विधानपरिषदेत अनेक मान्यवरांच्या निधनावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्तावावर भाषण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. उद्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे.
MLC Live Updates : शोक प्रस्तावानंतर दिवसभर कामकाज तहकूब - Maharashtra Assembly Session 2022
![MLC Live Updates : शोक प्रस्तावानंतर दिवसभर कामकाज तहकूब विधीमंडळ परिसर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14622796-thumbnail-3x2-mlc.jpg)
12:10 March 03
कामकाज तहकूब
12:05 March 03
शोक प्रस्तावावर चर्चा सुूरू
स्वर गायिका लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, रामनिवास सत्यनारायण सिंह, नारायण ज्ञानदेव पाटील, शिवसेना नेते सुधीर जोशी, माजी मंत्री दत्तात्रय लंके, विधान परिषद सदस्य संजीवनी हरी रायकर, आशाताई मारोतीअप्पा टाले, कुमुद माधव रांगणेकर यांच्या निधनाबाबत सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून शोक प्रस्तावर भाषण सुरू आहे.
11:55 March 03
शोक प्रस्ताव
सभापती सभापती रामराजे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचा शोक प्रस्ताव मांडला. दरम्यान विरोधकांकडून मलिकांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विरोधकांची कानउघडणी करत, हा शोक प्रस्ताव असून गोंधळ घालू नका. मलिक यांचा विषय नियमात बसत नसल्याचे सांगितले. मात्र राजीनामा घेत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधीपक्षनेता प्रवीण दरेकर यांनी घेतली.
11:46 March 03
विधानपरिषदेला सुरूवात
विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह विधानपरिषदेला सुरूवात झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचे आगमन झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
11:13 March 03
आता म्हणणार दाऊत आतंकवादी आहे का? - आशिष शेलार
दाऊद इब्राहिमचे हस्तक आणि ज्या आरोपांखाली नवाब मलिकांना कोठडीत टाकण्यात आले आहे, अशा नवाब मलिकांचा राजीनामा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत भाजपा शांत राहणार नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक असणार आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे सरकार त्यांना का पाठीशी घालत आहे, असाही सवाल त्यांनी केला.
11:09 March 03
राज्यपालांनी माफी मागवी - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये चीड आहे. छत्रपतींच्या जयघोष त्यांना आवडत नाही. महाराष्ट्रात महाराजांचा जयजयकार होणार, असे नाना पटोले म्हणाले. तर नवाब मलिकांवर आरोप सिद्ध न झाल्याने राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
11:05 March 03
राज्यपाल्यांनी भाषण थांबवलं
सभागृहात गोंधळ सुरू असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांचे अभिभाषण थांबवून निघून गेले.
11:02 March 03
राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरूवात
राज्यपाल विधिमंडळात दाखल झाले असून त्यांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यांप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून त्यांचा जोरदार निषध सुरू आहे.
10:52 March 03
मुख्यमंत्र्यांची विधीमंडळ परिसरात उपस्थिती
विधानभवन परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला अभिवादन केले. तत्पुर्वी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
10:47 March 03
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस
मुंबई - आजपासून तीन आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 11 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालेल. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याऐवजी मुंबईत घेण्यात आले. विरोधकांनी यावरून राळ उठवली होती. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर घेण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील मुंबईत घेऊन विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. विरोधक यामुळे आक्रमक झाले आहेत. गोंधळात अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.