महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : मुंबईत काँग्रेसचे ईडीविरोधात आंदोलन; नाना पटोलेंसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 26, 2022, 6:55 AM IST

Updated : Jul 26, 2022, 3:31 PM IST

15:29 July 26

कृषी आणि कापड व्यवसाय छापा प्रकरण; 1.4 कोटींची बेहिशेबी रोकड जप्त

IT विभागाने 5 जुलै रोजी मुंबई आणि दिल्ली NCR मधील 27 ठिकाणी कृषी आणि कापड व्यवसाया संबंधित काही ठिकाणी आणि एंट्री ऑपरेटरच्या संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. समूहाचे प्रवर्तक शेअर बाजारातील काही समूह कंपन्यांच्या कामगिरीमध्ये फेरफार करत होते, असे आय-टी विभागाचे म्हणणे आहे.

तपासादरम्यान असे आढळून आले की, मुख्य समूहातील सूचीबद्ध कंपन्यांची बहुतांश उलाढाल ही सर्क्युलर ट्रेडिंगच्या माध्यमातून झाली आहे. तपासा दरम्यान 1.4 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.

15:18 July 26

कैटरीना कैफ आणि विकी कौशल धमकी प्रकरण; मनविंदर सिंगला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंग याला वांद्रे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

15:00 July 26

मुंबईत काँग्रेसचे ईडीविरोधात आंदोलन; नाना पटोलेंसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईत ईडीविरोधात आंदोलन करत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

14:17 July 26

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी नाही, पुन्हा तारीख पे तारीख


आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी तहकूब

या प्रकरणी 29 जुलै रोजी होणार आहे पुढील सुनावणी

तपास यंत्रणेला कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत म्हणून या प्रकरणात जामीन देण्यात यावा, असा दावा मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे

14:00 July 26

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

13:28 July 26

राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले...

ईडीची सोनिया गांधींची चौकशी होत असताना काँग्रेसने आक्रमकपणे निदर्शने सुरू केली आहे. काँग्रेसने राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढताना राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

12:11 July 26

ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांचा मोर्चा, मोर्चात राहुल गांधी सहभागी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यापासून विजय चौकाकडे मोर्चा काढला. या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले आहेत.

12:10 July 26

विजय चौकाकडे मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ विजय चौकाकडे मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आणि खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रणजीत रंजन, केसी वेणुगोपाल, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढ़ी, के सुरेश आणि इतरांना ताब्यात घेतले.

12:09 July 26

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक लायसन देण्यात संघर्ष संघटनेचा विरोध

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक लायसन देण्यात संघर्ष संघटनेचा विरोध

सलमान खानची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता बंदुकीचे लायसन देण्यात येऊ नये

मुंबई पोलीस आयुक्त यांना संघर्ष समितीचे पत्राद्वारे मागणी

संघर्ष संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज मस्के यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक लायसन देण्यात संघर्ष संघटनेचा विरोध

सलमान खानची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता बंदुकीचे लायसन देण्यात येऊ नये

मुंबई पोलीस आयुक्त यांना संघर्ष समितीचे पत्राद्वारे मागणी

संघर्ष संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज मस्के यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

12:00 July 26

निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १ ऑगस्टला घेणार सुनावणी

एकनाथ शिंदे गटच हा खरी शिवसेना असल्याच्या मान्यता देण्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाविरोधातील नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे.

11:39 July 26

सत्तांतराचा परिणाम.. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हटविले

पुणे- देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आरोप असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याला राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्यातून हटवले आहे. त्यांच्या जागी या खटल्यात अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रविण चव्हाण यांची राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून आघाडी सरकार काळात झाली होती नेमणूक झाली आहे. जळगावमधील एका दाखल गुन्हा पुण्यात वर्ग करुन त्यामध्ये गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप आहे.

11:36 July 26

कुणीही काही म्हटले तरी आमचे मनोमिलन झाले-रावसाहेब दानवे

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

11:19 July 26

पनवेल जाणारी लोकल सीएसएमटी स्थानकात बफरला धडकली; हार्बर मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत

पनवेल जाणारी लोकल सीएसएमटी स्थानकात बफरला धडकली; हार्बर मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलची छोट्याशा अपघाताची घटना घडली आहे. ही घटना सकाळी 9:39 वाजता घडली.

इतर रेल्वे मार्गावरील वाहतूक नेहमी प्रमाणे सुरळीत असल्याची तसेच हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक जर विस्कळीत आहे.हा मार्ग

लवकरच पूर्ववत होईल असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी इटीव्ही भारतला सांगितले.

11:07 July 26

5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव सुरू

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव सुरू झाला

11:06 July 26

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा याही होत्या.

10:38 July 26

औषधे नसल्याने एचआयव्ही रुग्णांचे दिल्लीत निदर्शने

दिल्लीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाबाहेर एचआयव्ही रुग्णांनी अँटीरेट्रोव्हायरल औषधांचा तुटवडा असल्याचा दावा केला. दिल्ली आणि शेजारच्या राज्यांमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून एचआयव्ही रुग्णांसाठी आवश्यक असलेली जीवनरक्षक औषधे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही निषेध करत आहोत. आम्ही राज्य अधिकार्‍यांना पत्र लिहिले पण उपयोग झाला नाही, असे एका रुग्णाने सांगितले

10:08 July 26

अर्जुन खोतकर हे शिवसेनेतच आहेत-संजय राऊत

मी डोळ्यात डोळ्यात डोळे घालून ईडीच्या चौकशीच्या सामोरे जाईन. अर्जुन खोतकर हे शिवसेनेतच आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

10:03 July 26

दक्षिण केरळचे बिशप धर्मराज रसलम यांना ईडीची नोटीस

अंमलबजावणी संचालनालयाने चर्च ऑफ साउथ इंडियाचे (CSI) मॉडरेटर आणि दक्षिण केरळचे बिशप धर्मराज रसलम यांना नोटीस बजावून चौकशीसाठी उद्या हजर राहण्यास सांगितले आहे. हे चर्च संचालित काराकोनम मेडिकल कॉलेजमधील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबधित आहे.

09:38 July 26

नितीश कुमार यांना कोरोनाची लागण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची #COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत आहे.

09:34 July 26

पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून तत्काळ बडतर्फ करा-काँग्रेसची मागणी

पश्चिम बंगाल एसएससी भरती घोटाळ्यावरून काँग्रेसनेही तृणमूलवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून तत्काळ बडतर्फ करण्याची विनंती केली आहे.

09:31 July 26

कारगिल विजय दिवस: द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकातील दृश्ये

देशात कारगिल विजय दिवस साजरा करत आहे, 1999 च्या कारगिल युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकातील दृश्ये पहा.

09:22 July 26

नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, एकुण 20453 क्युसेक सुरू

जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण* *दि. 26-07-2022* *वेळ: 07.00 Hrs.*

विसर्ग वाढ-

ठिक 08:00 ते 08:30 वा. दरम्यान *द्वार क्र. 10 ते 27 असे एकुण 18 द्वारे* 0.5 फुट उंचीवरून 1 फुट उंचीवर करुन गोदावरी नदीपात्रात *9432 क्युसेक विसर्ग वाढवण्यात येईल.*

अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सद्यस्थितीत

1) धरण सांडव्याद्वारे 18864 क्युसेक व

2) जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक

असा *एकुण 20453 क्युसेक* विसर्ग सुरू राहील.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

08:55 July 26

तुम्ही मर्दाचा चेहरा घेऊन पुढे निवडणुकीला जा- उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरू आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुलाखत आहे. शिंदे गटावर या मुलाखतीतून सडकून टीका करण्यात आली आहे. तुम्ही मर्दाचा चेहरा घेऊन पुढे निवडणुकीला जा, अशी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर टीका केली आहे.

07:22 July 26

मोहम्मद जुबेर अटक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारवर ताशेरे

पत्रकार मोहम्मद जुबेर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहे. अटक म्हणजे दंडात्मक साधन म्हणून वापर केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद जुबेरची जामिनावर सुटका केली आहे.

07:19 July 26

हैतीच्या टोळींचा हिंसाचार, नऊ दिवसांत शेकडो जणांचा मृत्यू

8 ते 17 जुलै दरम्यान हैतीच्या टोळी हिंसाचारात किमान 471 मरण पावले. या टोळ्यांनी थेट हैतीच्या राजधानीच्या झोपडपट्ट्यांपर्यंत आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत.

07:04 July 26

जोधपूरमधील पुरात कार वाहून गेल्या...

जोधपूरमध्ये 25 जुलै रोजी रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पुरात कार वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

07:00 July 26

लस्सी, गहू, तांदूळ यावर जीएसटी कमी करा- अरविंद केजरीवाल

लस्सी, गहू, तांदूळ यावर जीएसटी कमी करा, आप पक्षाने केंद्र सरकारला आवाहन केले आहे.

06:57 July 26

चालत्या कारमधून स्टंट, व्हिडओ व्हायरल

सोलनमधील NH-5 वर एक कार रेलिंगला आदळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. अमृतसरमधील एका रहिवाशाने वेगवान वाहन चालविताना करताना स्टंट करण्याचा प्रयत्न केला. वाहनाचे नुकसान झाले. मात्र चालक सुरक्षित आहे. सोलन पोलिसात IPC च्या 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06:56 July 26

माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना एम्समधून सुट्टी

पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी एम्समधून डिस्चार्ज झाल्यानंतर ओडिशाच्या विमानतळावर पोहोचले. त्यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे.

06:19 July 26

Maharashtra Breaking News : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी नाही, पुन्हा तारीख पे तारीख

मुंबई- २६ जुलै २००५ ला मुंबईत १८ तासात ९९४ मिलीमीटर पाऊस झाल्याने ( २६th July 2005 rain ) हाहाकार उडाला होता. जलप्रलया दरम्यान पाण्यात बुडून तब्बल १४९३ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईकरांना आजही त्या मुसळधार पावसाच्या आठवणी ताज्या वाटतात. २६ जुलैच्या घटनेनंतर बचावकार्य व सर्व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय राखता यावा म्हणून मुंबई महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली.

Last Updated : Jul 26, 2022, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details