मुंबई- ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात किरीट सोमय्या यांना पक्षाने तिकीट नाकारले. याबाबतचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय समीतीने घेतला असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांच्या उमेदवारी बाबतचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय समितीचा - माधव भंडारी - speaks
किरीट सोमय्या यांचा पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा आहे. भाजपतील मोजक्या मोठय़ा नेत्यात त्यांचे नाव आहे. पक्षात त्यांच्याबाबत सन्मानाची भावना असल्याचे भंडारी म्हणाले.
शिवसेनेच्या दबावामुळे भाजपने सोमय्या यांचे तिकीट रद्द केले का याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलतच होते. भंडारी म्हणाले, भाजप सर्व निर्णय आपल्या पद्धतीने विचार करुनच घेते. आत्ताचा, यापुर्वीची व या पुढील निर्णयही आमच्या निर्णय केंद्रीय समीतीनुसारच घेतला जाते.
किरीट सोमय्या हे पक्षाचे मोठे नेते आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते सोबत आहेत. पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा आहे. भाजपतील मोजक्या मोठय़ा नेत्यात त्यांचे नाव आहे. त्यांच्याबाबत सन्मानाची भावना आहे, असेही भंडारी म्हणाले.