महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : 29 जूनला भाजप आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना, सत्तास्थापनेच्या हालचाली? - Sudhir Munguntiwar on Shivsena

सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर देखील चर्चा झाली ( Maharashtra BJP core committee ) आहे. राज्यात होणाऱ्या सत्तेच्या उलथापालथ पाहता भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आणि सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना बुधवारी 29 जून सकाळपर्यंत मुंबई उपस्थित रहाण्याच्या सूचना कोअर कमिटीच्या बैठकीतून दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत ( BJP MLAs to come in Mumbai ) आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 28, 2022, 7:49 AM IST

Updated : Jun 28, 2022, 9:29 AM IST

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात बदलत असणारी सत्ता समीकरण पाहता भारतीय जनता पक्षाने सोमवारी आपल्या कोअर कमिटीची बैठक ( BJP core committee ) बोलावली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ( BJP meeting in Mumbai ) पार पडलेल्या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या निलंबन बाबतचा कोणतीही कारवाई 12 जुलैपर्यंत करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर देखील चर्चा झाली ( Maharashtra BJP core committee ) आहे. राज्यात होणाऱ्या सत्तेच्या उलथापालथ पाहता भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आणि सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना बुधवारी 29 जून सकाळपर्यंत मुंबई उपस्थित रहाण्याच्या सूचना कोअर कमिटीच्या बैठकीतून दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत ( BJP MLAs to come in Mumbai ) आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सत्तास्थापनेच्या आलेल्या संधीत विलंब होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.

सत्तास्थापनेचा प्रस्ताव देणार नाही-भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांकडे देणार नाही नसल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. मात्र आता होणाऱ्या राजकीय हालचाली वर भारतीय जनता पक्षाने बारीक लक्ष ठेवले आहे. तसेच बंडखोर आमदारांकडूनदेखील आपल्याला अद्याप कोणतेही सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला नसल्याचे कोर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवारसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला उच्च मंथन करण्यासाठी आजच्या कोर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेनेचा गट असल्याचे सांगतात, भाजपच्या गटाला शिवसेनेचे बंडखोर आमदार मानत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचे बारीक लक्ष आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. बहू मतचाचणी संदर्भात आमची कोणतेही अद्याप मागणी नाही, असेही ते म्हणाले. बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

Last Updated : Jun 28, 2022, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details