महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधानसभेचे सूप वाजले! पुढील अधिवेशन ५ जुलै २०२१ ला मुंबईत होणार - mansukh hiren death case

maharashtra
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज

By

Published : Mar 10, 2021, 9:56 AM IST

Updated : Mar 10, 2021, 6:22 PM IST

18:19 March 10

अर्थसंकल्प मंजूर करताना विरोधकांचा विधानसभेतून त्याग

  • बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही.
  • 14 एप्रिल 2024 पर्यंत स्मारक पूर्ण होईल.
  • 2021-22 चा अर्थसंकल्प मंजूर करताना विरोधकांचा विधानसभेतून त्याग
  • विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा गोंधळ घालत आंदोलन केले आहे.

17:39 March 10

आवाजी बहुमताने अर्थसंकल्पातील मागण्या मंजूर

अर्थसंकल्प हा आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे  विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले आहे. अर्थसंकल्पेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 

17:11 March 10

पेट्रोल-डिझेलचा जीएसटीत समावेश होण्याला राज्याचा पाठिंबा

 पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे. केंद्र सरकारकडून संसदेमध्ये इंधनावर जीएसटी लावावा, अशी चर्चा होत आहे. त्यामुळे राज्यांना निम्मे पैसे येणार आहेत. राज्याला इंधनावरील कराबाबत निर्णय घेता आला नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की,    राज्याची राजकोषीय तूट ही ८७ हजार ६९७ कोटी रुपये आहे. कोरोनाच्या काळात तुटीवर चर्चा करण्यात अर्थ नाही. फडणवीस सरकारच्या काळात  निविदा प्रणाली ही ३ लाखापुढे ऑनलाईन करण्यात आली होती. ई-निविदा प्रणालीचा नियम हा १० लाखापुढे करण्यात आला आहे. तशी मागणी करण्यात येत असल्याने लोकशाहीतत्वानुसार निर्णय घेतल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.  त्यामध्ये तसे बदल करण्यात येणार आहेत. आमदारांनी वेतन ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. १ मार्चपासून हे वेतन पूर्ववत होणार असल्याचे सांगितले.   

17:00 March 10

शिकाऊ उमेदवारांसाठी १ मे २०२१ पासून योजना, लाखो विद्यार्थ्यांना मासिक ५ हजार विद्यावेतन

शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारला १ लाख कोटी रुपये एवढी मार्चपर्यंत उत्पन्नात घट होणार आहे. कोरोनाच्या काळात बांधकाम मजुरांना मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाईंच्या नावाने योजना आणली आहे. सरकारने निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेण्याचे काम केली आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी १ मे २०२१ पासून योजना सुरू करणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना ५ हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. काही लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

निवडणुकीच्या काळात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासाठी निधी यापूर्वीच्या सरकारने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची आमच्या सरकारने अंमलबजावणी केली आहे.  

16:47 March 10

शेतकऱ्यांना पायाभूत किंमत देण्याची राज्याची तयारी-अजित पवार

 महाविकास आघाडीचे सरकार वेळेवर कर्ज देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधील आहे. राज्याची परिस्थिती दिली तर देणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जफेडीची सवय लावावी लागणार आहे. शेतकऱ्यांना पायाभूत किंमत देण्याची राज्याची तयारी आहे. बाजार समितींना चार वर्षात २ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  

16:30 March 10

आपले म्हणणे त्या विभागाच्या मंत्र्यांना द्यावेत- अजित पवार

अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चा संपली आहे. तर मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे कामकाज सुरू झाले आहे. दोन्ही बाजुच्या ११ सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवार हे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. आपले म्हणणे त्या विभागाच्या मंत्र्यांना द्यावेत, अशी सूचना अजित पवारांनी केली आहे. 

16:27 March 10

हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे-प्रतिभा धानोरकर

 प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की,  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे सक्षम नेतृत्व केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहे. अर्थसंकल्पात न्याय देण्यात आला आहे.   शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज योजना महाविकास आघाडीने जाहीर केली आहे. बाजार समित्यांसाठी दिलेला निधी शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे. वीजबिलात ३३ टक्के सवलत ही खऱ्या अर्थाने ठरणार आहे. विदर्भात संत्री उद्योगाला चालना देणारा प्रकल्प अभिनंदन ठरला आहे. 

16:19 March 10

नाशिकसाठी बाल रुग्णालयाची तरतूद करावी- सरोज अहिरे

नाशिक- नाशिकसाठी बाल रुग्णालयाची तरतूद करावी अशी अपेक्षा सरोज अहिरे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. चर्मकार समाज गरीब असून त्यांच्यासाठी गटईचे स्टॉल उपलब्ध मिळत नाहीत. त्यांच्यासाठी स्टॉल मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. चर्मकार समाज मंडळासह सर्व मागास मंडळाचे कर्ज माफ करावे, अशीही त्यांनी मागणी केली. सिद्ध पिंपरी या मतदारसंघात क्रीड संकुल वर्षभरापासून प्रलंबित मंजूर करावे अशी मागणी केली आहे. 

16:11 March 10

देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर दाखल केला हक्कभंग

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दुपारी हक्कभंग सभागृहात दाखल केला आहे. 

15:57 March 10

शेतकऱ्यांचा ऊस घेतला नाही तर, आंदोलन करणार- देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांवर अर्थसंकल्पाने प्रचंड अन्याय केल्याची टीका विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ऊस कारखाना घेत नसल्याने शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ येत आहे. 

13:44 March 10

  • केंद्राकडून येणे किती आहे, जसे सांगता तसेच केंद्राने दिले किती याचेही आकडे जनतेला सांगा - मुनगंटीवार
  • ९० हजार ३४५ कोटी रुपये फेब्रुवारीपर्यंत आले आहेत.

13:39 March 10

काँग्रेस-राष्ट्रवादीने जो शपथनामा-वचननामा जाहीर केला, त्याचे प्रतिबंब या अर्थसंकल्पात का दर्शवले नाही

  • तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
  • उच्च शिक्षणासाठी शून्य ट्क्यांनी कर्ज देण्याचा वचननामा होता
  • यापैकी कोणते वचन आपण पूर्ण केले असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
  •  

13:35 March 10

प्रसिद्धीवर २४६ कोटी खर्च करण्यात आले

गोर गरिबांसाठी द्यायला पैसे नाहीत म्हणून सरकार सांगते. मात्र, प्रसिद्धीवर २४६ कोटी खर्च कऱण्यात आले. फडणवीस सरकारच्या काळात हा खर्च २६ कोटी इतका होता, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

13:21 March 10

महाराष्ट्र वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना यावेच लागेल- मुनगंटीवार

दीड वर्षात आर्थिक बाबतीत महाराष्ट्र मागे गेला - मुनगंटीवार

13:13 March 10

  • कर्ज नियमित भरले तर शून्य टक्के व्याज आणि कर्ज नाही भरले तर कर्ज माफी देता.. मग नियमित कर्ज भऱणाऱ्यांना नवीन प्रोत्साहनपर योजनांची घोषणा करणे अपेक्षित होते.
  • महिलांच्या संदर्भात गृहखरेदीत मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली. ती ३ टक्के का दिली नाही.
  • तसेच १ हजार कोटीची तूट कोणत्या आधारवर अपेक्षित दर्शवली, असा सवाल ही मुनगंटीवार यांनी केला.

13:02 March 10

ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचे आहे का? -मुनगंटीवार

  • ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचे आहे का? अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.  सचिन वाझे प्रकरणावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेल्या मागणीवर केलेल्या आरोपांवरून मुनगंटीवार बोलत होते.
  • विदर्भातील नेत्यांचा वापर करून घेतला जात असल्याचा टोलाही त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना म्हणजेच राष्ट्रवादीला लगावला.
  • यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तरादाखल मुनगंटीवारांवर उपहासात्मक टिप्पनी केली.
  • देवेंद्र फडणवीस पेक्षा वरिष्ठ असूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता आले नाही, ते तुमचे दु:ख आम्ही समजू शकतो असा टोला देशमुखांनी लगावला.

13:02 March 10

  • शिक्षणशुल्कात सूट मिळेल अशी अपेक्षा होती.
  • गरीबस मजूर, लघू उद्योजक, व्यावसायिक, कामगार, यांच्यासाठी कोणतीही घोषणा केली नाही.
  • अर्थसंकल्पात फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रकार घडला असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली

12:47 March 10

विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

हा अर्थसंकल्प मराठवाडा, विदर्भ, उत्तरमहाराष्ट्रावर या अर्थसंकल्पात अन्याय

हा अर्थसकल्प फसवा आणि आभासी आहे

नियोजन शून्य अर्थसंकल्प असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली

सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली

12:19 March 10

फडणवीसांकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात विशेष अधिकार हक्कभंग सूचना सादर

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान, फडणवीसांची बदनामी आणि सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी विशेष अधिकाराचा हक्कभंग

विरोधी पक्षनेते फडणवीसांवर दबाब टाकण्याचा प्रयत्न, यासाठी फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवण्याची सूचना मांडली आहे.  

अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाची सूचना मांडणार - फडणवीस

12:04 March 10

सभागृहात मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर चर्चा सुरू

12:02 March 10

सचिन वाझेंना पदावरून दूर करण्यावरून निर्णय झाला पाहिजे - फडणवीस

सचिन वाझेंना पदावरून दूर करण्यावरून निर्णय झाला पाहिजे
  • आम्हाला चर्चा करायची आहे, त्यामुळे सचिन वाझेंवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सभागृहात करण्यात आली.
  • यावर वाझेंची बदली केली जाणार असल्याची  माहिती अनिल परब यांनी सभागृहात दिली
  • तसेच विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्राणांना द्यावे,अशी विनती विरोधी पक्षनेत्यांना करण्यात आली आहे.

11:44 March 10

सचिन वाझेंची बदली करणार, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

विरोधकांनी सचिन वाझे विरोधातील पुरावे एटीएसला द्यावे-  

सचिन वाझे कोणीही असो, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही- गृहमंत्री देशमुख

सचिन वाझेंची बदली करणार , गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

11:31 March 10

सचिन वाझेंना अटक करण्याची मागणीवरून विधान परिषदेत भाजपाचा गदारोळ

मनसुख हिरेन प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख सभागृहात निवदेन देत असताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सचिन वाझेंना अटक करण्याची जोरदार मागणी केली. तसेच भाजपच्या सदस्यांना विधान परिषदेत गदारोळ केला.

11:25 March 10

एमआयडीसी आणि लघु उद्योगावर सभागृहात प्रश्नउत्तरे

  • महाराष्ट्राच्या लघु उद्योजकांना ताकद देण्यासाठी प्रत्येक राज्यात परिषद स्थापन झाली आहे.
  • एमआय़डीसी मध्ये युवा वर्गाला नवे व्यवसाय सुरू कऱण्यासाठी नवीन धोरण आणले आहे का?
  • ज्या तालुक्यात एमआय़डीसी नाही, तिथे मिनी एमआय़डीसी सुरू करणार का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला असता, उद्योग मंत्र्यांनी परिषद स्थापन करण्याची तयारी दर्शवली. तसे या लघु उद्योगांना एमआय़डीसीमध्ये जागा राखीव असेल.
  • मंद्रुपला एमआयडीसीची मान्यता मिळाली, मात्र भूसंपदान प्रक्रिया कधी पूर्ण होणार आहे. आणि त्याठिकाणी उद्योग येणार या बाबत आमदार सुभाष देशमुख यांनी प्रश्न विचारला असता, उद्योगमंत्रालयाने यावर लवकरात लवकर भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती सभागृहात दिली.

11:13 March 10

टेस्ला कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी आजही उत्सुक, बंगळुरूमध्ये टेस्ला केवळ विक्री कार्यालय उघडणार - उद्योगमंत्री

टेस्ला कंपनीच्या उत्पादन निर्मिती प्रकल्पाची जागा अद्याप निश्चित नाही, तो प्रकल्प बंगळुरूला गेला नाही. कंपनीने अद्याप निर्णय जाहीर केलेला नसल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सभागृहात दिली.

11:09 March 10

विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन

विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन

विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली. या पार्श्वभूमीवर भाजपकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. सचिन वाझे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्र्यांसह  ठाकरे सरकारचाही निषेध भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केला.

11:06 March 10

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सचिन वाझेंना तत्काळ अटक करण्याची केली मागणी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना तत्काळ अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

11:03 March 10

सभागृहाचे कामकाज; प्रश्नोत्तराच्या सत्राला प्रारंभ

विधानसभेत प्रश्नोत्ताराच्या सत्राल पारंभ झाला, यावर उर्जा विभागाच्या प्रश्नावर चर्चा

09:54 March 10

वाझे प्रकरणी गृहमंत्री देशमुख विधानपरिषदेत निवेदन करणार

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत निवेदन करणार आहेत. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी भाजपने विधानसभेत केली होती. यावरून आठ वेळा सभागृह तहकूब झाले होते. आता विधानपरिषदेत यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.
 

09:29 March 10

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी धरली होती लावून..

मुंबई -विधान परिषदेचे आज सूप वाजले आहे. पुढील अधिवेशन सोमवारी ५ जुलै २०२१ ला मुंबईत घेतले जाणार आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरल्याने हे अधिवेशन वादळी ठरले आहे. अर्थसंकल्प मंजूर करतानाच विरोधकांनी विधानसभेतून त्याग केला आहे. 

Last Updated : Mar 10, 2021, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details