महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Live Update : मुख्यमंत्र्यांनी केली मुख्य सचिवांची चर्चा; पावसाळ्याबाबत घेतला आढावा - Maharashtra rain today

Maharashtra Live Updat
महाराष्ट्र लाईव्ह अपडेट

By

Published : Jul 5, 2022, 6:22 AM IST

Updated : Jul 5, 2022, 10:45 PM IST

22:44 July 05

मुख्यमंत्र्यांनी केली मुख्य सचिवांची चर्चा; पावसाळ्याबाबत घेतला आढावा

ठाणे - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिवांशी चर्चा करून महाराष्ट्रभरात होणाऱ्या पावसाची बद्दल माहिती घेतली आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मी सकाळीच वरिष्ठ सचिवांशी चर्चा केलेली आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं केलेल आहे, जे पालक सचिव आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

21:16 July 05

ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार. दोन दिवस ऑरेंज अलर्टचे सावट

ठाणे जिल्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून शहरात देखील पावसाने मध्यरात्री पासून जोरदार हजेरी लावली होती. शहारत सुमारे १३५.४३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी जिल्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला असल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास धो धो पावसाने सुरुवात केली. कळवा खारेगांव येथे असलेल्या चाळीजवळ पाणी साचले होते. या तक्रारीची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून त्यांनी वॉटर पंपच्या सहाय्याने येथील पाणी बाहेर काढले.

20:26 July 05

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला अपघात

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचा ताफा पालिकेच्या दिशेने येत असताना मुख्यालयासमोरच अपघात झाला. या अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले असून त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

20:14 July 05

आमदार भरत गोगावले यांनी चोळई येथे डोंगराच्या कोसळलेल्या भागाची केली पाहणी

खालापूर - 4 जुलै सायंकाळी पोलादपूर शहरापासून अगदी जवळ असलेल्या चोळई गावच्या हद्दीमध्ये महामार्गाच्या कामादरम्यान कटिंग करण्यात आलेला डोंगराचा अर्धा भाग रस्त्यावर कोसळला असून या घटनेनंतर महामार्गाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनी बाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या घटनेनंतर आमदार भरत गोगावले यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व ग्रामस्थांशी चर्चा करून अधिकाऱ्यांना पुढील आदेश दिले आहेत

20:14 July 05

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मतदारसंघात परतणाऱ्या रमेश बोरणारेंचं जंगी स्वागत

औरंगाबाद(वैजापूर): राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे हे आज सकाळी आपल्या मतदारसंघात परतले आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ढोल-ताशे आणि आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी बोरणारे यांचे स्वागत केले.

19:15 July 05

आमदार प्रविण दरेकर यांनी महाड - पोलादपूर येथे पूर परिस्थितीची पाहणी केली

रायगड - जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भाजपाचे नेते तथा आमदार प्रविण दरेकर यांनी तातडीने 5 जूलै रोजी सकाळी महाड येथे धाव घेत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. तर महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे, त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्या दृष्टीने तहसिलदार व अन्य अधिका-यांच्या समेवत त्या भागाची पाहणी केली व तेथील लोकांना तातडीने अन्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश दिले.

18:14 July 05

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईच्या पावसाचा आढावा

मुंबई - मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते. याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली.

17:02 July 05

एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरला रवाना; काही तासातच पंचगंगा पात्राबाहेर पडण्याची शक्यता

कोल्हापूर :कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे एनडीआरएफ ची दोन पथके कोल्हापूरला रवाना झाली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव एनडीआरएफ पथक कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. 25 जणांचे एक पथक असे एकूण 50 जवान रवाना झाले आहेत. आज दुपारी 2 वाजेपर्यंत पंचगंगा पाणीपातळी 26 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिल्यास पुढच्या 2 तासांत पंचगंगा नदी पत्राबाहेर पडेल अशी शक्यता आहे.

16:19 July 05

टाटा मोटर्सला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

टाटा मोटर्सला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

टाटा मोटर्सला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

बेस्ट विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

टाटा मोटर्सने बेस्ट विरोधात दाखल केली होती याचिका

टाटा मोटर्सची टेंडर अपात्र ठरवण्याच्या बेस्टच्या निर्णयाविरोधात याचिका

बेस्ट उपक्रमाद्वारे 1400 इलेक्ट्रिकल बस खरेदी प्रकरण

13:48 July 05

मुंब्रा परिसरातील १६ फूट लांबीची सुरक्षा भिंत कोसळली!

ठाण्यातील संततधार पावसामुळे मुंब्रा परिसरातील १६ फूट लांबीची सुरक्षा भिंत ४ जुलै रोजी कोसळली. अनिल भगत चाळीतील सतरा कुटुंबांना ठाणे महापालिकेच्या शाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

13:44 July 05

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांचे मानले आभार

नागपूरच्या जनतेने मला नेहमीच प्रेम दिले आणि पाच वेळा निवडून दिले. आज मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलो आहे. माझ्यावर प्रेम दाखवण्यासाठी आलेल्या लोकांचे मी आभार मानतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

13:42 July 05

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : आरोपींना आठ जुलैला एनआयए न्यायालयासमोर हजर करणार

औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट शेख इरफान शेख रहीम याने रचला होता. अमरावती पोलिसांनी या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम याच्यासह डॉक्टर युसुफ खान, शोएब खान, मूदलिस् अहमद, अतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण, शेख इब्राहिम अशा सात जणांना अटक केली आहे. या सर्व सात जणांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनआयएनएvs या सातही आरोपींना आपल्याकडे सुपूर्द करावे अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या सातही आरोपींना एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना आठ जुलैला एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

13:36 July 05

विटा आणि दगडाने वार करून वृद्ध महिलेचा खून, आरोपीला अटक



मुंबईतील डी बी मार्ग पोलिसांनी 55 वर्षीय गजानना पवार यांच्या हत्येप्रकरणी 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

13:33 July 05

येत्या शुक्रवारी व शनिवारी कोकणात अतिवृष्टीचा इशारा

पुणे- जून महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक खंड दिलेल्या पावसाने काल पासून राज्यभरात जोर धरला आहे. येत्या काही दिवसात देखील पाऊसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

12:37 July 05

विक्रोळी पूर्वमध्ये घरावर कोसळले झाड

विक्रोळी साई प्रसाद सोसायटी, पंचशील नगर, खंडोबा टेकडी, विक्रोळी पूर्व येथील खाली करण्यात आलेल्या घरावर झाड कोसळले आहे. सकाळी 9.40 ची घटना आहे. घर आधीच खाली असल्याने कोणीही जखमी नाही

12:34 July 05

मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. ठाण्यातील 2016 मधील दहीहंडी प्रकरण आहे. पोलिसांकडून आता होत असलेल्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

12:33 July 05

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार विठ्ठल रखुमाईची पूजा

- पुजेचे निमंत्रण देण्यास पोहोचले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष

- विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवुन समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल

- मुख्यंमत्र्यांना निमंत्रण देण्यास पोहोचले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

- १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी केली जाणार पुजा

- यंदा पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार

12:32 July 05

आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते आरोपी शेख इरफान शेख रहीमचा झाला होता सत्कार

अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हस्ते प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरफान शेख रहीम याचा मोर्शी येथे आयोजित ईद मिलन सोहळ्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सत्कार झाला होता. शेख रहीम शेख इकबाल याची रहेबर हेल्पलाइन नावाची संघटना विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असल्याचे देखील समोर आले आहे.

12:04 July 05

उद्धव ठाकरे दूध खुळे नाहीत- बंडखोर आमदारांच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी सोमवारी पार पडली. यात शिंदे गटाचा विजय झाला. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये अनेक बंडखोर आमदारांनी आपण बंडखोरी नेमकी का केली ? याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार भास्कर जाधव यांनी या आमदारांना भावनिक आवाहन करत पुन्हा मागे फिरण्यास सांगितले. मात्र, या सर्वात एक नाव कॉमन होतं ते म्हणजे खासदार संजय राऊत. त्यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. यावर आता खासदार संजय राऊत यांनी मुंबईत निवासस्थान पत्रकारांशी संवाद साधत आपल्या मत व्यक्त केले आहे.

11:36 July 05

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे घुमोडी येथे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे..

10:43 July 05

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोशात होणार स्वागत

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत करण्याकरिता हजारो नागपूरकरांनी मोठी गर्दी केली आहे. ढोल ताश्यांच्या गजरात देवेंद्र फडणवीस यांचे भव्यदिव्य स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी विशेष तयारी केली आहे. अडीच वर्षे वर्ष राज्यात विरोधीपक्ष नेते म्हणून उल्लेखनीय कामगिरी बाजावल्यानंतर आज उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नागपुरला आले. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांचा उत्साह प्रचंड वाढला होता.

10:31 July 05

आगामी विधानसभेत शिवसेना १०० हून अधिक जागा जिंकेल - संजय राऊत

संतोष बांगर यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना जनता उभे करणार नाही. आगामी विधानसभेत शिवसेना १०० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

10:14 July 05

मुसळधार पावसामुळे कल्याण, भिवंडीतील सखल भाग जलमय, जनजीवन विस्कळीत

ठाणे - भारतीय हवामान विभागाने कालपासून कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच यावर्षीही पावसाची सरासरी १०० ते १०५ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यानूसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली परंतू मध्यंतरी दडी मारली होती. मात्र सोमवारी दूपारपासून रात्रीपर्यत पाऊस जोरदार कोसळण्याने भिवंडी आणि कल्याण शहरात ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला होता. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते.

09:13 July 05

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात कोसळली दरड

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटात दरड कोसळली आहे.

09:12 July 05

पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा - मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश

मुंबई- राज्यात धो - धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी पूर परिस्थितीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

09:01 July 05

नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये- मुंबई महापालिकेचे आवाहन

वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आहे. सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

08:44 July 05

सायन भागात रस्त्यावर साचले पावसाचे पाणी, वाहतूक विस्कळित

मुसळधार पावसाने मुंबईतील सायन भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे.

07:56 July 05

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी, वाहतूक मंदावली

मुंबई - मुंबईत ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच रात्रीच मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. पहाटे पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

07:39 July 05

मुख्यमंत्र्यांचे बालेकिल्ल्यात जोरदार स्वागत ! भर पावसात शिंदे समर्थकांचा जल्लोष

ठाणे - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी प्रथमच सोमवारी रात्री ठाण्यात आले. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह टेम्भी नाक्यावरील आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. आनंद नगर प्रवेशद्वारापासून शिंदे समर्थकांनी स्वागतची जय्यत तयारी केली होती. हार, फुले, पुष्पहाराने या सर्वाचे स्वागत देखील करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्यातून अनेक शिंदे समर्थकानी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे पोस्टर्स देखील लावण्यात आले होते.

07:14 July 05

अमरावती शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस

अमरावती शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. 18 जून रोजी अमरावती जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळल्यावर पहिल्यांदाच आज संत धार पाऊस बरसतो आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे.

06:31 July 05

मुसळधार पावसाने मुंबईत ठिकठिकाणी तुंबले पाणी, नागरिकांचे हाल

मुंबईत दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याचे दिसून आले. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता ( torrential rain ) वर्तवण्यात आली आहे.

06:23 July 05

कोल्हापूरात मुसळधार ! एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा पाणीपातळी 17.5 फुटांवर

कोल्हापूर - कोल्हापूरात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला. 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील राजाराम बंधारा सुद्धा सायंकाळी पाण्याखाली गेला. सद्यस्थितीत राजाराम बंधाराची पाणी पातळी 17.5 फुटावर आहे. त्यामुळे हा बंधारा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

06:12 July 05

Maharashtra Live Update : मुंब्रा परिसरातील १६ फूट लांबीची सुरक्षा भिंत कोसळली!

मुंबई-दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Jul 5, 2022, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details