मुंबई- विधानसभेसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. मात्र, राज्यातील चित्र स्पष्ठ झालेले आहे. यात मुंबईकरांनी पुन्हा एकदा युतीलाच पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. यात भाजपला 16, शिवसेनेला 14, काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 1 तर समाजवादी पार्टीला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे येथे युतीच सरस ठरली आहे.
मुंबईवर कायमच शिवसेनेने राज्य केले आहे. महानगरपालिकाही सेनेच्या ताब्यात आहे. सेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीतही मुंबईकरांनी युतीला चांगले मताधिक्य दिले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार -
- मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
- धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
- वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
- मानखुर्द – अबू आझमी (समाजवादी पार्टी)
- अणूशक्तीनगर – नवाब मलिका (राष्ट्रवादी)
भाजपचे विजयी उमेदवार
- बोरीवली – सुनील राणे
- घाटकोपर पूर्व – पराग शाह
- दहिसर – मनिषा चौधरी
- मुलुंड – मिहीर कोटेचा
- कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
- चारकोप – योगेश सागर
- गोरेगाव – विद्या ठाकूर
- अंधेरी पश्चिम – अमित साटम
- विलेपार्ले – पराग अळवणी
- घाटकोपर पश्चिम – राम कदम
- वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
- सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन
- वडाळा – कालिदास कोळंबकर
- मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
- कुलाबा – राहुल नार्वेकर
शिवसेनेचे विजयी उमेदवार
- वरळी – आदित्य ठाकरे
- माहिम – सदा सरवणकर
- शिवडी – अजय चौधरी
- कुर्ला – मंगेश कुडाळकर
- विक्रोळी - सुनील राऊत
- दिंडोशी – सुनील प्रभू
- मागाठणे – प्रकाश सुर्वे
- भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
- जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर
- अंधेरी पूर्व – रमेश लटके
- चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
- कलिना – संजय पोतनीस
- भायखळा – यामिनी जाधव
UPDATES -
- नालासोपाऱ्यातून प्रदीप शर्मा यांचा पराभव
- मुख्यमंत्री मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल; थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद
- अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक विजयी
- चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या भाजप कार्यालयात दाखल
- मुंबई दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी (एकूण जागा -36)
- पक्ष 2019 2014
- भाजप 14 15
- शिवसेना 12 14
- राष्ट्रवादी 1 0
- काँग्रेस 7 5
- इतर 2 1
- आशिष शेलार विजयी
- महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव
- भाजप कार्यालयात जल्लोष सुरू, ढोल-ताशे वाजवत जल्लोष
- घाटकोपर पूर्व - पराग शहा आघाडीवर
- आदित्य ठाकरेंना 30 हजार मतांची आघाडी
- आशिष शेलार 30 हजार मतांनी आघाडीवर
- भाजप मुख्यालयात निराशेचे वातावरण, ढोल -ताशे सकाळी आणले असूनआताही ते जैसे थेच
- पहिल्या दहा फेऱ्यांचा कल - भाजप - 13, शिवसेना - 15, काँग्रेस - 4, राष्ट्रवादी - 1
- धारावीमथून वर्षा गायकवाड आघाडीवर
- वरळीतून आदित्य ठाकरे 21 हजार मतांनी आघाडीवर
- जोगेश्वरी रविंद्र वायकर आघाडीवर
- वांद्रे पश्चिममथून आशिष शेलार आघाडीवर
- आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
- माहीममधून सरवणकर आघाडीवर
- वर्सोवा - भारती लव्हेकर 7 हजार मतांनी पिछाडीवर
- नालासोपाऱ्यातून प्रदीप शर्मा पिछाडीवर
- मुंबईत मनसे 3 जागांवर आघाडीवर
- अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक आघाडीवर
- आशिष शेलार 2500 मतांनी आघाडीवर
- वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर
- पहिल्या फेरीत अभिजीत बचकुले यांना शून्य मतं
- आदित्य ठाकरे 7000 मतांनी आघाडीवर
- निकालाआधीच भाजप मुख्यालयात जल्लोष सुरु
- ंपोस्टल मतमोजणीला सुरुवात
मुंबई विभागातील 2014 ची आकडेवारी -
भाजप - 15, शिवसेना - 14, काँग्रेस - 5, एमआयएम - 1, समाजवादी पार्टी - 1, एकूण - 36
लक्षवेधी लढत -
- वांद्रे पूर्व - विश्ववनाथ महाडेश्वर (शिवसेना) Vs तृप्ती सावंत (अपक्ष), झीशाँन सिद्दीकी (काँग्रेस)
- कुलावा - भाई जगताप (काँग्रेस) Vs राहुल नार्वेकर (भाजप)
- वरळी -आदित्य ठाकरे (शिवसेना) Vs सुरेश माने (राष्ट्रवादी)
- अणुशक्तीनगर - तुकाराम काटे (शिवसेना) Vs नवाब मलिक (राष्ट्रवादी)