महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : जलदगतीने निर्णय घेणारे सरकार म्हणजे शिंदे सरकार - दीपक केसरकर - एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे टीका

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

By

Published : Jul 27, 2022, 6:29 AM IST

Updated : Jul 27, 2022, 3:13 PM IST

15:12 July 27

दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद

दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद

कोरोना काळात शिंदे यांनी खूप काम केले

औषधे आणि उपचार दिले

कॉरोणा बाधित होऊनही शिंदे थांबले नाहीत

पण त्यांनी सर्व श्रेय पक्षाला दिलं

आज चांगला दिवस आहे शुभेच्छा देण्यासाठी मी आलोय

मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ लाख रुपये दिले जात होते...ते महाविकस आघाडीत कमी.केले गेले...

ते पुन्हा वाढवावेत अशी आम्ही मागणी केली आहे

ते लवकर होतील

प्रवक्त्याने मुलाखत घेतली...ती सकारात्मक असावी...अन्य पक्षाकडून त्यावर प्रतिक्रिया आल्या हे योग्य नाही

मी याबाबतीत उद्या बोलेन

अधिवेशन पुढे गेल्याने जनतेच्या प्रश्नांना काही अडचण नाही

हे सरकार वेगवान निर्णय घेणारे आहे

सव्वाशे टक्के वेगाने घेतले निर्णय

14:50 July 27

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. राज्यभरातून शिवसैनिक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले असून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरातून सदस्य नोंदणी आणि प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे शिवसैनिक मातोश्रीवर घेऊन आले आहे.

13:54 July 27

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात


औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे

13:11 July 27

काँग्रेसच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी विजय चौकातून ताब्यात घेतले आहे. आम्हाला संसदेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करायचा आहे. आम्ही राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात होतो पण पोलिसांनी अडवले. आम्हाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सांगितले.

12:46 July 27

लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीनंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

12:44 July 27

काँग्रेस खासदारांचा संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा, ईडी चौकशीचा विरोध

सोनिया गांधी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी ईडीसमोर हजर राहिल्या आहेत. सोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.

12:42 July 27

पश्चिम बंगालमधील माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी, अर्पिता मुखर्जी यांना वैद्यकीय तपासणीसाठी ESI हॉस्पिटलमध्ये आणले. न्यायालयाच्या आदेशानुसार दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. ते ३ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

12:40 July 27

आमच्या घरांवर बुलडोझर फिरवला, त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव-असुद्दीन ओवैसी

भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार जनतेचा पैसा वापरून कावडियांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहे. त्यांनी सर्वांना समान वागणूक द्यावी अशी आमची इच्छा आहे. ते आमच्यावर (मुस्लिमांवर) फुलांचा वर्षाव करत नाहीत. त्यांनी आमच्या घरांवर बुलडोझर फिरवला, अशी टीका एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

12:31 July 27

शाळेत साहेब आलेत पळा... वेगाने वाहन चालवणाऱ्या शिक्षिकांच्या गाडीला अपघात

शाळेत साहेब आले म्हणुन वेगाने वाहन चालवणाऱ्या शिक्षिकेंच्या गाडीचा अपघात होउन तीन शिक्षिका जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी चौकशी साठी आल्या म्हणून, कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली, यात नाशिकहून देवगाव शाळेत जाणाऱ्या शिक्षिकांच्या भरधाव वाहनाचा घोटी नजीक अपघात झाला, यात तीन शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांच्यावर घोटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

11:36 July 27

एकनाथ शिंदे रतन टाटा यांच्या भेटीला, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

एकनाथ शिंदे रतन टाटा यांच्या भेटीला जाणार आहेत. दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

11:32 July 27

सोनिया गांधी सलग तिसऱ्या दिवशी ईडीसमोर हजर

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सलग तिसऱ्या दिवशी ईडीसमोर हजर राहणार आहेत.

11:29 July 27

राज्यसभेचे कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित

संसदेचे पावसाळी अधिवेशन कामकाज पुन्हा बंद पडले आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली

11:17 July 27

शिवसेना नेते संजय राऊत आज ईडी चौकशीला राहणार गैरहजर

संजय राऊत ईडीकडे वेळ वाढवून मागणार

लोकसभा अधिवेशन सुरू असल्याने संजय राऊत आज दिल्ली आहे

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ईडीचे समन्स

संजय राऊत यांची यापूर्वी ईडीकडून चौकशी झाली होती

11:13 July 27

मनी लाँड्रिंग कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, ईडीचे अधिकारांवर शिक्कामोर्तब

मनी लाँड्रिंग कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

10:53 July 27

साधूचा वेशभूषा करून भीक मागणाऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

'साधू'ची वेशभूषा करून भीक मागणाऱ्या वेगळ्या धर्माच्या लोकांना बजरंग दलाच्या सदस्यांनी बिहारमधील वैशालीमध्ये पकडून मारहाण केली. पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

10:51 July 27

भाजप नेते प्रवीण नेत्तरू यांचा मृतदेह राहत्या घरी आणला...

भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तरू यांचा मृतदेह दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि विविध हिंदू संघटनांचे सदस्य उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याने स्थानिक भागात तणावाची स्थिती आहे.

09:24 July 27

तृणमूलचे आमदार माणिक भट्टाचार्य यांची आज होणार ईडी चौकशी

टीएमसीचे आमदार माणिक भट्टाचार्य कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघाले. एसएससी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे.

08:55 July 27

62,000 हून अधिक दारूच्या बाटल्या नष्ट

विजयवाड्यात जप्त केलेल्या हजारो दारूच्या बाटल्या रोडरोलरखाली नष्ट करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत 822 प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या 62,000 हून अधिक दारूच्या बाटल्या नष्ट करत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

08:52 July 27

एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले-उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले. काँग्रेस विश्वासघात करणार असल्याचे भासवित होते. शरद पवारांची तीच ओळख होते, असे सांगण्यात येत होते. पण, माझ्याच लोकांनी दगा दिला. सांगितले असते तर सन्मानाने दिले असते. अजून सरकारच स्थापन झालेले नाही. न्

08:48 July 27

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही, उपरवाले के मेहरबानी- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपवाले के मेहरबानी असे उत्तर दिले आहे. ते संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुलाखतीत बोलत होते.

08:00 July 27

कॉमनवेल्थचा भाग होताना मला आनंद वाटतो-लक्ष्य सेन

बर्मिंगहॅम येथील कॉमनवेल्थचा भाग होताना मला आनंद वाटतो. या खेळांचे भारतासाठी किती महत्त्व आहे, हे मी पूर्वी पाहिले आहे, असे बॅडमिंटन खेळाडू आणि थॉमस कप पुरस्कार विजेता लक्ष्य सेनने म्हटले आहे.

07:56 July 27

अमेरिका अधिक विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार असेल

माझ्या मते अमेरिका-भारत मैत्री केवळ अमेरिकेच्या हितासाठी नाही तर भारताच्या सुरक्षेसाठीही आहे. चीनच्या सीमेवरील काही आव्हाने पाहता अमेरिका अधिक विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार असेल, असे मूळ भारतीय वंशाचे, अमेरिकेचे खासदार आर. ओ. खन्ना यांनी म्हटले आहे.

06:52 July 27

मनी लाँडरिंग कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मनी लाँडरिंग कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे.

06:47 July 27

कर्नाटकमध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्याची हत्या

बेल्लारे, दक्षिण कन्नड येथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्राणघातक शस्त्रांनी वार करून हत्या केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दक्षिण कन्नड येथील सुलिया येथील पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांच्या निर्घृण हत्येचा निषेध केला. अशा घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. प्रवीणच्या आत्म्याला शांती लाभो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

06:31 July 27

कर्करुग्ण प्रमिता तिवारीला सीआयएससीईच्या १२ वी परीक्षेत ९७.७५ टक्के

लखनौ येथील कर्करुग्ण प्रमिता तिवारीने सीआयएससीईच्या १२वीच्या परीक्षेत ९७.७५% गुण मिळवले आहेत. माझे ध्येय डॉक्टर होणे आहे, असे ती सांगते.

06:30 July 27

कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

06:18 July 27

Maharashtra Breaking News : औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई-पालापाचोळ्यानेच आता इतिहास घडवला असून जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. शिवसेनेतून पालापाचोळा बाहेर पडल्याने आता शिवसेना स्वच्छ झाली आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ( Uddhav Thackeray interview ) केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले उद्धव ठाकरेंना अजूनही आपली चूक लक्षात आलेली दिसत नाही. ( Sudhir Mungantiwar criticizes Uddhav Thackeray ) देव करो आणि आपल्याला 'खंजीर'च चिन्ह मिळे या शब्दांत त्यांनी खरमरीत टीका केली आहे.

Last Updated : Jul 27, 2022, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details