मुंबई : लंपी व्हायरस पासून जनावरांची सुटका व्हावी (Vaccination against lumpy skin disease) आणि जनावरे मृत्यृमुखी पडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात आलेली लसीकरणाची मोहीम (Vaccination against lumpy disease in Maharashtra) लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil on lumpy vaccination) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व जनावरांना लस देण्यात येणार आहे एकूणच येत्या 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात एक कोटी चाळीस लाख जनावरांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
७९६ जनावरे दगावली -आतापर्यंत राज्यात ७९६ जनावरे दगावली असून राजाने अद्याप योग्य नियंत्रण राखल्याचे त्यांनी म्हटले आहे. लंपी व्हायरस मुळे राज्यभरात पसरलेल्या जनावरांच्या साथीमध्ये अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत राज्यातील 796 जनावरे दगावली आहेत. अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिली.