नागपूर -कोरोनाच्या काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा नागपूर खंडपीठाने सुनावली आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारामध्ये सुमारे 80 दिवसात निकाल देत शिक्षेस पात्र ठरलेले पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणात आरोपी वार्ड बॉय महेंद्र रंगारी हा इंजेक्शन चोरताना सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी सुद्धा इंजेक्शन हस्तगत केले होते. यात रेमडेसिवीर प्रकरणाचा निकाल लवकर लावण्याचे नागपूर खंडपीठाने जाहीर केले असून, जलदगतीने हा निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला अपील करण्यासाठी अर्ज करत जामिन मागितल्याने आरोपीला पुढील जामीनसुद्धा मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - पावसाच्या अपडेट
22:39 July 23
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा
20:06 July 23
वैतरणा नदी पात्राच्या मधोमध विजेच्या तारांवर अडकलेल्या दोन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
पालघर -वैतरणा नदी पात्राच्या मधोमध विजेच्या तारांवर अडकलेल्या दोन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात एनडीआरफच्या पथकाला यश आले आहे. सद्या पालघर परिसराध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
19:01 July 23
पुण्यात रिक्षावर कोसळले झाड, चालक जखमी
पुणे - पुण्यातील रास्ता पेठेत मोठे झाड रिक्षावर कोसळले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवत रिक्षात अडकलेल्या दोघांची सुटका केली. यामध्ये 5 चारचाकी, 1 ऑटोरिक्षा आणि एका सायकलचे नुकसान झाले आहे.
18:24 July 23
'ते साहित्य पोर्नोग्राफिक नाही' राज कुंद्रा यांचे हायकोर्टात अटकेला आव्हान
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी आता अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. त्यांच्यावरील आरोपांशी संबंधित व्हिडिओ हे "कामुक" म्हणून गणले जाऊ शकतात मात्र त्यातून कोणतेही "स्पष्ट लैंगिक कृत्य" दाखविले जात नाही असा युक्तिवाद कुंद्रा यांनी याचिकेत केला आहे.
18:21 July 23
कोल्हापूर महाप्रलय; NH 4 मार्ग वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर - तावडे हॉटेल ते शिरोली पुलाची हा NH 4 मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. सदर मार्गावर पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
17:16 July 23
पूरस्थितीत झालेल्या दुर्घटना दु:खद, या संकटातून सावरण्याचे बळ मिळो - राष्ट्रपती कोविंद
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सातारासह अनेक भागांमध्ये पूरस्तिथी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना झाली असून, ही घटना दु:खद आहे. इश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या संकटातून बाहेर काढण्यास सामर्थ्य देवो. तसेच या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या बचावकार्यामुळे परिस्तिथी नियंत्रणात येईल, अशी पार्थना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे.
16:51 July 23
राज कुंद्राला घेऊन पोलीस अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दाखल
मुंबई - उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. होती. त्यानंतर आज मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्र याला घेऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दाखल झाली आहे.
शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्याचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे याला हजर केले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.
16:27 July 23
मुंबई महापालिकेच्या इंजिनियरच्या पदोन्नतीत घोटाळा, विरोधी पक्षनेत्यांचा आरोप
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इंजिनियरच्या पदोन्नतीत घोटाळा झाला आहे. तसेच आर्थिक व्यवहार झाल्याचा व वरिष्ठांना डावल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. महापौरांनी न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. आर्थिक घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
16:18 July 23
आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळली, अनेक मार्ग बंद
सिंधुदुर्ग - आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापुर मार्ग ठप्प झाला आहे.
16:12 July 23
दूधसागर धबधब्याजवळ एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली
गोवा -मंगळुरूहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस दूधसागर धबधब्याजवळ रुळावरुन घसरली. सोनालीम आणि दूधसागर स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे ही रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याची माहिती मिळत आहे.
16:07 July 23
मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली बैठक
मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावर सायंकाळी साडेपाच वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. सर्व खात्यांच्या सचिवांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीला विनायक मेटे यांनाही आमंत्रण दिले आहे.
15:44 July 23
चिपळूणमधील पुरात अडकलेल्या 1800 लोकांचं रेस्क्यू
रत्नागिरी - चिपळूणमधल्या महापुरानं हाहाकार उडवला आहे. पुरात अडकलेल्या 1800 लोकांचं रेस्क्यू करण्यात आले आहे. चिपळूणमधल्या पोसरे -बौद्धवाडी येथे 17 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. तर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
15:43 July 23
खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी आर्मीला पाचारण
खेड - तालुक्यातील धामणंदमधल्या दुर्घटनेसाठी आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील बिरमई येथे दरड कोसळून 2 जण दगावले आहेत. चिपळूणमध्ये NDRF च्या 4 टीम दाखल झाल्या आहेत. आर्मी आणि नेव्हीच्या प्रत्येकी 4 टीम चिपळूणमध्ये पोहचत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एअरफोर्सच्या 3 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कालुस्तेमध्ये हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
15:33 July 23
महाड दरड दुर्घटना दु:खद; परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडून घेतला आढावा
नवी दिल्ली - महाडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली आहे. झालेली दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. तसेच यासंदर्भात राज्य सरकारला लागेल ती मदत केंद्र सरकार करायला तयार असल्याचे आश्वासन अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसेच राज्यातील पूरपरिस्तिथीचा आढावा अमित शाह यांनी NDRF चे डीजी एसएन प्रधान यांच्याकडून देखील घेतली आहे.
13:53 July 23
उद्योगपती राज कुंद्रा आणि रियान थोर्पेला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
13:51 July 23
तळई दरड दुर्घटना : प्राण वाचवण्यासाठी जे काही करता येणं शक्य आहे ते करत आहोत - मुख्यमंत्री
पूरग्रस्त भागातील नागरिकांना हलविण्याचे काम सुरू आहे, सर्वत्र सूचना दिल्या आहेत - मुख्यमंत्री
हे एक अनपेक्षित संकट- मुख्यमंत्री
13:17 July 23
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
महाड शहरात महापुराने सर्वत्र हाहाकार उडवलेला असतानाच ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. तुळई येथे दरड कोसळून जवळपास 30 घरे त्याखाली दबली गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तब्बल 32 जणांचे मृतदेह हाती आले असल्याची माहिती येत आहे. तर अद्याप 50 जण दबले असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
13:14 July 23
रत्नागिरी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनअभावी 8 जणांचा मृत्यू
रत्नागिरी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन अभावी 8 जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते
12:51 July 23
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुराचे पाणी
12:50 July 23
आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू
आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर गावात अनेक लोक अध्यापही अडकले आहेत. NDRF आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांकडून रेस्क्यूचे काम सुरू
12:38 July 23
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, 5 जण अडकल्याची भीती
रायगड - पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पुराच्या पाण्यामुळे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही. रायगड तळीये दरड दुर्घटना दोघांचे मृतदेह सापडले , 2 जखमीना बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी मदत कार्यात अडथळे येत आहेत. सध्या स्थितीत महडमध्ये एनडीआरएफ आणि वाईल्डर वेस्ट रेस्क्यू टीम मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
12:38 July 23
12:33 July 23
महाड पोलादपूरसाठी एनडीआरएफचे पथक हेलिकॉप्टरने रवाना
मुंबई विमानतळावरून रायगड जिल्ह्यात दरड कोसळलेल्या भागात शोधकार्य आणि बचाव मोहीम राबविण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे.
12:29 July 23
चिपळूणमध्ये एनडीआरएफकडून बचाव कार्य सातत्याने सुरूच, सखल भागातील गावकऱ्यांचे स्थलांतर सुरू
चिपळूनमध्ये एनडीआरएफकडून बचाव कार्य सातत्याने सुरूच, सखल भागातील गावकऱ्यांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. मिरजोळ परिसरात आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 150 जणांना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.
12:26 July 23
मेळघाटात ढगफुटी झाल्याने शेतीला नदीचे स्वरूप
अमरावती - मेळघाटात ढगफुटी झाल्याने शेतीला नदीचे स्वरूप, शेकडो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मुसली नदीला महापूर आल्याने शेत जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे मेळघाटाला पाण्याने वेढले आहे; अनेक गावांचा संपर्क तुटला असून दरड कोसळल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
12:20 July 23
मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला महाड पूरग्रस्तांचा आढावा, प्रशासनाला सूचना
- महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.
- बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे.
- महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे.
- माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.
- महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले आहे.
12:14 July 23
किणी टोल ते कोल्हापूर हायवेवरील हलकी, चारचाकी वाहने यांना वाहतूक खुली करण्यात आली आहे -कोल्हापूर पोलीस
11:57 July 23
केंद्राकडे लस मागणी करण्यासाठी फडणवीसांना घेऊन जाणार - राजेश टोपे
- राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख लस मिळते, ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख डोस मिळत आहेत,
- केंद्राकडे लस मागणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना घेऊन भेटायला जाणार आहे
- ज्या लस येतात ते देतो, केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्याला लस मिळत आहे
- आयसीएमआरने जेजे प्रोटोकॉल दिले ते पाळले जात आहेत. आताही जर त्यांनी काही गाईडलाईन दिल्या तर त्याच्यानुसार निर्णय घेतले जातील,
- शाळा सुरू करण्याबाबत आसीएमआरने सांगितल्यास आम्ही मुख्यमंत्री सोबत बसून निर्णय घेऊ
- मुख्यमंत्री आम्ही सगळे शिथिलता बाबत रिपोर्ट मागवत आहोत, काही ठिकाणी शिथिलता देण्यात येतील का, याचा रिपोर्ट मागवला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल
- ऑक्सिजनमुळे महाराष्टात एकही मृत्यू नाही देशात अस काही बोलल जातंय पण इतर राज्यात आशा केसेस असतील,ऑक्सिजन लिकेज मुळे झाल्या असतील
- जिथे जिथे पूरस्थिती असेल तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत,या भागात लसीकरण करा अस सांगितले आहेत,
- आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलर्ट देत असतो त्यानुसार योजना केल्या जात असतात
11:56 July 23
उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार
- कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर परिणाम
- गुरुवारी 76 हजार लिटर संकलन घटल
- आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज
- पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलन आणि विक्री वर देखील परिणाम
- अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती
11:11 July 23
कोल्हापुरात चिखली येथे एनडीआरएफ आणि स्थानिकांकडून बचाव कार्य सुरू
10:43 July 23
गोवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 3 वर
09:53 July 23
मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर येथे घर कोसळून 2 जणांचा मृत्यू
- - प्लॉट नंबर 3, बॉम्बे हॉस्पिटल शिवाजी नगर येथील तळ अधिक एक माजल्याचे घर कोसळले
- - पहाटे 5 वाजताची घटना
- - 6 जखमींना राजावाडी आणि 4 सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
09:50 July 23
महाड, रायगडमध्ये नौदलाचे पथक दाखल
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांच्या महापुराचे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, एसडीआरएफसह नौदल आणि तटरक्षक दलाची मदतही घेतली जात आहे. या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नौदलाच्या आयएनस शिक्रावरून हेलिकॉप्टरसह एक पथक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. पोलादपूरमध्ये आज सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू कऱण्यात आले आहे.
09:31 July 23
मुंबईत अति मुसळधार पावसाचा अंदाज, हायटाई़डचीही शक्यता
मुंबईत अति जोरदार तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 50 ते 70 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच समुद्राला दोन वेळेस भरती येण्याचा अंदाज असल्याने यावेळेत जोरदार, मुसळधार पाऊस पडल्यास समुद्रात 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळू शकतात, पावसाचे पाणी समुद्रात सोडणे बंद केल्याने पाणी शहरात साचून राहू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाची नोंद-
22 ते 23 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात
शहर 4.84
पश्चिम उपनगर 16.02
पूर्व उपनगर 21.75 मिलिमीटर पावसाची नोंद
समुद्राला दोन वेळा मोठी भरती
सकाळी 11.37 वाजता 4.59 मीटरची समुद्राला भरती
रात्री 11.32 वाजता 4.01मीटरची समुद्राला भरती
09:30 July 23
जळगावातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडले; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन
जळगाव- हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गुरुवारी रात्री 10 वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरे-ढोरे सोडू नये, अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून पूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही पावसाचा इशारा असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे. गेल्या 21 तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 14.20 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
09:28 July 23
राज्यात मुसळधार पाऊस, NDRF च्या एकूण १८ टीम तैनात
राज्यात कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार केला आहे. अनेक ठिकाणी पूराची गंभीर परिस्थितीन निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीव NDRF च्या एकूण १८ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ४ चिपळूण आणि ३, महाड मध्ये कार्यरत आहेत. इतर पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, नागपूर, ठाणे आणि मुंबईमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
09:16 July 23
सातारा - कोयना धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याच विसर्ग
सातारा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून 10 क्युसेक पाण्याच विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक्स इतका वाढवण्यात येणार आहे.
09:15 July 23
पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; अनेक महत्वाचे मार्ग बंद
कोल्हापूर - पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून अनेक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत, यामध्ये NH4 महामार्ग सुद्धा बंद करण्यात आला आहे. कागल- निपाणी मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे
09:14 July 23
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी
सांगली - शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी, गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 574 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण 95 टक्के भरले असून 32 .73 टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणातून 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरू..
09:13 July 23
कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर , कृष्णेचे पाणी शहरात
सांगली - कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर ,40 फूट इशारा तर 45 धोका पातळी - इशारा पातळीकडे वाटचाल सुरू - सांगली शहरातील नागरी वस्ती मध्ये शिरू लागले कृष्णेचे पाणी, - पूरपट्ट्यातील 150 अधिक कुटूंबांचे स्थलांतर -कृष्णेचे पातळी आणखी वाढण्याचा अंदाज.
08:59 July 23
रायगड जिल्ह्यात सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली
08:57 July 23
तुतारी एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच गुरुवारी चिपळून शहर पाण्यात गेले असताना, गुरुवारी पहाटेपासून कोकणाकडे जाणारी तुतारी एक्स्प्रेस चिपळूण स्टेशनवर अडकून पडली होती. तिला आता माघारी फिरवण्यात आले असून सर्व प्रवाशांना मुंबईत सोडण्यात येणार आहे.
07:08 July 23
लोणारे येथे मुंबई गोवा महामार्गावर पाणी, पावसाचा जोर कायम
रायगड - मुंबई गोवा महामार्गावर लोणारे येथे रस्त्यावर पाणी आले आहे. अद्यापही दरड कोसळलेल्या भागात प्रशासकीय यंत्रणा पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. माणगाव, महाड, पोलादपूर परिसरात रात्रभर पडत आहे. पूरस्थिती कायम, शेकडो नागरिकाची रात्र पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पुढे मदत कार्यासाठी जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
07:05 July 23
पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोल्हापूर- पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, गुरवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजता पाणीपातळी 43.6 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 111 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.
07:02 July 23
कोल्हापुरात एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू
कोल्हापूरमध्ये एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच त्यांनी बचाव कार्याला सुरवात केली. जिल्ह्यातील चिखली येथील नागरिकांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे
06:57 July 23
एनडीआरएफच्या पथकाला रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्याचा अडथळा, सकाळी झाले रवाना
महाडसाठी पुण्यामधून एनडीआरएफ पथक महाडकडे रवाना.. रात्रीच्या वेळीच 24 जणांचे हे पथक महाडपासून 9 किमी अंतरावर दाखल झाले होते. पंरतु काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे त्यांना पुढे जाणे अशक्य होते. त्यामुळे पाणी कमी वाट होण्याची वाट पाहून ते शुक्रवारी सकाळीच कोणत्याही परिस्थितीत पुढे बचावकार्यासाठी जाणार असल्याची माहिती एनडीआरएफ पथकाकडून देण्यात आली.
06:54 July 23
पाचाड मार्गावरील दरड हटवली, बचाव पथक तळईकडे रवाना, हेलिकॉप्टरचीही मदत घेणार
रायगड - पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरडग्रस्त भागात निघाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर काही वेळेत महाड मध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येणार आहे. लाडोली येथील आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
06:28 July 23
चिपळूणमध्ये एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरूच
रत्नागिरी- कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळून शहरासह अन्य काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये गुरुवारी सायंकाळपासून एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी स्थानिक आपत्ती व्यस्थापन संघटनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
06:05 July 23
BREAKING
रायगड - महाड तालुक्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. महाडमध्ये काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर खरवली आणि आकले गावाला पाण्याने वेढा दिला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने येथील नागरिकांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचाव कार्याचा वेग वाढवण्यात येत आहे. आज सकाळी एनडीआरएफची पथके बचाव कार्यासाठी दाखल होत आहेत.