मुंबई -राज्यात आज पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे- पुणे शहरात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.
नागपुरात पावसाचा धुमाकूळ -नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
नाशिक-जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरात पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्याने प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोसमात पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिले आहेत.
धुळे- जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
पालघर- जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आला आहे. 8 गावांचा संपर्क तुटला आहे.
नंदुरबार - हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावर असलेले गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, 14 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट - गेल्या आठवड्यात मुंबई, मुंबई उपनगर येथे जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र, मागील 2 दिवसापासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, अधून- मधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत ( Maharashtra Rain ). मात्र, सकाळपासूनच मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट -हवामान विभागाने ( Meteorological Department ) मुंबई ठाणे आणि मुंबई उपनगर अशा तिन्ही जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यात काही अडचणी होत आहेत. मात्र, सकाळपासून पाऊस सुरू असतानाही लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. तर तिथेच रस्ते वाहतूकही व्यवस्थित आहे. अद्याप मुंबईच्या रस्त्यांवर सखल भागात पाणी साठलेलं नाही. मात्र, असाच पाऊस पडत राहिला तर मुंबईच्या सकल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन पालिका प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने केदारनाथ यात्रा थांबवली -उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली ( Kedarnath Yatra has been stopped ) आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोनप्रयागमध्ये यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे.
केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली - उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. राज्यभरात नद्या-नाले तुंबले आहेत. पावसामुळे अनेक भागात भीषण अपघात झाले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली आहे. हवामान योग्य झाल्यानंतरच प्रवाशांना सोनप्रयागच्या पलीकडे पाठवले जाईल. सध्या सर्व प्रवासी सोनप्रयागमध्येच आहेत.
अनेक ठिकाणी भूस्खलन - मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे राज्यभरातील १२२ हून अधिक रस्ते बंद आहेत. अनेक मुख्य रस्तेही बंद आहेत. अनेक ठिकाणी डोंगरावरून सतत ढिगारा पडत आहे. चमोली जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग बंद आहे.
हेही वाचा -Mumbai Heavy rain : मुंबईत या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन