मुंबई - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर गेले काही दिवस पावसाने ( Maharashtra rainfall deficiency ) दडी मारली होती. रविवार १९ जूनपासून पुन्हा मुंबईत पावसाला सुरुवात झाली ( Maharashtra Monsoon Update ) आहे. गेल्या २४ तासात मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगराच्या तुलनेत शहर विभागात जास्त पावसाची नोंद होत आहे. येत्या २४ तासात ऑरेंज अलर्ट दिला असल्याने अतिवृष्टीचा इशारा हवामान ( Mumbai monsoon 2022 prediction ) विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आयएमडीकडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई ठाणे व अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत इतका पडला पाऊस - मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेल्या ( Maharashtra rain updates ) माहितीनुसार, सोमवारी २० जून सकाळी ८ ते मंगळवार २१ जून सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ४३.८१ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ३९.५१ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ३७.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस पडला तरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू ( Monsoon news today Maharashtra ) आहे.