महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARSHTRA BREAKING : शालेय शुल्कात 15 टक्के कपात; शासन निर्णय जारी - maharashtra govt maratha reservation

Nagpur
Nagpur

By

Published : Aug 12, 2021, 10:00 AM IST

Updated : Aug 12, 2021, 7:52 PM IST

19:48 August 12

शालेय शुल्कात 15 टक्के कपात; शासन निर्णय जारी

मुंबई -2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फीमध्ये 15 टक्के कपात करण्यात यावी. यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे, अशी अतिरीक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यामध्ये अथवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी. याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करण्याचे आदेश ही शासनाने दिले आहेत.

19:24 August 12

परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी

ठाणे - परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. कोपरी व ठाणे नगर पोलीस ठाणे या दोन्ही पोलीस ठाण्याने नोटीस जारी केली आहे. परमबीर सिंह यांच्यासह याच खंडणी प्रकरणातील इतर मोठ्या आरोपींच्या विरोधातही लूक आऊट नोटीस काढण्याची प्रक्रिया लवकरच ठाणे पोलीस सुरू करणार आहे.

15:31 August 12

शरद पवार यांच्या आवाजात मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला बदलीसाठी फोन, गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई -शरद पवार यांचा आवाज काढत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना अज्ञात व्यक्तीने बदलीसाठी फोन केला होता. याबाबत गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14:15 August 12

गोवा हादरले, कलंगुट समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला

महिला अत्याचाराच्या घटनेने गोवा पुन्हा एकदा हादरले

कलनगुट (calngute) समुद्रकिनारी एका तरुण मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला,

मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला असून पुढील तपास calngute कलनगुट व म्हापसा पोलीस करत आहेत

14:03 August 12

पॉर्नोग्राफी प्रकरणी गहना वशिष्ठला दिलासा नाही, जामिन फेटाळला

पॉर्नोग्राफी प्रकरणी गहना वशिष्ठला दिलासा नाही

गहनाची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली

गहना वशिष्ठ विरोधात मुंबई पोलिसांकडून दोन स्वतंत्र FIR दाखल 

13:35 August 12

जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक अॅड. रवींद्र पाटील यांचा बँक संचालक पदाचा राजीनामा

जळगाव-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक ऍड. रवींद्र पाटील यांनी आपल्या बँक संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थानला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटच्या विषयाबाबत बँकेकडून कार्यवाही होत नसल्याने ऍड. रवींद्र पाटील हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. एकीकडे ईडीने जिल्हा बँकेला मुक्ताईनगर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या विषयाबाबत नोटीस बजावलेली असतानाच दुसरीकडे, ज्येष्ठ संचालक ऍड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

13:19 August 12

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू,  आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या यासंदर्भात बैठक सुरु असल्याची माहिती.  बैठकीला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे देखील उपस्थित

13:10 August 12

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला , ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी -मेटे

विनायक मेटे

मुंबई - मराठा आरक्षणासाठी गरजेचे असणारे 127 वी घटना दुरुस्तीचे विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेट यांनी पंतप्रधान मोदी साहेब यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे देखील मनःपूर्वक आभार व्यक्त केले. 102 च्या घटना दुरुस्ती केल्यामुळे संभ्रम दूर झाला आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राने जे बिल पास केले आहे, त्या कायद्यामुळे आता राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार असणार आहेत. शिवसंग्राम पक्षाने हीच भूमिका मांडली होती. मात्र ठाकरे सरकारने राजकीय इच्छा शक्ती दाखवली तर मराठा आरक्षण मिळू शकेल. ठाकरे सरकारची इच्छाशक्ती आहे का हे सांगावे, अशा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

राज्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत. मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, मराठा समाजावर जातीय अन्याय होऊ शकतो., त्यामुळे सर्व जातीय सदस्य राज्य मागासवर्गीय आयोगात नेमावेत, अशी मागणी मेटे यांनी केली. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगात जे जातीय लोक आहेत त्यांना हटवावे, 19 ऑगस्ट मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. सरकारने 18 ऑगस्ट पर्यंत तोडगा काढला नाही तर सरकारची झोप उडवू, आमच्या बैठकीआधी सरकारने तोडगा काढावा, त्या दिवशी आम्ही मराठा समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत भूमिका ठरवणार असल्याचे मेटे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरकाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून स्मारकाच्या कामासाठी अर्धा तासाची वेळही सरकार देत नसल्याचा आरोप मेटेंनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांवर बैठकीत आम्ही चर्चा करणार. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 50% शाळा फी माफ करावी अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,  हे सरकार मेलेल्या मनाचे झाले आहे

.शिक्षण मंत्र्यांना भेटून केवळ आश्वासन दिले जाते, शाळा बंद असून ही शाळा फी वसुली सुरू आहे. अनेक शाळांनी बोउन्सर आणून ठेवले आहेत. शिक्षक आमदार,पदवीधर आमदार शाळा प्रकरणावर गप्प का? असा सवाल मेटे यांनी केला आहे.

ट्रान्सपोर्ट फी,लायब्ररी फी आकारली जात आहे ही अयोग्य आहे. शिक्षण साम्राटांचे खिसे भरण्यासाठी सरकार काम करत आहे. फी वसुलीचा दबाव आणला जात आहे . सरकारची मानसिकता लोकांना सामोरे जाण्याची नाही., नाचता येईना अंगण वाकडे असे सरकारचे काम..

50% ची मर्यादा ही आजची नाही, 50% आत ही मराठा समाजाला आरक्षण देता येईल, आयोगामार्फत सर्व्ह करत मार्ग काढता येईल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तर करावी, 

नाकर्तेचे नाव म्हणजे अशोक चव्हाण, अशी टीकाही मेटेंनी केली

12:21 August 12

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न...

यवतमाळ-  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याचे पुनर्वसन रखडल्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. उमरखेड तालुक्यातील कुरुळी येथील आमडापूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन केले आहे. आमरण उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा मार्ग अवलंबला आहे. नऊ ऑगस्ट पासून आझाद मैदान यवतमाळ येथे सुरू आहे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. 18 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे.

11:08 August 12

मुंबई - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटर कडून लॉक,  राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे कारवाई केल्याचा थोरतांचा आरोप

09:27 August 12

नागपूर - छत्तीसगड येथून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या माध्यमातून रेतीची तस्करी उघड, १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल जप्त,१५ अटकेत

09:13 August 12

नागपूर - नागपूर पोलीस दलातील महिला उपनिरीक्षक मंगला हरडे पोहोचल्या कोण होणार करोडपतीच्या हॉट सीटवर

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर येथे कार्यरत महिला पोलीस उप निरीक्षक मंगला हरडे (नांदगाये) या स्वतः च्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोण होणार करोडपती ( मराठी)  या कार्यक्रमाच्या हॉट सीट वर पोहोचल्या आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत महिलांसाठी एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. नागपूर पोलीस दलासाठी आणि संपूर्ण नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

Last Updated : Aug 12, 2021, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details