महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 25, 2022, 6:26 AM IST

Updated : Jul 25, 2022, 6:46 PM IST

18:44 July 25

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 23 साक्षीदार फितूर झालेले आहेत. कर्नल पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात साक्षी दरम्यान फितूर झाला आहे

16:37 July 25

अधिवेशन 18 तारखेला घ्यायचे ठरले होते पण अद्यापही अधिवेशन घेतलेले नाही - अजित पवार

आधी अधिवेशन 18 तारखेला घ्यायचे ठरले नंतर 25 तारखेला घेणार असे म्हटले जात होते मात्र आता तेही होणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींना आलेला अनुभव त्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडता येतात मात्र हे सरकार अधिवेशनच घेत नाहीये, या सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कोणी आडवला आहे? अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये अतोनात नुकसान झाले याकडे लक्ष द्यावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

14:32 July 25

अभिनेत्री कटरीना कैफला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

अभिनेत्री कटरीना कैफला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

मानविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून तो उभारता कलाकार


कतरिना कैफ सोबत एकतर्फी प्रेमामुळे केले कृत्य

13:35 July 25

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

राणे यांच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

तोपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे महापालिकेला आदेश

13:03 July 25

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टमधून याचिका मागे घेतली

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टमधून याचिका मागे घेतली

सहकारी संस्थांच्या निबंधकांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका घेतली मागे


दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे, त्या आदेशाला दरेकर यांनी आव्हान दिले होते.

दरेकर यांच्याकडे निबंधकांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी संबंधित राज्य मंत्रालय विभागाकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

12:47 July 25

मुख्यमंत्री शिंदे लवकरच पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदे लवकरच पुणे दौऱ्यावर

दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ते हांडेवाडी इथं एका फुटबॉल मैदानाचं उद्घाटन करतील.

त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करतील

12:06 July 25

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला पदभार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते.

12:03 July 25

आजी-माजी राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांना ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

11:51 July 25

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला

सिल्वर ओक या निवास्थान दोघांमध्ये भेट

राजकीय परिस्थिती आणि होऊ घातलेल्या निवडणुकांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

11:31 July 25

अभिनेत्री कटरिना कैफ आणि तिच्या पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी

विकी कौशल कॅथरिना कॅफ

अभिनेत्री कटरिना कैफ आणि तिच्या पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी

सोशल मीडियावर येत आहेत धमक्या

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

या प्रकरणी संताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

11:13 July 25

पेंच जलाशयाचे 16 तर तोतलाडोह धरणाचे 2 दरवाजे उघडले

पेंच जलाशयाचे 16 तर तोतलाडोह धरणाचे 2 दरवाजे उघडले

30 सेमीने उघडण्यात आले दरवाजे

नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने आजूबाजू च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला

पेंच आणि तोतलाडोह या दोन्ही धरणातून होतो नागपूर शहराला पाणी पुरवठा

11:11 July 25

आरे कार शेड परिसरातील 24 तासासाठी वाहतूक बंद पोलिसांचे निर्देश

आरे वाहतुकीबाबत पत्र

आरे कार शेड परिसरातील 24 तासासाठी वाहतूक बंद पोलिसांचे निर्देश

एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळे रात्री 12 पासून पुढील 24 तासासाठी आरे रोड वाहतुकीकरिता तात्पुरता बंद

25 जुलै रात्री बारा वाजल्यापासून 24 तासाचा करिता बंद ठेवण्यात आले आहे

नागरिकांनी पवई, मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा

मुंबई उप आयुक्त वाहतूक पश्चिम उपनगर यांचे सूचना

11:09 July 25

रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळात ४० वेळा घटना पायदळी- मेहबुबा मुफ्ती

निवृत्त होणारे राष्ट्रपती आपल्या मागे असा वारसा सोडून जातात जिथे भारतीय राज्यघटना तब्बल ४० वेळा पायदळी तुडवली गेली. कलम 370 रद्द करणे असो, CAA असो किंवा अल्पसंख्याक आणि दलितांना लक्ष्य करणे अशा घटना घडल्या आहेत. भारतीय संविधानाच्या किंमतीवर भाजपने राजकीय अजेंडा पूर्ण केल्याची टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.

10:42 July 25

माझी निवड म्हणजे कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचे आणि क्षमतांचे प्रतिबिंब-द्रौपदी प्रतिबिंब

वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेले गरीब, दलित, मागासलेले, आदिवासी- हे लोक मला त्यांचे प्रतिबिंब म्हणून पाहू शकतात याचे मला समाधान वाटते. माझ्या निवडीमागे गरिबांचा आशीर्वाद आहे. हे कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचे आणि क्षमतांचे प्रतिबिंब असल्याचे राष्ट्रपती पदाची शपथ घेतलयानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

10:32 July 25

मी स्वतंत्र भारतात जन्मलेली देशाची पहिली राष्ट्रपती-द्रौपदी मुर्मू

मी स्वतंत्र भारतात जन्मलेली देशाची पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक यश नाही. हे भारतातील प्रत्येक गरीबाचे यश आहे. माझी निवड म्हणजे भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहत नाहीत तर ती स्वप्ने पूर्णही करू शकतात याचा पुरावा आहे, असे नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

10:07 July 25

एमपीएससीच्या धमकी वजा सूचनेच्या 'ट्वीट'ने आंदोलक विद्यार्थी बॅकफुटवर

कारवाईच्या भीतीने आज पुण्यात होणारे आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलांसंबंधी विद्यार्थ्यांचे काही आक्षेप होते.

वर्णनात्मक परीक्षापद्धतीचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मात्र त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अवाढव्य असून, त्याच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी द्यावा, २०२३ ऐवजी २०२५ पासून अभ्यासक्रम राबवावा, आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणी

त्यासाठी आज दुपारी शास्त्री रस्त्यावर विद्यार्थी एकत्र येत आंदोलन करणार होते

मात्र, आयोगाच्या ट्विटनंतर विद्यार्थी बॅकफुटवर येत आंदोलन स्थगित केलं

10:03 July 25

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाची घेणार शपथ

निवृत्त होणार राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनातून संसदेसाठी रवाना झाले. थोड्याच वेळात द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती-निर्वाचित द्रौपदी मुर्मू लवकरच भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

09:49 July 25

भीषण अपघात! पूर्वांचल महामार्गावर झालेल्या अपघातात 8 ठार

पूर्वांचल महामार्गावर झालेल्या अपघातात 8 ठार तर 16 जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. किरकोळ जखमींवर सीएचसीमध्ये उपचार करण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याचे बाराबंकीचे पोलीस अधीक्षक अनुराग वत्स यांनी सांगितले.

09:26 July 25

एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सुधारित परिक्षा 2023 पासून लागू होणार

एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सुधारित परिक्षा 2023 पासून लागू होणार

एमपीएससीने तसा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय या वर्षी लागू होणार होता

विद्यार्थ्यानी केली होती मागणी

एमपीएससी ने केला खुलासा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू होणार

सध्याच्या भरती प्रक्रियाशी सुधारित परीक्षा योजनेचा काही संबंध नाही.असेही एमपीएससी ने म्हटले आहे.

09:20 July 25

नितीश कुमार द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दिल्लीत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

09:19 July 25

द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील राजघाटावर वाहिली श्रद्धांजली

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील राजघाटावर श्रद्धांजली वाहिली. त्या आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

08:18 July 25

पाकव्याप्त भारतामधील जनता भारताकडे पाहत आहे, स्वातंत्र्य कधी मिळणार असा विचारत आहेत- दत्तात्रय होसाबळे

पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पहिले बळी आहेत. त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. ते आज तळमळत आहेत, ते भारताकडे पाहतात, स्वातंत्र्य कधी मिळणार असा सवाल करत आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसाबळे यांनी म्हटले आहे. 1947 पासून पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि युद्धाचा प्रचार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आमचे सैन्य, पोलिस दल त्याविरुद्ध लढले. मी भूमीतील लोकांचे आभार मानतो ज्यांनी त्यांच्यासोबत लढा दिला. महाराजा हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीर भारतात विलीन केल्याचेही दत्तात्रेय होसाबळे यांनी म्हटले.

08:06 July 25

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या निवासस्थानातून राजघाटकडे रवाना

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या निवासस्थानातून राजघाटकडे रवाना झाल्या आहेत. त्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

07:59 July 25

घोटाळ्यातील आरोपी पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी उपचाराकरिता भुवनेश्वरला रवाना

पश्चिम बंगालचे मंत्री आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आज एअर अॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरच्या एम्समध्ये हलवले जाणार आहे.

07:00 July 25

वेस्ट इंडिजचा दोन गडी राखून भारताने केला पराभव

भारताने (312/8) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा दोन गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

06:57 July 25

उत्तर भारतात श्रावण महिन्याचा दुसरा दिवस, कावडियांची पायी यात्रा दिवस

उत्तर भारतात श्रावण महिन्यातील आज दुसरा दिवस आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीतील बसिष्ठ मंदिरापासून मोठ्या संख्येने कावडियांनी पायी यात्रेला सुरुवात केली आहे.

06:54 July 25

पोप फ्रान्सिस माफी मागणार

कॅथोलिक निवासी शाळांमध्ये कॅनेडियन मूलनिवासी मुलांशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल पोप फ्रान्सिस माफी मागणार आहेत.

06:48 July 25

द्रौपदी मुर्मू आज भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार

द्रौपदी मुर्मू आज भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

06:46 July 25

पंतप्रधान मोदी आज संबोधित करणार

दिवंगत हरमोहन सिंग यादव यांच्या १०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आज संबोधित करणार आहेत.

06:45 July 25

पार्थ चॅटर्जी यांना भुवनेश्वरच्या एम्समध्ये हलविण्यात येणार

ईडीचे अधिकारी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी राज्यमंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी दाखल आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आज एसएसकेएम रुग्णालयातील डॉक्टर आणि त्याच्या वकिलासमवेत एअर अॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरच्या एम्समध्ये हलविले जाईल.

06:44 July 25

नेपाळमध्ये पहाटे भूकंप

आज पहाटे 5:52 वाजता नेपाळमधील नगरकोट शहरापासून 21 किमी अंतरावर 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला.

06:41 July 25

श्री महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती

मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिरात 'सावन'च्या दुसऱ्या सोमवारी पुजारी 'भस्म आरती' करण्यात आली आहे.

06:08 July 25

Maharashtra Breaking News : अभिनेत्री कटरीना कैफला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

मुंबई- राज्यात शिंदे सरकार ( Eknath Shinde Govt ) येऊन एक महिना होत आला तरी, मंत्रीमंडळाचा विस्तार ( Expansion of the MH Cabinet ) अजूनही झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale on Shinde gov ) यांनी मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रपती शपथविधीनंतर लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे.

Last Updated : Jul 25, 2022, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details