पुढील ३-४ तासांत ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे: IMD मुंबई
Breaking News Live : पुढील ३-४ तासांत ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
22:50 August 08
पुढील ३-४ तासांत ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
19:56 August 08
राज्यपालांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाला अटक
मुंबई - राज्यपाल कोश्यारी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ट्विटरवर शिवीगाळ करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सीआययूने कुरार भागातील प्रदीप भालेकर याला अटक केली आहे.
16:30 August 08
उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
मुंबई - उद्याच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अखेर उद्या राज्याला नवे मंत्रिमंडळ मिळणार आहे.
15:16 August 08
Commonwealth Games 2022 : भारताला आणखी एक सुवर्णपदक; पी.व्ही सिंधुची 'गोल्ड'न कामगिरी
बर्मिंघम - बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( Commonwealth Games 2022 ) भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेलचा परभव केला आहे. सिंधूने मिशेलला हीचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली ( Pv Sindhu Won Gold Medal In Badminton ) आहे.
14:28 August 08
ईडीकडून टीईटी घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद
ईडीने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आहे.
13:41 August 08
आज रात्री किंवा उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १५ ऑगस्ट पूर्वी होणार अशा चर्चा रंगू लागलेल्या असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांचे सरकार येऊन ४० दिवसाचा कालावधी लोटून गेला तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. यावरून यांच्यावर सातत्याने टीका होत असताना दुसरीकडे बंडखोर ४० आमदारांचा दबावही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आहे.
13:30 August 08
संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी ईडीचा न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्यानुसार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आले.
13:11 August 08
माझी मेडिकल टेस्ट केल्याशिवाय मी कोर्टात येणार नाही- राऊतांची भुमिका
माझी मेडिकल टेस्ट केल्या शिवाय मी कोर्टात येणार नाही
राऊतांची भुमिका
संजय राऊत यांना जे जे साठी नेलं
माझी मेडिकल टेस्ट केल्याशिवाय मी कोर्टात येणार नाही
राऊतांची भुमिका
13:09 August 08
संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना
संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना झाले आहेत. त्यांना जामिन मिळणार की कोठडी वाढणार हे आज स्पष्ट होणार आहे.
12:30 August 08
मोहसीन अहमद हा इसिसच्या दहशतवाद्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर
मोहसीन अहमद या ISIS सक्रिय सदस्याला पटियाला हाऊस कोर्टात आणले. भारतातील आणि परदेशातील सहानुभूतीदारांकडून दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्यात आणि क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात सीरिया आणि इतर ठिकाणी पाठवण्याच्या आरोपाखाली NIA ने त्याला 25 जून रोजी अटक केली होती.
12:21 August 08
किन्नौरमधील भावनगरजवळ अचानक भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग ५ करण्यात आला बंद
हिमाचल प्रदेशातील किन्नौरमधील भावनगरजवळ अचानक भूस्खलन झाल्याने राष्ट्रीय महामार्ग 5 बंद करण्यात आला. ढिगारा हटवण्यासाठी यंत्रे तैनात करण्यात आली आहे.
12:18 August 08
माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना 3 वर्षांची शिक्षा, सहसचिव यांना २ वर्षांची शिक्षा
दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली. महाराष्ट्रातील कोळसा खाण वाटपात अनियमितता आढळून आल्याने कोळसा घोटाळा प्रकरणात माजी सहसचिव केएस क्रोफा यांना २ वर्ष आणि नागपूर येथील कंपनीचे संचालक एम गुप्ता यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
11:20 August 08
22 कांस्य पदके जिंकून आतापर्यंत 55 पदकांसह इतिहास रचला-लोकसभा अध्यक्ष
मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की बर्मिंगहॅम #CommonwealthGames2022 मध्ये भारतीय दलाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताने 18 सुवर्ण पदके, 15 रौप्य पदके आणि 22 कांस्य पदके जिंकून आतापर्यंत 55 पदकांसह इतिहास रचल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
11:05 August 08
दादर शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले
दादर शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले
गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते
स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे
माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पहाणीकरता दाखल
10:59 August 08
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सीकरमधील खातू श्यामजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 20,000 रुपयांची मदत जाहीर केली.
09:49 August 08
आम्ही आरोपींना मोकळे सोडणार नाही-उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक
मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून, आम्ही आरोपींना मोकळे सोडणार नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. श्रीकांत त्यागी मारहाण प्रकरणी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोएडाच्या सेक्टर 93 मधील ग्रँड ओमॅक्स येथे श्रीकांत त्यागी यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर बांधकाम,नोएडा प्रशासनाने पाडले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यागी येथील निवासी सोसायटीत एका महिलेला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसले होते.
09:35 August 08
फार्मा सिटी येथील औषध कंपनीला लागलेल्या आगीत दोघे जखमी
अनकापल्ली येथील परवाडा येथील जवाहरलाल नेहरू फार्मा सिटी येथील औषध कंपनीला लागलेल्या आगीत दोघे जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
08:52 August 08
ओव्हरलोड ट्रक थांबविल्याने चालकांची खासदार रंजिता कोळी यांच्या वाहनावर दगडफेक
रात्री खासदारांनी आम्हाला सांगितले की त्या दिल्लीहून जात असताना ओव्हरलोड ट्रक दिसले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर 2-3 ट्रक थांबले, तर इतर फरार झाले. पळून जाताना त्यांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली व हल्ला केला, असे एएसपी आरएस काविया यांनी सांगितले. मी सुमारे 150 ट्रक ओव्हरलोड केलेले पाहिले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून गेले. त्यांना वाटले की मी गाडीत आहे. अशा प्रकारे त्यांनी दगडफेक केली, माझी गाडी फोडली. मला मारले जाऊ शकले असते. हा माझ्यावर हल्ला आहे, पण मी घाबरणार नाही, असे भाजप खासदार रंजिता कोळी यांनी सांगितले.
08:39 August 08
एनआयएचे डोडा आणि जम्मूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे
एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) डोडा आणि जम्मूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
08:38 August 08
07:44 August 08
डहाणूत जबरदस्तीने धर्मांतरणाचा डाव उधळला ; चार मिशनरींना अटक
पालघर-/डहाणू- आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला. डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे घरात एकटी असलेल्या वयस्कर आदीवासी महीलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारणायास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे .
07:25 August 08
बॉक्सर सागरने मिळविले रौप्यपदक
पुरुषांच्या सुपर हेवीवेट फायनलमध्ये इंग्लंडच्या डेलीशियस ओरीकडून पराभूत झाल्याने बॉक्सर सागरने रौप्यपदक जिंकले
07:25 August 08
मुलीच्या हत्येप्रकरणी नागपूरच्या पालकांना अटक
मुलीच्या हत्येप्रकरणी नागपूरच्या पालकांना अटक
आम्हाला माहिती मिळाली की 5 वर्षांच्या मुलीचे पालक तिचा मृतदेह नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आले आणि तेथून पळून गेले. तपासादरम्यान, आम्हाला पालकांच्या फोनवर काही व्हिडिओ आढळले ज्यात मुलीला ते मारहाण करत होते, असे नागपूरचे पोलीस आयुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल. आम्ही आई आणि वडिलांसह 3 जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुलीच्या पालकांनी काही विधी केले आणि एक व्हिडिओ देखील शूट केला, जो आम्ही त्यांच्या फोनवरून जप्त केला, असेही त्यांनी सांगितले.
07:24 August 08
शरथ कमल-श्रीजा अकुला यांनी जिंकले सुवर्णपदक
भारतीय पॅडलर्स शरथ कमल-श्रीजा अकुला यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले
07:24 August 08
देशासाठी पदक मिळवणे ही चांगली भावना-महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर
खेळावर आमचे पूर्ण नियंत्रण होते, पण शेवटच्या काही षटकांमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या. देशासाठी पदक मिळवणे ही चांगली भावना आहे. आम्ही आमच्या कामगिरीवर समाधानी आहोत, असे महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.
07:24 August 08
सोसायटीमध्ये घुसलेल्या सात जणांना अटक
ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये घुसलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. एसएचओ फेज 2, सेंट्रल नोएडा सुजीत उपाध्याय यांनी निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले, त्यांना निलंबित करण्यात आले आहे, पुढील तपास सुरू असल्याचे नोएडा पोलिस आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले.
07:24 August 08
पूंछ ब्रिगेडने आयोजिक केला आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम
जम्मू आणि काश्मीर: 'आझादी का अमृत महोत्सव' च्या निमित्ताने पुंछमध्ये पूंछ ब्रिगेडने आयोजित केलेल्या लष्करी जवान आणि नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केला.
07:23 August 08
किदाम्बी श्रीकांतने कांस्यपदक जिंकले
शटलर किदाम्बी श्रीकांतने कांस्यपदक जिंकले. त्याने सिंगापूरच्या जिया हेंग तेहचा पराभव केला
07:23 August 08
बलात्काऱ्यांची भाषा वापरणे थांबवा- दिल्ली महिला आयोग
दिल्ली महिला आयोगाने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शब्दांच्या वापराबद्दल सावध केले. बलात्काऱ्यांची भाषा वापरणे थांबवण्यास सांगितले
07:23 August 08
मुंबई दर्शन अधिकच होणार सोयीस्कर
बेस्टने दक्षिण मुंबईतील पर्यटकांसाठी हॉप ऑन-हॉप ऑफ (हो-हो) एसी बस सेवा सुरू केली आहे. प्रवासी 150 रुपयांची तिकिटे खरेदी करू शकतात. संपूर्ण दिवस पर्यटक बसमधून प्रवास करू शकतात. ते मार्गावर चालणाऱ्या इतर बसेसमध्ये देखील चढू शकतात. हे पर्यटकांसाठी 'मुंबई दर्शन' अधिक मनोरंजक आणि सोयीस्कर बनवेल, असे बेस्टचे जीएम लोकेश चंद्र यांनी सांगितले.
07:23 August 08
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नेतन्ना विमा योजना तेलंगणा सरकारकडून सुरू
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विणकर समाजाला शुभेच्छा दिल्या आहे. पात्र लाभार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास विणकरांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणारी "नेतन्ना विमा" योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.
07:23 August 08
समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या कारला ट्रकची धडक
समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या कारला ट्रकने धडक दिली त्यानंतर ती 500 मीटरपेक्षा जास्त खेचली गेली. इटावा येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. तपास सुरू असल्याचे मैनपुरीचे एसीपी कमलेश दीक्षित यांनी सांगितले.
07:23 August 08
सागरी किनारी बांधलेल्या भिंतीमुळे चेल्लनममधील रहिवाशांना दिलासा
नव्याने स्थापित केलेल्या टेट्रापॉड-आधारित सीवॉलमुळे एर्नाकुलम जिल्ह्यातील समुद्र धूप-प्रवण चेल्लनममधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
07:22 August 08
विशाखापट्टणममध्ये 300 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन काढण्यात आली रॅली
विशाखापट्टणममध्ये 300 मीटर लांब राष्ट्रध्वजासह 'आझादी का अमृत महोत्सव' रॅली काढण्यात आली.
06:49 August 08
मुंबईत पाऊस सुरू
मुंबई शहराच्या काही भागात पावसाने झोडपले, ईस्टर्न एक्स्प्रेस वेचे दृश्य
06:48 August 08
भारतीय महिला क्रिकेट संघाला रौप्यपदक, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोमांचकारी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला.
06:36 August 08
Maharashtra Breaking news : ईडीकडून टीईटी घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद
मुंबई-शिवसेना नेतेसंजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कस्टडी पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आज पुन्हा राऊत यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांची पुन्हा कस्टडी वाढविण्याची ईडीकडून मागणी होण्याची शक्यता आहे.