महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking : 'उल्लू'च्या सीईओ आणि कंट्री हेडवर गुन्हा दाखल

breaking news and live updates
breaking news and live updates

By

Published : Aug 5, 2021, 7:40 AM IST

Updated : Aug 5, 2021, 10:35 PM IST

22:26 August 05

'उल्लू'च्या सीईओ आणि कंट्री हेडवर मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई - उल्लू डिजिटल प्रा. लि. कंपनीचे सीईओ विभु अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या अंधेरी कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये २८ वर्षीय लिगल अॅडव्हायझर मुलीला स्टोर रूममध्ये घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन कपडे काढून आरोपींनी समोरच अंतर्वस्त्र घालण्यास भाग पाडल्याचा आरोप तरुणीने केला आहे. १८ जूनची ही घटना असून अंबोली पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला आहे.

19:43 August 05

कोकणासाठी म्हाडाची ८ हजार २०५ घरे तर मुंबईसाठीचा निर्णय आठ दिवसांत - जितेंद्र आव्हाड

मुंबई -म्हाडामार्फत कोकण मंडळातर्फे ८ हजार २०५ घरांची सोडत येत्या ऑक्टोबर अखेरीस निघणार आहे. २३ ऑगस्टपासून अर्ज विक्रीला सुरुवात होईल. ठाणे, मीरा रोड, विरार, कल्याण आणि सिंधुदुर्ग भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच मुंबईतील घरांसाठी आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही आव्हाड म्हणाले.

19:20 August 05

राज्यपालांच्या दौऱ्यावरून काही लोकांना मळमळ, देवेंद्रांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

मुंबई -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी दौऱ्यावरून महाविकास आघाडी सरकारने टीका केली आहे. तर, विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे.'संविधानानुसार राज्यपालांना सगळे अधिकार आहेत. परंतु, काही लोकांना त्याची मळमळ होत आहे', असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार फटकारले आहे.

18:32 August 05

ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार दिखावा करत आहे - अहिर

नागपूर -ओबीसी समाजाला आरक्षण आणि न्याय देण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पार्टीत आहे, असे वक्तव्य हंसराज अहिर यांनी केले आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले पक्ष केवळ दिखावा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

18:28 August 05

खंडणी, पैसे वसुलीच्या गुन्ह्यातील परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांच्या प्रकरणाचा ठाणे एसआयटी करणार तपास

ठाणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग,एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 28 लोकांवर ठाणे पोलिसांत केतन तना, सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्या तक्रारींवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम करणार आहे. खंडणी, पैसे वसुली आणि धमकावणे याबाबत गुन्हा दाखल झाला होता. ठाणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिली.

18:22 August 05

संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा - रवी राणा

अमरावती - मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झालं आहे. अमरावतीमध्ये देखील अनेकांची घरे पडली आहेत. अनेक शेतकरी वाहून गेलेत. पिकांचं देखील नुकसान झालं आहे, तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही. अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झालेत, याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केलं आहे.

18:21 August 05

विमान प्रवाशांना दिलासा! मुंबईवरून पाच हवाईमार्ग सुरु

मुंबई -राज्यासह देशभरातील काेराेनाचे संक्रमण कमी होत असल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) टर्मिनल २ वरून देशांतर्गत 5 मार्ग पुन्हा सुरु केले आहेत. यामध्ये बरेली, विशाखापट्टणम, तिरूपती, अजमेर आणि पोरबंदरचा समावेश आहे.

17:12 August 05

जबाबदारीचे भान राखूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल - उद्धव ठाकरे

मुंबई- कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात शिथिलता आणली आहे. लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. सगळेच बंद राहील, असे नाही. सर्व जबाबदारीचे भान राखूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

17:10 August 05

अँटिलिया स्फोटकप्रकरणी एनआयएने फेटाळला सचिन वाझेंचा जामीन अर्ज

मुंबई - अँटिलिया स्फोटकप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दणका मिळाला आहे. त्यांचा सचिन वाजेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळला आहे.

16:01 August 05

राज्य सरकार अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची सीबीआयची हायकोर्टात तक्रार

मुंबई -राज्य सरकार अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार सीबीआयने केली आहे. अनिल देशमुख प्रकरणातील कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने धमकावल्याची तक्रार सीबीआयने हायकोर्टात केली आहे. याप्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. 11 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

15:46 August 05

पत्रकारांच्या लोकल प्रवासासंबंधी सकारात्मक तोडगा काढावा - हायकोर्ट

मुंबई - मराठी पत्रकार संघाने पत्रकारांना लोकलमध्ये परवानगीसाठी याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्टाने राज्य सरकारला तोगडा काढण्याचे आदेश दिले आहेत. लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी एखादे 'स्मार्ट कार्ड' सुरू करण्याचा विचार का करत नाही, असेही हायकोर्टाने राज्य सरकारला सुचवले आहे.

15:42 August 05

अशोकराव चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा - विनायक मेटे

वाशिम - केंद्र सरकारने 102व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करून आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अशोकराव चव्हाण फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत. त्यांना मराठा आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यांनी मराठा आरक्षणचे वाटोळे केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना साथ देत आहेत असे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

14:12 August 05

संसदेच्या कामकाजात बाधा येत असल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता येईना - संभाजीराजे छत्रपती

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सभापतींनी तीन वेळा प्रश्न मांडण्यासाठी वेळ देखील दिला. मात्र सत्ताधारी व विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटून वारंवार कामकाज स्थगित होत आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही संसदेत मांडता आला नाही. इतरही अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी सामंजस्याने एकत्र बसून विषय सोडवावेत. मात्र त्याकरिता संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये, असे आवाहन राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

14:06 August 05

तोकडे कपडे घातल्याने तरुणींना मारहाण प्रकरणी मलंगगड परिसरातून 5 जणांना अटक

तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण व विनयभंग प्रकरणी मलंगगड परिसरातून पाच जणांना अटक कऱण्यात आली आहे. 5 पैकी  3 जण अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती

14:02 August 05

जुहू किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग

मुंबईच्या जुहू बीचवर जवळपास 5 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावरील पाण्यात तेलाचा तवंग आढळून आला आहे. त्यामुळे जुहूच्या किनाऱयावरील वाळू काही झाली आहे. मात्र हा तेलाचा तवंग पाण्यात कसा आला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. या तेलाच्या तवंगामुळे जुहूचा किनारपट्टी प्रदुषित झाली आहे.

13:45 August 05

मुंबईत पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना स्वतंत्र लोकल पास देण्याची व्यवस्था करा - मुंबई हायकोर्ट


मुंबईत पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना स्वतंत्र लोकल पास देण्याची व्यवस्था करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली. मुख्य न्यायाधीशांनी ही महत्वपूर्ण सूचना आज केली. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या बाबतीत, पुढील गुरुवारपर्यंत प्रकरण पुढे ढकलण्यात आली आहे.

13:23 August 05

राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही- फडणवीस

संविधानाप्रमाणे राज्यपालांना सर्व अधिकार आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी राज्यपालांच्या मराठवाड्यातील दौऱ्यावरून सुरू झालेल्या वादावर दिली आहे. तसेच मराठा आरक्षण बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही, सरकार जबाबदारी ढकलत आहे, अशोक चव्हाणांनी पुढाकार घेऊन तोडगा काढवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

13:20 August 05

देवेंद्र फडणवीस यांची नायगाव येथील पोलीस वसाहतीला भेट

मुंबई - परळ येथील नायगाव येथील नवीन पोलीस वसाहतीला भेट ही राजकीय नाही तर रहिवाशांच्या वेदना समजून घेण्यासाठी आलो आहे, नायगाव मधील पोलीस वसाहतींचा प्रश्न सोडवणार आहे. या वसाहती रिपेअर करता येऊ शकतात,  पोलिस विभागाने याचा आढावा घेतला पाहिजे, पोलीस वसाहतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, ती करावी. यासंदर्भात  मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

13:15 August 05

विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला - उदय सामंत

नांदेड मधील वापरात असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन माननीय राज्यपाल यांच्या हस्ते करून काय सिद्ध होणार? जुन्या इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टाहास का? विद्यापीठाने जुन्या इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करून राज्यपालांचा अवमान केला आहे. माननीय राज्यपालांच्या प्रशासकीय यंत्रणेने ही माहिती घ्यायला हवी होती. राज्यपालांच्या हस्ते नवीन इमारत, नवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यापीठातील नवीन वसतिगृह, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम असे समारंभ करणे हा त्यांच्या पदाचा सन्मान ठेऊन घेणं अपेक्षित आहे. चार वर्षे वापरात असलेल्या इमारतीचे उद्घाटन नाही,अशी टीका उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

13:13 August 05

जबबादारीचे भान ठेऊन लोकल सुरू करण्याचा निर्णय घेणार - मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई  - मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन पार पडले,  नव्या दूरदृष्टीचा विचार करून पालिका इमारतीचे बांधकाम झाले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले

या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जिम सुविधा,  देशातील पाहिलं वॉर्ड ऑफिस असेल असेही ते म्हणाले. तसेच जे मुंबईत पहिलं बनत मग देशात , असे ठाकरे म्हणाले

  • कोरोनामुळे पॉझिटिव गोष्टींकडे आपण लक्ष देतो
  • महत्त्वाचे कागदपत्रांचे काम इथेच होतो
  • धारावी सारख्या झोपडपट्टीत करून आला हरवलं
  • रुग्ण संख्या कमी आहे तिकडे शिथिलता आणली आहे
  • लोकल संदर्भात जबाबदारीच भान ठेवून निर्णय घेणार
  • ज्या भागात शिथीलता आणलेली नाही तेथील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये
  • इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दिलासा मिळेल, असे काम करावे
  • येताना डोक्यावर टेन्शन असले तरी जाताना तो हसत गेला पाहिजे, अशा प्रकारे काम करा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सूचना

12:58 August 05

पेगासस राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे, त्यावर चर्चा व्हावी - संजय राऊत

12:39 August 05

बीकेसी लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा

मुंबईतील BKC मधील जंबो कोविड सेंटरमध्ये लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र लसीकरण केंद्रावर गेलेल्या नागरिकांना लसच मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या नागरिकांना आज येण्यास सांगण्यात आले होते. त्यांना देखील लस मिळाली नसल्याचे एका व्यक्तीने सांगितले

12:32 August 05

घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात शपथपत्र सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला आदेश

11:30 August 05

नाहीतर तिथे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर मध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने कोरोनाची RT-PCR टेस्ट बंधनकारक करणे योग्य नाही. त्यांना हा निर्णय मागे घेतला पाहिजे, नाहीतर तिथे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल -  मंत्री हसन मुश्रीफ

11:25 August 05

..तर कर्नाटकमधून येणाऱ्यांनाही आरटीपीसीआर बंधनकारक करा, शिवसैनिकांचे सीमेवर आंदोलन

कोल्हापूर -महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी कर्नाटक सरकार अथवा महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही नियम लागू नाहीत. त्यामुळे कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना सुद्धा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करावी, या मागणीसाठी शिवसेनेने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्या अडवल्या आहेत.

11:03 August 05

बापरे.. शस्त्रक्रिया करून एक महिन्याच्या बाळाच्या पोटातील काढला गर्भ ! नवजात बाळाला जीवदान

08:56 August 05

ऑलिम्पिकमध्ये 40 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने जिंकले कास्य पदक, जर्मनीला नमवले

भारतीय हॉकी संघाने जिंकले कास्य पदक,

ऑलिम्पिकमध्ये आज पुरूष संघात भारत आणि जर्मनीमध्ये हॉकीचा सामना रंगला. कास्य पदकाच्या विजयासाठी रंगलेल्या या सामन्यात भारताने जर्मनीवर 5-4 ने विजय मिळवला.

08:50 August 05

नीलम गोऱ्हे यांच्या समंजसपणाचे सर्वत्र कौतुक

08:15 August 05

TokyoOlympics भारत जर्मनी पुरुष संघ हॉकी सामन्यात भारताची 5-3 आघाडी

भारत आणि जर्मनी मधली कांस्य पदकासाठी सामना सुरू आहे.

1-3 या पिछाडीवरून कमबॅक करत भारताने 5-3 अशी आघाडी घेतली आहे

08:12 August 05

विनेश फोगाटने कुस्तीमध्ये सोफिया मॅग्डालेनाला 7-1 ने दाखवले अस्मान, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

08:08 August 05

टोकियो ऑलिम्पिक - हॉकीमध्ये भारताची आगेकूच

कास्य पदकासाठी ऑलिम्पिकमध्ये भारत आणि जर्मनीविरुद्ध सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने ५ विरुद्ध ३ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारताला जिंकण्याची आशा पल्लवित झाली आहे.

07:32 August 05

BREAKING : भारतीय हॉकी संघाची कास्य पदकांवर विजयी मोहर, जर्मनीवर 5-4 ने मात

नाशिक-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असून, प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये आलेल्या विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासाठी श्री काळाराम मंदिर उघडले जाते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या बंद असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या केवळ दरवाजाचे दर्शन घेऊन गोऱ्हे यांनी राजकीय चर्चांना विराम दिला.

Last Updated : Aug 5, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details