मुंबई -राज्यात सोमवारी ४,८७७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी ६२५८ तर बुधवारी ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज त्यात आणखी वाढ होऊन ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी ५३, मंगळवारी २५४, काल त्यात वाढ होऊन २८६ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ११,१२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
MAHARASHTRA BREAKING : राज्यात दिवसभरात 7 हजार 242 कोरोनाबाधितांची नोंद, 11 हजार 124 कोरोनामुक्त
22:54 July 29
राज्यात दिवसभरात 7 हजार 242 कोरोनाबाधितांची नोंद, 11 हजार 124 कोरोनामुक्त
21:24 July 29
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी पर्यटकांसाठी पुन्हा खुली
- कोरोनाचे नियम पाळून करता येणार चिखलदरा मधून जंगल सफारी
- पर्यटकांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे गरजेचे
- पर्यटकांचे थर्मल स्कँनिंग अनिवार्य
- शनिवार व रविवारी जंगल सफारी राहणार बंद
- जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आदेश
19:52 July 29
माझ्या विरोधातील एफआयआर रद्द करा, अकबर पठाण यांची कोर्टात धाव
- डीसीपी अकबर पठाण यांची एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका
- परमबीर सिंह यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलेल्या पठाण यांची हायकोर्टात धाव
- सेवेत असलेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांविरोधात गुन्हा दाखल होणं ही गंभीर बाब - हायकोर्ट
- राज्य सरकारला या संदर्भात उद्या तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
- उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा देण्याची पठाण यांची मागणी हायकोर्टानं फेटाळली
- तुम्ही संरक्षण मागताय? तुम्ही इतरांना संरक्षण द्यावं- हायकोर्ट
18:11 July 29
- शिल्पा शेट्टीची हाय कोर्टात धाव
- मीडियामधील रिपोर्टिंगवरुन शिल्पा हाय कोर्टात
- मीडिया रिपोर्टिंगवर शिल्पा शेट्टी नाराज
17:23 July 29
पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रांची हायकोर्टात याचिका
- पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रांची हायकोर्टात याचिका
- मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप
- न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी
- तपासात सहकार्य करूनही पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा याचिकेत दावा
- मुळात आरोपपत्र दाखल झालेलं असताना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस देणं आणि कोर्टाला कळवणं अपेक्षित होतं
- कोरोनाकाळात गरज नसताना उगाच आरोपींना अटक करून जेलमधील गर्दी वाढवू नका
- कोरोनाकाळात आरोपींच्या अटेकबद्दल निर्देश स्पष्ट असतानाही मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली
17:11 July 29
लोकलबाबत अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे
- लोकलबाबत अद्याप निर्णय नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे
- रेल्वे विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेणार
- २५ जिल्ह्यातील निर्बंध हटवणार
- ११ जिल्ह्यात लेव्हल ३ चे आदेश
- कोकणातील ४ जिल्ह्यात लेव्हल ३ चे आदेश
- पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांना दिलासा
16:52 July 29
महापूराच्या मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका
सांगली- महापुराच्या मदतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारने बहाणेबाजी बंद करावी, स्वतःच्या जबाबदारी का झटकून द्यायची, असे कसे चालेल, आम्ही सत्तेत असताना केंद्राची वाट न बघता महाराष्ट्राच्या ताकतीवर मदत केली. आघाडी सरकारने केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वतः मदत करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
14:57 July 29
नाशिकमध्ये अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे लढणार निवडणूक
नाशिक -राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी त्यांना अत्यंत दुरावस्था पाहायला मिळाली. तसेच मनसे काळातील प्रकल्पांना राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी अशीही अमित ठाकरेंनी पालिका आयुक्तांना मागणी केली आहे. पालिकेच्या इंजिनीअर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही. तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल. असा इशाराही ठाकरेंनी दिलाय. दरम्यान, नाशिकमध्ये अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.
14:53 July 29
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यासाठी सोनू जलान आणि त्यांचे सहकारी केतन तन्ना ठाणे नगर पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. परमबीर यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पैशांची मागणी करत मानसीक त्रास दिल्याची तक्रार दाखल करणार आहे. दरम्यान, क्रिकेट बुकी प्रकरणात परमबीर सिंग यांच्या आदेशाने खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सोनु जलानला अटक केली होती.
14:50 July 29
जळगावात शेतीच्या वादातून गोळीबार, एक जण जखमी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पळासखेडा गावात शेतीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गोळी लागून जखमी झाला आहे. जखमीला जळगावात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी भडगाव पोलीस गेले आहेत.
12:40 July 29
हॉटेल रेस्टॉरंट यांवरील निर्बंधांबाबत निर्णय लवकरच- अस्लम शेख, पालकमंत्री
मुंबई- २०२० मध्ये खावटी अनुदानातून ५ लाख लोकांना ७.५ लाख मदत
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होईल...
हॉटेल रेस्टॉरंट यांवरील निर्बंध आणि मुंबईतील एकंदरीत निर्बंध शिथीलता यांबाबतही २-३ दिवसांत निर्णय होईल...
मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक...या बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री निर्णय घोषित करतील.
लोकलमध्ये प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील, अशी माहिती पालकमंत्री शेख यांनी दिली.
गोर गरिबांना मदत आणि हक्क मिळवून निकष व पात्रता तपासण्याच काम करावं
12:20 July 29
केंद्राचे सातशे कोटी पीकविम्याचे पूरग्रस्तांना मदत नाही - रोहित पवार
कोल्हापूर - आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूर दौरा करून पूरपरिस्थितीची पाहणी केली.
केंद्राकडून अद्याप कोणतेही मदत नाही
राज्य सरकारने यापूर्वी पीकविमासाठी ३ हजार कोटींची मागणी केली होती
त्यातील ७५० कोटी आता दिले आहेत
मात्र अनेकांनी पुराची मदत केली असे चित्र तयार केले
12:18 July 29
अंधेरीच्या एका हॉटेलमधून एका महिलेला एमडी ड्रग सह अटक
मुंबई - अंधेरीच्या एका हॉटेलमधून एका महिलेला एमडी ड्रग सह अटक करण्यात आली आहे. एनसीबीने अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात केली कारवाई.
महिलेकडून वीस लाख रुपयांची रोकड जप्त कऱण्यात आली आहे. तर
जोगेश्वरीतून देखील एका ड्रग तस्कराला अटक. एम डी ड्रग्स आणि रोखड जप्त
12:12 July 29
कोरोना लसीचे दोन डोस मिळाले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या - राज ठाकरे
पुणे - ज्यांना कोरोना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली पहिजे.
- लॉकडाऊन आवडे सरकारला, असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.
- लॉकडाऊन केल्याने सरकारचे काहीच बिघडत नाही. उलट त्यांना कोणी प्रश्न विचारणारा राहात नाही. त्यामुळे लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे.
- लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे रोजगार बुडत आहेत. जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होत आहे.
- शहरांचे नियोजन नसल्यामुळे थोडासा पाऊस पडला तरी पुर स्थिती आणि पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहेत.
11:42 July 29
राज्यात महापुरात 169 अधिकृत मृत्यू असून 1 जण बेपत्ता, 55 जण जखमी - वडेट्टीवार
- केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- रस्त्यांचे नुकसान साधारण आठशे कोटी रुपये आहे, विद्युत विभागाचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे
- अजून सर्व ठिकाणी पंचनामे व्हायचे आहे, सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केले आहे...
- चिपळूण, महाड, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचा आणि मालमत्तेचे नुकसान झाला आहे.
- या सगळ्यांचा पूर्ण पंचनामा आल्याशिवाय आपण मदतीचा निर्णय घ्यायचा नाही, अशी चर्चा झाली
- पूरग्रस्तांना तातडीनं दहा हजार रुपये, सोबत काही धान्य बाधित कुटुंबाना लगेच देणार आहोत.
- किमान साठ-सत्तर हजार तरी कुटुंबाना ही मदत केली जाईल, कुटुंब संख्या वाढू शकते असेही वडेट्टीवार म्हणाले
- 10 हजाराची मदत बँकेमार्फत खात्यात करू, भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचे नाही.
11:10 July 29
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या टास्कफोर्सची बोलावली बैठक
10:38 July 29
रायगड ठाण्यात 2 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील काही जिल्हे, तसेच पश्चि्म महाराष्ट्रता सोलापूर, सांगली, सातारा पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामाना विभागाकडून व्यक्त कऱण्यात आली आहे.
10:11 July 29
आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, पूरग्रस्त चिपळूणची करणार पाहणी
मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. मात्र, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.
10:10 July 29
मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता
मुंबई -मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता
- 40 ते 60 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहण्याची शक्यता
- दुपारी पावणे चारच्या सुमारास समुद्राला मोठी भरती
- 4.08 मीटरच्या लाटा उसळण्याच्या शक्यता
- पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची माहिती
09:17 July 29
नितीन राऊत कोकण दौऱ्यावर, पूरग्रस्तांची करणार मदत
काही दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोकणात मोठ्या प्रममाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी मी तिथे जात आहे. ज्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी सौर्य उर्जा संच दिले जातील. याचबरोबर अतिवृष्टी बाधित लोकांना कपडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पूरवल्या जातील, अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली
09:10 July 29
२ ऑगस्टपर्यंत कोकण, विदर्भात सर्वदूर, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र ४८ तासांत पश्चिमेकडे झारखंड, बिहारपर्यंत सरकेल. ऑफ शोअर ट्रफ द. महाराष्ट्र ते उ. केरळ किनाऱ्यावर.
२ ऑगस्टपर्यंत कोकण, विदर्भात सर्वदूर, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.- आयएमडी
06:11 July 29
उर्जा मंत्री नितीन राऊत कोकण दौऱ्यावर, अतिवृष्टीबाधित भागाला देणार भेट