मुंबई- राज्य सरकारने विनापरवानगी गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी आदेश काढले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कामाच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
विनापरवानगी मुख्यालय सोडून गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेेेने कामावर रुजू न होणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी बडतर्फीचा आदेश काढला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही, असा आदेश काढण्यात येणार का, असा प्रश्नचिन्ह समाज माध्यमातून विचारला जात होता.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना तसेच महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना हा आदेश बंधनकारक राहणार आहे. अनुपस्थित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपातीचेही निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
दरम्यान, महामारीच्या संकटामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीचे नियम शिथिल केले होते.