मुंबई -माझ्याकडे आतापर्यंत वीस याचिका अपात्रते संदर्भात ( Rahul narwekar on shivsena mla disqualification ) दाखल झाल्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. शिवसेना पक्षाचे 15 आमदार अपात्र होऊ शकतात, असे खळबळजनक वक्तव्य विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले आहे. तर, सरकार अडीच वर्षे नक्की टिकेल, असा दावाही नार्वेकर ( Rahul narwekar speaker maharshtra assembly ) यांनी केला आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची सरकार स्थापन झाली आहे. हे सरकार आपला कार्यकाल निश्चितपणे पूर्ण करेल, त्यात कोणतीही बाधा येणार नाही, असा विश्वास विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा -CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला
वरिष्ठांचा दबाव नाही -विधानसभा सभागृहात राज्यातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज आमदार असणार आहेत. याचा दबाव येणार नाही का? असे विचारताच राहुल नार्वेकर म्हणाली की, माझ्यावर दबाव येण्याचा प्रश्नच नाही. मला माझ्या नेमून दिलेल्या अधिकारात कार्य करायचे आहे. विधानसभा अध्यक्षाच्या अधिकार कक्षेतच मी काम करणार आहे. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे, कुणीही वरिष्ठ किंवा जेष्ठ असेल तरी त्याचा दबाव येणार नाही, असेही नार्वेकर म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियमाप्रमाणे -विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही नियमाप्रमाणे झाली आहे का? राज्यपालांनी पक्षपातीपणा केला असे वाटत नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, असे अजिबात वाटत नाही. राज्यपालांना त्यांचे संविधानाने दिलेले अधिकार आहेत. केव्हा कोणती निवडणूक घ्यायची हे त्यांना चांगले ठाऊक आहे. गेल्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नव्हते. त्यामुळे, निवडणूक घेण्याबाबतची तारीख त्यांनी दिली नाही. मात्र, आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर अध्यक्षपदाची निवडणूक घेणे राज्यपालांना संयुक्तिक वाटले असावे, म्हणून त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक असावी. त्यात काहीही गैर नाही, असे समर्थन राहुल नार्वेकर यांनी केले.