महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News मला टार्गेट करण्यासाठी भाजपाकडून अण्णांचा वापर सुरु - अरविंद केजरीवाल - Maharashtra update news today

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Aug 30, 2022, 6:48 AM IST

Updated : Aug 30, 2022, 6:56 PM IST

18:38 August 30

मला टार्गेट करण्यासाठी भाजपाकडून अण्णांचा वापर सुरु - अरविंद केजरीवाल

मला टार्गेट करण्यासाठी भाजपा अण्णा हजारेंचा वापर करत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अण्णा हजारेंनी आज अरविंद केजरीवाल यांना नव्या दारु धोरणावरुन पत्र लिहित टीका केली होती. त्यावर केजरीवालांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

17:26 August 30

पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेस नेत्यांनी घेतली गुलाब नबी आझादांची भेट

नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुलाब नबी आझाद यांची आज मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा आणि भूपिंदर हुडा यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

17:01 August 30

मेट्रो कारशेड कांजूरमार्ग हटवण्याचा निर्णय मागे; राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद संपला

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याबाबतचा 1 ऑक्टोबर 2020 चा आदेश राज्य सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. कांजूरमार्गच्या कारशेड भूखंडावरून सुरू असलेला राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद अखेर संपला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिका-यांनी या संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. 102 एकरचा भूखंड एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता.

16:05 August 30

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

100 कोटी कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांची ईडी न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. 13 सप्टेंबर न्यायालयाने त्यांची कोठडी वाढवली आहे.

15:06 August 30

एनसीआरबी अहवालानुसार देशभरात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

नुकतचं एनसीआरबी अहवाल पुढे आला आहे. यात देशभरात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

14:27 August 30

कमाल खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, या अभिनेत्यांविरोधातील ट्विटमुळे सापडला संकटात

2020 मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल कमाल रशीद खानला मालाड पोलिसांनी Kamal Rashid Khan arrested by Malad Police अटक केली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात Borivali Court today करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

13:36 August 30

अण्णा हजारेंचं दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना पत्र, नव्या मद्य धोरणावरुन केली टीका

नवीन दारू धोरणावर अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. यात पैशासाठी सत्तेसाठी आणि पैशासाठी सत्तेच्या चक्रात अडकलेले दिसत आहेत. एका मोठ्या आंदोलनातून उदयास आलेल्या पक्षाला हे शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

13:04 August 30

फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

12:27 August 30

सुस्वास्थ्य भवन बांधण्यासाठी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

मुंबई - सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिक्कीमचे पर्यटनमंत्री बी. एस. पंत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

12:25 August 30

55 वर्षीय केटर्स मालकाची निर्दोष सुटका

विक्रोळीतील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमादरम्यान 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना राजवडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात केटररवर 2009 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल देत 55 वर्षीय केटर्स मालकाची निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की पोलिसांकडून घेण्यात आलेले नमुने हे 24 तासानंतर घेण्यात आल्याने साहजिकच त्यांना निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने या आजारावर आरोपीची निर्दोष सुटका करण्यात येतो असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

12:23 August 30

देना बँक शाखा फसवणुक प्रकरणी तीघांना कारावास

मुंबईतील अंधेरी देना बँकच्या शाखेच्या 50 लाख रुपयाचे फसवणूक केल्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने माजी मुख्य व्यवस्थापक सह इतर तिघांना न्यायालयाने दोषी मानत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाच वर्ष तर उर्वरित आरोपींना दोन वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा आज सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

12:15 August 30

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

मुंबई- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहे.

11:53 August 30

वाहतुक कोंडीवर रामबाण उपाय मेट्रो 3, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई मेट्रो तीनचे आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायल रन पार पडले. यावेळी बोलताना वाहतुक कोंडीवर रामबाण उपाय म्हणजे मेट्रो 3 हे प्रकल्प आहे. पर्यावरण संतुलन राखत याचे ट्रायल घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिवाय यावेळी त्यांनी मेट्रो 3 ला विरोध करणाऱयांना टोलाही लगावला.

11:38 August 30

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन, मुख्यमंत्री

मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रायोगिक चाचणी सोहळ्याला उपस्थित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जापान सरकारचे प्रतिनिधी

तसेच रेल्वे महामंडळाचे सर्व अधिकारी अश्विनी भिडे

आमदार दिलीप लांडे आमदार अतुल भातखळकर

सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो

आजच्या मेट्रो रेल्वेतील प्रायव्हेट चाचणीला आपल्या कामाचं अभिनंदन करतो

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अशा पद्धतीने दोन महिने पूर्ण झाले आहेत

भाऊ चर्चेत मुंबई मेट्रो रेल्वेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळालेली आहे

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो

11:37 August 30

पहिली ट्रेन दीड वर्षात सुरू करण्याचा मनोदय अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला

कारखेड चा डेपो तयार नसल्यामुळे या ठिकाणी गाड्या आणता येणे शक्य नव्हतं

मात्र आता कारखेडच्या बाबतीचा प्रश्न सुटत आहे

त्यामुळे देखभाल दुरुस्तीसह अन्य तांत्रिक गोष्टी देखील आता मोकळ्या रीतीने करता येणार आहे

पहिली ट्रेन दीड वर्षात सुरू करण्याचा मनोदय अश्विनी भिडे यांनी

व्यक्त केला

मेट्रो रेल्वेमुळे अडीच लाख टन वायू दरवर्षी कमी प्रदूषित होईल

मेट्रोच्या गाड्या पाच डब्यांचा आहे

एका वेळेला 2400 प्रवाशांना मेट्रो रेल्वे घेऊन जाऊ शकते

या अधिकारीचे मेट्रो रेल्वे महामंडळाचे संचालक रणजीत शिंदे यांनी केलेल्या पाठपुरावाचा देखील उल्लेख आश्विनी भिडे यांनी केला

हा प्रकल्प डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करीत आहेत

11:28 August 30

वडोदरा येथे गणेश मिरवणुकीत दोन गटात हाणामारी

वडोदरा येथे काल गणेश मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली आहे. पाणीगेट परिसरात शांतता आहे. मी जनतेला आवाहन करतो की, अफवांकडे लक्ष देऊ नका. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे वडोदराचे सहआयुक्त चिराग कोरडिया यांनी सांगितले.

11:19 August 30

सोनाली फोगट खून प्रकरणाच्या तपासाकरिता गोवा पोलिसांचे पथक हरियाणाला रवाना

सोनाली फोगट खून प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस निरीक्षक थेरॉन डीकोस्टा आणि पीएसआय फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांचे एक पथक आज हरियाणाला रवाना होईल, ही माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी सांगितले.

10:15 August 30

आसाममध्ये 4,728 किलो गांजा जप्त

आसाम पोलिसांनी काही सोमवारी, 29 ऑगस्ट रोजी शेजारच्या राज्यातून येणाऱ्या ट्रकमध्ये नैसर्गिक रबराच्या आवरणाखाली लपवलेला 4,728 किलो गांजा जप्त केला.

08:13 August 30

महाराष्ट्रात स्वाइन फ्लूमुळे चालू वर्षात ९८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले आहेत. तर 98 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

07:23 August 30

पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानातील पूरग्रस्तांप्रती शोक व्यक्त

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानातील पूरग्रस्तांप्रती शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानात हजारांहून अधिक नागरिकांचे मृत्यू झाले आहे.

07:23 August 30

बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग विस्कळित

चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग मुसळधार पावसामुळे ठप्प झाला आहे. एसडीआरएफने प्रवासी आणि स्थानिक लोकांची सुटका केली.

07:23 August 30

कासवांची तस्करी रोखली

AIU बेंगळुरू कस्टम्सने, CITES च्या परिशिष्ट मध्ये सूचीबद्ध असलेली 60 जिवंत कासवांची बेकायदेशीरपणे निर्यात करण्यापासून रोखली. कासवांना कर्नाटक राज्य वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

07:22 August 30

वेलंकन्नी चर्चच्या वार्षिक उत्सवाची सुरुवात

तामिळनाडूत काल नागपट्टिनममध्ये ध्वजारोहण समारंभाने वेलंकन्नी चर्चच्या वार्षिक उत्सवाची सुरुवात झाली. मेजवानीच्या दिवशी, 8 सप्टेंबर रोजी महोत्सवाचा समारोप होईल.

07:22 August 30

नीटच्या परीक्षेच्या वेळेत बदल

MCC ने अधिक जागांचा समावेश करण्यासाठी NEET PG 2022 समुपदेशन पुन्हा शेड्यूल केले आहे.

07:22 August 30

राजकारणात धंदा करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल, हेमंत सोरेन

भाजप फक्त आमदारांची खरेदी-विक्री करतात. पण आम्ही जनतेसाठी काम करतो. घोडेबाजार करत नाही. राजकारणात धंदा करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल. मला खुर्चीची कधीच काळजी वाटत नाही. मला फक्त दलित, आदिवासी आणि राज्यातील लोकांची काळजी आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.

07:22 August 30

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे बंगळुरूच्या अनेक भागात पाणी साचले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. मुसळधार पावसामुळे उद्या बंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

07:22 August 30

औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरमध्ये अग्नीवीर भरती

अहमदनगरमध्ये भारतीय सैन्यदलाने सोमवारी अग्नीवीर भरती घेतली आहे. पुणे परिमंडलात पुरुष इच्छुकांसाठी ७ तर महिला इच्छुकांसाठी एक रॅली होणार आहे. पुणे झोन अंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आहेत.

07:22 August 30

पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणार नवसंजीवनी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बोर्डाने पाकिस्तानच्या बेलआउट कार्यक्रमाच्या सातव्या आणि आठव्या पुनरावलोकनांना मान्यता दिली. पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.

07:21 August 30

आप आणि नायब राज्यपाल वाद नव्या टोकाला

दिल्ली विधानसभेच्या आवारात आप आमदारांनी निदर्शने केली आहे. एलजी व्हीके सक्सेना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

07:21 August 30

ओडिशाकडून खऱ्या अर्थाने क्रीडा दिन साजरा

काल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी खेळाडूंना बिजू पटनायक पुरस्काराने सन्मानित केले. तसेच रोख बक्षिसे दिली आहेत.

07:21 August 30

40,000 मेट्रिक टनांहून अधिक गव्हाची अफगाणिस्तानला मदत

आतापर्यंत 40,000 मेट्रिक टनांहून अधिक गहू अफगाणिस्तानला पाठवला आहे. ही माहिती भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघात देण्यात आली आहे.

07:21 August 30

रामदहा धबधब्यात बुडून ६ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमधील रामदहा धबधब्यात बुडून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील रहिवासी होते. बचाव कार्य राबविण्यात आले. 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

07:21 August 30

प्राण वाचविणाऱ्या सुरक्षा रक्षकाला थप्पड, पोलिसात गुन्हा दाखल

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर त्याला वाचवणाऱ्या सुरक्षा रक्षकांना थप्पड मारल्याप्रकरणी गुरुग्राममधील व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल

06:29 August 30

Maharashtra Breaking News मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन, मुख्यमंत्री

मुंबई सोनाली फोगट हत्या प्रकरणाचा गोपनीय अहवाल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. आरोपपत्र लवकरच दाखल होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Last Updated : Aug 30, 2022, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details