महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maha Budget session : विधानसभेतील दिवसाभराचे कामकाज.. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदन दिले त्यानंतर गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

Maha Budget session
Maha Budget session

By

Published : Mar 9, 2021, 7:55 PM IST

मुंबई - विधानसभेतील आजचा दिवस वादळी ठरला. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. तर तिथेच अन्वय नाईक प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबली असल्याचा घणाघाती आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही पक्षाचे आमदार आमने-सामने आले. या गोंधळात विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

विधानसभेत सकाळी सुरुवातीला अकरा वाजता प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा प्रश्न उपस्थित करून पोलीस अधिकारी सचिन वझे हे कशाप्रकारे या प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना 201 कलमाखाली लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसात जो जबाब दिला, तो वाचून दाखवत मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाजे यांनीच केला असा संशय व्यक्त केला असल्याचं सांगितलं. या कारणावरून सचिन वाजे यांना अटक करावी ही मागणी केली.‌ सचिन वझे हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्या कारणाने त्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

सत्ताधाऱ्यांकडून मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात चौकशीची मागणी -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वझे यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासन प्रफुल खेडा पटेल आणि काही अधिकारी यांची नावे असून या प्रकरणाची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. या मागणीनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

हे ही वाचा - कांदा, लसूण, मसाला फोडणीसह कालव्याचा रस्सा ही पर्यटकांसाठी पर्वणी
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप -

विधानसभेमध्ये मनसुख हिरेन यांच्या आत्महत्येवरून गदारोळ सुरू असून विरोधक सचिन वाझे यांचे निलंबन करा अशी मागणी करू लागले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वझे तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

हे ही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
धमक्यांना मी घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस

भास्कर जाधव यांनी सभागृहात हा आरोप केल्यानंतर अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ही गोष्ट भास्कर जाधव यांना माहिती नसेल. तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरत नाही, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.
हे ही वाचा - फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण

सचिन वझे यांना महाविकास आघाडी का पाठिशी घालतंय ?- देवेंद्र फडणवीसांच्या सवाल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सचिन वझे यांच्या विरोधात पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सचिन वझे अनेकांची नाव घेतील म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत ते नेमके कोणाला वाचवत आहेत, असा सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे.

याच गोंधळात आज संपुर्ण दिवस विधानसभेचे कामकाज चालू बंद अशा अवस्थेत पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या घोषणाबाजी चया गोंधळामुळे आठ वेळा विधानसभा तहकूब करावी लागली, तर दुपारी चार वाजता दोन्ही पक्षाचा गोंधळ पाहता कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details