महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाआघाडी सरकारकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक! - लखीमपूर घटना

यूपीतील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले असल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज यासंबंधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Bandh call
Maharashtra Bandh call

By

Published : Oct 9, 2021, 7:04 PM IST

Updated : Oct 9, 2021, 7:19 PM IST

मुंबई - लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले असल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज यासंबंधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, या सेवेमध्ये कुठलीही बाधा होणार नाही. यासंबंधी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केल्या आहेत. तसेच 11 ऑक्टोबरला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्याची जनता शंभर टक्के प्रतिसाद देईल, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नंतर इतर राज्यातही बंदची सुरुवात होईल -

लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जातोय. यासाठीच महाराष्ट्र सरकारने बंदची हाक दिली असून या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळेल आणि देशभरात ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. अशा प्रत्येक राज्यात घटनेच्या विरोधात बंदची हाक दिली जाईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात अमानुषता आहे. या अमानुषतेच्या विरोधातच जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महाआघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक
लखीमपूर प्रकरणात पंतप्रधानांची दातखिळी बसली आहे -
लखीमपुर प्रकरणाचा निषेध संपूर्ण देशभर केला जातोय. मात्र या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चकार शब्दही काढलेला नाही. या प्रकरणात त्यांची दातखिळी बसली आहे असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांना लगावला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात प्रायव्हेट आर्मी तयार केली गेली पाहिजे असं वक्तव्य भाजप नेते करतात. त्यांची ही प्रायव्हेट आर्मी जम्मू-काश्मीरला पाठवावी असा टोलाही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून लगावला.


हे ही वाचा -शाहरुख खानच्या वाहन चालकाला एनसीबीचे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर

गृहराज्यमंत्री यांचा मुलगा नेपाळला पळाला -

लाखीमपूर खेरीमध्ये आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गृहराज्यमंत्री त्यांचा मुलगा या घटनेनंतर नेपाळला पळून गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे केले. शेतकऱ्याला देशोधडीला मिळवण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मात्र शेतकऱ्याच्या मागे आपण आहोत हा संदेश शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा -VIDEO : ईडीकडे सखोल पुरावे, आनंदराव अडसूळांना हायकोर्टात दिलासा मिळणार नाही - रवी राणा

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत -
मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्याला तात्काळ मदत दिली जाईल. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून ही मदत जाहीर केली जाणार आहे. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

Last Updated : Oct 9, 2021, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details