महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking live page 30 May 2022; प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात

Maharashtra Breaking live page 30 May 2022
Maharashtra Breaking live page 30 May 2022

By

Published : May 30, 2022, 11:55 AM IST

Updated : May 30, 2022, 1:48 PM IST

12:23 May 30

प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात दाखल झालेत. संजय राऊत, दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे जयंत पाटील बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

12:03 May 30

संजय कदम यांची आज ईडीकडून चौकशी होणार

संजय कदम यांची आज ईडीकडून चौकशी होणार

मुंबई - अनिल परब प्रकरणात संजय कदम यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. संजय कदम ईडी कार्यालयात दाखल झालेत. गुरुवारी ईडीकडून अनिल परब यांच्या निकटवर्तीयांनी छापेमारी केली होती. त्यांची साई रेस्टॉरंट प्रकरण चौकशी करण्यात येणार आहे.

11:57 May 30

पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात

मुंबई - केंद्रिय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक विधानभवनात पोहचले. राज्यसभेच्या तीन जागांसाठी ते अर्ज भरणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच इतर भाजप नेते विधानभवनात त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत.

11:49 May 30

Maharashtra Breaking live page 30 May 2022; काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडी राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात

मुंबई - काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडी विधानभवनात पोहचले आहेत. ते राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता मात्र त्यांच्यासोबत उपस्थित नाहीत. राज्याबाहेरील उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ही नाराजी उमेदवारी अर्ज करताना दिसून येत आहे. मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण दिल्लीत आहेत.

Last Updated : May 30, 2022, 1:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details