महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेतकरी आंदोलनाला माविआचा पाठिंबा, नेते थेट दिल्ली बॉर्डर वर - शेतकरी आंदोलना बद्दल बातमी

शेतकरी आंदोलनाला राज्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. या आंदोलनक शेतकऱ्यांना भेटायला बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, तर आज सुप्रीया सुळे यांच्यासह काही विरोधी पक्षातील नेते दिल्ली बॉर्डरवर गेल्याचे पहायला मिळाले.

Maha Vikas Aghadi supports the farmers' agitation
शेतकरी आंदोलनाला माविआचा पाठिंबा, नेते थेट दिल्ली बॉर्डर वर

By

Published : Feb 4, 2021, 4:48 PM IST

मुंबई -आता दिल्ली बॉर्डर वर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कठोर उपाययोजनांवरून केंद्र सरकार वर सोशल मीडियात जोरदार टीका होत आहे. हीच संधी साधून राज्यातला विरोधी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राज्यातील नेते दिल्लीत सरसावले आहेत.

शेतकरी आंदोलनाला माविआचा पाठिंबा, नेते थेट दिल्ली बॉर्डर वर

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षातील खासदार दिल्ली बॉर्डरवर पोहचले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. सुप्रिया सुळेंसहित सर्व खासदारांना आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले गेले नसल्याने सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची टिका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. पाकिस्तान आणि चीन बॉर्डरवर देखील अशी कडेकोट व्यवस्था पहिली नसून केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून काढण्यासाठी केंद्र सरकारने असा बंदोबस्त केला आल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून आंदोलक शेतकऱ्यांना पाणी देखील आंदोलन स्थळी जाऊ दिल जात नाही आहे. तिकडची वीज खंडित करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आल्यामुळे केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

26 जानेवारीला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली बॉर्डरवर दिल्ली पोलिसांकडून रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. बॅरिगेट्सच्या भिंती ही उभारण्यात आल्या आहेत. हे चित्र पाहून सरकार काय शेतकऱ्यांसोबत युद्धाची तयारी करत आहे का? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी गाजिपूर बॉर्डरवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकेत यांची भेट घेतली होती. आपल्या अग्रलेखातून वेळोवेळी आंदोलक शेतकऱ्यांची बाजू मांडून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी ही केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्रसरकार कोंडीत सापडल आहे. केंद्राला अजून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो आहे. काँगेसचे दिल्लीच्या नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांनीही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची एकही संधी सोडलेली नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुंबईत शेतकरी आंदोलनात सहभागही होऊन केंद्र सरकार कसे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे, याचा पाढा नेहमीच वाचला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केंद्र सरकारवर टीका करत, अहिंसेच्या मार्गाने जर कोणी आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार असेल तर त्यांना रोखण्यात येऊ नये. सुप्रिया सुळे या आमच्या खासदार आहेत, त्यांना आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला दिले गेले पाहिजे. जर कोणी आपल्या भाषणातून भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखायलाही हवे. असे मत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीचा मुंबईतील मोर्चालाही होता पाठिंबा -

दिल्लीती शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढत आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनाही माजविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुंबईच्या आंदोलनात सहभागी झाले होते. खुद्द शरद पवार यांनी यावेळी हजेरी लावून केंद्र सरकारला इशारा दिला. शेतकरी आंदोलनाचा हा मुद्दा केंद्र सरकारला अडचणीत आणणारा आहे. त्यामुळे एकही संधी न सोडता महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details