मुंबई - राज्यातील मत्स्य व्यवसायाला ( Maharashtra fisheries Business ) चालना देत, सवलतीच्या दरात कर्ज देणे त्याचसोबत आपत्तीच्या काळात सरकार व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याबाबात सतत प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Shaikh ) यांनी दिली. ते विधानपरिषदेत बोलत होते.
विकासाच्या योजना राबवणार
विधानपरिषद सदस्या निलय नाईक ( Mla Nilay Naik ) यांनी राज्यातील मत्स्य व्यवसायाला ( Maharashtra fisheries Business ) मत्स्य शेतीचा दर्जा देणे, मत्स्य व्यावसायिकांना सवलतीच्या दरात कर्ज व इतर सुविधा देणे याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अस्लम शेख ( Minister Aslam Shaikh ) म्हणाले की, "राज्यात मत्स्य व्यवसायाच्या ( Maharashtra fisheries Business ) अनेक योजना आहेत. मच्छीमारांना क्यार, निसर्ग व तौक्ते सारखी वादळांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाई दिली आहे. मत्स्यव्यवसाय विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले."
मश्चिमारांच्या प्रश्नावर सदस्य आक्रमक
दरम्यान, शेकापचे आमदार जयंत पाटील ( Mla Jayant Patil ) यांनी म्हटलं की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Minister Dattatray Bharane ) यांनी 10 ऑक्टोबर 2019 ला राज्य सरकारने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, अद्यापही अहवाल आलेला नाही. तसेच, मत्स्य व्यवसायाला अद्याप शेतीचा दर्जा मिळालेला नसल्याची बाबही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. तर मच्छिमारांना डिझेल परतावा मिळत नाही, शासनाने तो तात्काळ मिळवून द्यावा, अशी मागणी करत आमदार शशिकांत शिंदे ( Mla Shashikant Shinde ) यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला.
हेही वाच -Bhima Koregaon Elgar Parishad Case : भीमा कोरेगाव, एल्गार परिषदेतील त्या आठ आरोपींना जामीन देण्यास न्यायालयाचा नकार