मुंबई - निवडणुकीच्या राजकारणात जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करण्याची संघ परिवार व भाजपची फार जुनी सवय आहे. २०१४ प्रमाणे याहीवेळी नरेंद्र मोदी आणि भाजपने तेच करायचे ठरवलेले दिसते. मोदी यांनी अकलुजच्या भाषणात आपण मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस टीका करत असल्याचे म्हटले होते, हा त्याचाच पुरावा आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले? - रत्नाकर महाजन - criticise
अकलूज येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपण मागासवर्गीय असल्याने काँग्रेस आपल्यावर टीका करत असल्याचे म्हंटले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांची जात काढल्यामुळे संघ परिवाराच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या. याच राष्ट्रपतींची उमेदवारी जाहीर करताना मात्र भाजपच्या तडीपार अध्यक्षांनी स्वतः रामनाथ कोविंद यांची जात जाहीर केली होती, हे अजून कोणी विसरलेले नाही. हेच राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरात जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू देत नव्हते, तेव्हा संघ परिवार आणि भाजपने ते कसे चालू दिले. आज दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा पुळका आलेल्या पंतप्रधानांनी तेव्हा काय केले? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.