मुंबई:महाराष्ट्र सरकारने कोविडची वाढती प्रकरणे लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी राज्यात नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने गुरवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, शुक्रवारी नवे मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य कोविड-19 टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे उत्सव, विवाह सोहळे आणि हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट्समधील पार्ट्यांच्या वेळी गर्दी टाळण्याच्या उपाय योजनांवर चर्चा केली.
एकाच दिवसात ओमायक्रॉनचे 23 रुग्न
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. गुरवारी कोराेना व्हारसचे 1,179 नवीन रूग्ण सापडले. त्या नंतर एकाच दिवसात पुन्हा 1201 जणांना नवा संसर्ग झाला. सोमवारी राज्यात 544 रूग्णांची भर पडली, तर दुसऱ्या दिवशी 825 प्रकरणे नोंदली गेली होती. गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या ओमायक्राॅनची 23 प्रकरणे नोंदवली गेली, एका दिवसात इतके रुग्न सापडण्याचा हा आत्ता पर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे, त्यामुळे राज्यातील अशा रुग्णांची संख्या 88 वर पोहचली आहे.
हे येऊ शकतात निर्बंध
- रात्रीची संचारबंदी
- गर्दीच्या कार्यक्रमांनानिर्बंध
- कंन्टेन्मेट, बफर झोन
- रुग्णांचा डोअर टु डोअर जाऊन शोध
- व्यापक लसीकरण
हेही वाचा :mumbai omicron update - मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ५ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३६ वरव्यापक लसीकरण