मुंबई - 'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत ऐन थंडीच्या सुरुवातीला जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून पूर्व पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे चाकरमान्यांचे ऐन कार्यालयीन वेळी हाल झाले आहेत.
'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार; मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, चाकरमान्यांचे हाल
'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मागील तीन दिवसांपासून पावसाचा इशारा दिला होता. तसेच, रायगडमध्येही ८ तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. सध्या ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबईत जोरदार पाऊस

सकाळी मध्य रेल्वेवरील माटुंगा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची अप डाऊन वाहतूक 10 ते 15 उशिराने धावत आहे. दरम्यान, बिघाड दुरूस्त करण्याचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे.