महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Malegaon blast case - योगी आदित्यनाथ यांच्यासह 'या' नेत्यांचे नाव घेण्याचा एटीएसने टाकला दबाव, साक्षीदाराचा आरोप - मालेगाव प्रकरण साक्षीदार आरोप

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयए न्यायालयात साक्षीदाराने नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. साक्षीदाराने एटीएसने आपल्यावर दबाव टाकून आरएसएसच्या पाच लोकांचे नाव घेण्याचे सांगितले असल्याचा खुलासा आज मंगळवार (दि.28) रोजी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणीदरम्यान केला आहे.

Yogi Adityanath Malegaon case
न्यायालय

By

Published : Dec 28, 2021, 8:02 PM IST

Updated : Dec 28, 2021, 8:25 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयए न्यायालयात साक्षीदाराने नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. साक्षीदाराने एटीएसने आपल्यावर दबाव टाकून आरएसएसच्या पाच लोकांचे नाव घेण्याचे सांगितले असल्याचा खुलासा आज मंगळवार (दि.28) रोजी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणीदरम्यान केला आहे. त्यामुळे, एटीएसचे तत्कालीन प्रमुख परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माहिती देताना मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी

हेही वाचा -Nana Patole On Governer : राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा : नाना पटोले

मालेगाव स्फोटात आता नवे ट्विस्ट आले आहेत. यात परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील साक्षीदार पलटल्याने एटीएसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये आज विशेष एनआयए कोर्टात साक्षीदाराने धक्कादायक खुलासे केले आहेत. यात साक्षीदाराने एटीएसवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे, परमबीर सिंग यांच्याही अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आतापर्यंत 15 साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत एकूण 15 साक्षीदारांनी आपले साक्ष बदलले आहे. मुंबईत विशेष एनआयए न्यायालयामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात रोज सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 208 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

काय म्हणाला साक्षीदार?

आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 ची साक्ष झाली. साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला की, जर साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब दिला नाही तर, त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करावा यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने न्यायालयात आज केला. या उच्चपदस्थ आरएसएस पदाधिकाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे होती. तत्कालीन एटीएसचे अधिकारी परमबीर सिंग आणि डीसीपी श्रीराव यांच्यावरील या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंह यांच्यावर आरोप?

काही लोकांची नावे या केसमध्ये घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप साक्षीदाराकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो. देवधर काकाजी, इंद्रेश कुमार यांना या गुन्ह्यात गुंतवण्यासाठी साक्षीदारांवर दबाव टाकल्याचे साक्षीदाराने कोर्टात साक्ष देताना सांगितले आहे. त्यामुळे, एटीएसची डोकेदुखी वाढली आहे. एनआयएने हजर केलेला साक्षीदार फिरला असून त्यानेच दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) परमबीर सिंग आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2006 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष ( NIA ) न्यायालयात सुनावणी झाली आहे.

नेमके आत्ताच योगी आदित्यनाथ यांचे नाव कसे समोर येते? - मुफ्ती इस्माईल

माहिती देताना मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल

2008 मध्ये मालेगाव ब्लास्ट झाला होता. त्यानंतर आज एखादा साक्षीदार आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचे सांगत आहे. याबाबतीत त्या साक्षीदारावर कितपत विश्वास ठेवायचा. ज्या वेळेस ब्लास्ट झाला होता त्यानंतर या ब्लॉकमध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांची गाडी आढळल्यानंतर याबाबत चौकशी सुरू झाली होती. मात्र या गेल्या 14 वर्षांमध्ये कधीही योगी आदित्यनाथ यांचे नाव या प्रकरणात घेतले गेले नाही. मग नेमके आत्ताच या प्रकरणात योगी आदित्यनाथ यांचे नाव कसे समोर येते? काही दिवसांतच पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला फायदा मिळावा यासाठीच अशी नाव जाणून बुजून समोर आणले जात असल्याचा आरोप मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला.

हेही वाचा -MH Assembly Winter Session 2021 : अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात? वाचा, आज विधानसभेत काय घडले?

Last Updated : Dec 28, 2021, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details