरकारने द्यावे. यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असे ते म्हणालेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले मदत अजूनही मिळालेली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही मदत कधी मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
11:44 October 18
रशियन लष्करी विमान अपघातात मृतांची संख्या १३ वर
मॉस्कॉ - येस्क येथे रशियन लष्करी विमान अपघातात तीन मुलांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १३ झाली आहे
11:10 October 18
ताजेश्वरी यादव यांना दिलेला जामीन रद्द करा, सीबीआयची न्यायालयाकडे मागणी
बिहारचे उपमुख्यमंत्री ताजेश्वरी यादव यांना दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे. कथित आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपींपैकी तो एक आहे. सीबीआयने म्हटले आहे की तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद संबोधित करताना सीबीआय अधिकार्यांना धमकावले होते.
10:54 October 18
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. अंधेरी पूर्व, पोटनिवडणूक माघार व इतर विषयांवर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असण्याची शक्यता आहे.
10:43 October 18
गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावात मुक्तीपथ तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
गडचिरोली जिल्ह्यातील कोचीनारा, दवंडी, कोटगुल येथे मुक्तीपथ कार्यालय गडचिरोली तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा आयोजन करण्याचे उद्देश म्हणजे गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालणे, अवैध दारू नियंत्रणामध्ये स्थानिकांचा सहभाग, नागरिकांमध्ये जनजागृती व व्यसनमुक्तीचा उपचार. सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
09:56 October 18
बीसीसीआयची मुंबईमधील ताजमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा
भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली, माजी IPL चेअरमन राजीव शुक्ला आणि इतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पोहोचले.
09:54 October 18
देशात २४ तासात १५१२ कोरोनाचे रुग्ण
देशात २४ तासात १५१२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १,९१९ रुग्ण बरे झाले आहेत.
09:54 October 18
शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 573.84 ने वधारला
शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 573.84 ने वधारून 58,984.82 अंकांवर पोहोचला.
09:50 October 18
कोल्हापूर पोलीस दलात खळबळ
स्पोर्टमन असलेल्या सहाय्यक फौजदार महेश मारूती मगदूम याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याला लवकर पदोन्नती देखील मिळालेली आहे. अष्टपैलू कबड्डीपटू म्हणून त्यांचा लौकीक असून तो राष्ट्रीय खेळाडू आहे. खेळाडू असलेल्या पोलिसावर पोक्सोचा गुन्हा दाखल होणे ही बाब कोल्हापूर पोलीस दलासाठी लाजीरवाणी ठरली आहे.
08:48 October 18
शोपियान येथे दहशतवाद्यांनी केला हँडग्रेनेडचा स्फोट, दोन मजूर ठार
हरमेन, शोपियान येथे दहशतवाद्यांनी हँडग्रेनेडचा स्फोट केला. या रात्री मोनीश कुमार आणि राम सागर हे परप्रांतीय मजूर ठार झाले.
08:36 October 18
संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अँब्युलन्सद्वारे हलवले मुंबईला
संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईला हलविले आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार होणार आहेत.
08:11 October 18
राष्ट्रीय तपास एजन्सीने विविध राज्यांत टाकले छापे
राष्ट्रीय तपास एजन्सीने आज पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-NCR प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांची तस्करी करणारे एनआयएच्या रडारवर आले आहेत.
07:23 October 18
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 90 व्या इंटरपोल महासभेला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 90 व्या इंटरपोल महासभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीला 195 INTERPOL सदस्य देशांचे मंत्री, देशांचे पोलीस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
07:18 October 18
वजन कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि खासदाराला मिळणार २३०० कोटी
मी आव्हान स्वीकारले आणि मी जवळपास 32 किलो वजन कमी केले आहे. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले. त्यांना याबद्दल जाणून खूप आनंद झाला. वचन दिल्याप्रमाणे, त्यांनी प्रदेशासाठी 2,300 कोटी रुपयांच्या विकास योजना मंजूर केल्या आहेत, असे उज्जैनचे खासदार अनिल फिरोजी यांनी सांगितले.
07:03 October 18
मटका क्वीन जया छेडाला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
मुंबई कल्याणचे मटका क्वीन जया छेडाला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील कोणतेही पुरावे नसल्यामुळे तसेच आरोपीला अटक केल्यास आरोपीचा अनावश्यक छळ सहन करावा लागेल.
06:56 October 18
पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले, शहरात ठिकठिकाणी साचले पाणी
पुणे: परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुणेसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरोरोज पुणे शहरात पाऊस होत असून दिवसभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्रीच्या वेळेस पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरातदेखील पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
06:27 October 18
Maharashtra Breaking News ताजेश्वरी यादव यांना दिलेला जामीन रद्द करा, सीबीआयची न्यायालयाकडे मागणी
मुंबई राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत सुमारे ७४ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सुद्धा भाजपच क्रमांक एकचा पक्ष (BJP winning Gram Panchayat elections number one party) ठरल्याचे मत राज्याचे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.