मुंबई- गेल्या २४ तासात राज्यात नवीन २० हजार ४१९ कोरोनाबाधित आढळले आहेत. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २३ हजार ६४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ४३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात आज २३ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त.. २० हजार ४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद - कोरोना अपडेट महाराष्ट्र
राज्यात कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण हे ७६.९४ टक्के झाले आहे. तर एकूण २ लाख ६९ हजार ११९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोनाने आजपर्यंत एकूण ३५ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार सुरू असलेल्या २३ हजार ६४४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १० लाख १६ हजार ४५० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण हे ७६.९४ टक्के झाले आहे.
राज्यात २ लाख ६९ हजार ११९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकट्या मुंबई शहरात नवीन २ हजार २८२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार ५८५ आहे. तर कोरोनाने मुंबईमध्ये आजवर एकूण ८ हजार ७५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासात मृत्यू झालेल्या ४४ जणांचा समावेश आहे.