मुंबई : अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेंत्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यात अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान, या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांची नाराजी दूर?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबाग परिसरामध्ये शंभर खोल्या देण्याचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते पार पाडला होता. मात्र स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी स्थानिकांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र त्यानंतर 24 तासांच्या आतच जवळच्या परिसरात पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शंभर खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (28 जून रोजी) आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन यासंबंधी शरद पवारांची नाराजी दूर केल्याची चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा -भाजपचे नेते हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? - संजय राऊत
अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबाबतही चर्चा